सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 13:13 IST2025-09-20T13:11:48+5:302025-09-20T13:13:15+5:30

Solar Eclipse 2025: २१ सप्टेंबर रोजी सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही, पण ग्रहणाचे वेध लागताच ग्रहणाचा प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी दिलेले उपाय करा. 

Solar Eclipse 2025: The same remedy used during the lunar eclipse will be applied during the solar eclipse as well, keep basil leaves on stored food and water. | सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 

सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 

यंदा भाद्रपद अमावास्येला (Bhadrapad Amavasya 2025) सूर्यग्रहण (Solar Eclipse 2025) असणार आहे. हे ग्रहण भारतातून दिसणार नाही. मात्र ग्रहणाचा प्रभाव त्याचा कार्यकाळात सर्वत्र समप्रमाणात जाणवतो. म्हणून ग्रहणाशी संबंधित काही पथ्य पाळणे आवश्यक असते. ग्रहणाची छाया आणि वातावरणातील प्रतिकूलता नियंत्रित ठेवण्यासाठी तुळशीचा उपाय अवश्य करा, जसा पितृपक्षाच्या सुरूवातीला चंद्र ग्रहणाच्या वेळी केला होता...!

Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा

२०२५ चे शेवटचे सूर्यग्रहण कधी आहे?

२१ सप्टेंबरच्या रात्री वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण होईल. या दिवशी सर्वपित्री अमावस्येला देखील आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, हे ग्रहण रात्री १०:५९ ते पहाटे ३:२३ पर्यंत राहील. ते भारतात दिसणार नाही. मात्र ग्रहण काळ आणि ग्रहण प्रभाव पाळण्याची आपल्याकडे परंपरा आहे. त्यानुसार ग्रहण कन्या राशीत होईल. ग्रहणाचा काळ १२ तास आधी सुरू होतो. भारतीय वेळेनुसार सकाळी १०:५९ वाजता ग्रहण वेध सुरू होईल. शिवाय, हे आंशिक सूर्यग्रहण असेल, जे सूर्याच्या अगदी थोड्या भागाला व्यापेल. त्याची वेळ आणि श्राद्धविधी नियम जाणून घेऊ. 

सूर्यग्रहण २०२५ वेळ

ग्रहण वेध सकाळी १०:५९ वाजता (भारतीय वेळेनुसार) सुरू होईल
ग्रहण रात्री १:५९ वाजता (भारतीय वेळेनुसार) संपेल
ग्रहण काळ ३:२३ वाजता (भारतीय वेळेनुसार) संपेल.

Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!

अन्न आणि पाण्यावर तुळशीचे पान 

केवळ ग्रहणातच नाही, तर ग्रहणाच्या बारा तास आधी वातावरण दूषित होऊ लागते, त्यालाच ग्रहण वेध म्हणतात. हा केवळ समज नाही, तर विज्ञानानेदेखील त्याला पुष्टी दिली आहे. त्यालाच शास्त्राने ग्रहणाचा वेध काळ म्हटला आहे. या दूषित वातावरणात अन्न, पाणी निषिद्ध सांगितले जाते. कारण, पृथ्वीला ऊर्जा आणि प्रकाश देणारे चंद्र, सूर्य ग्रहण काळात झाकोळले गेल्यामुळे अन्य सुक्ष्म जीव जीवाणूंचे प्राबल्य वाढते आणि त्यामुळे अन्न, पाणी दूषित होते. म्हणून ग्रहण काळात अन्न, पाणीदेखील वस्त्राने झाकले जाते व त्यात तुळशीचे पान टाकले जाते. तुळशीच्या पानामुळे अन्न, पाणी दूषित होत नाही आणि ग्रहणकाळ सुटल्यावर ते वापरण्यास योग्य ठरते. आपले पूर्वज आठवणीने या गोष्टींचे पालन  करत असत, आपणही चांगल्या आणि आरोग्यदायी गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवूया. 

Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!

Web Title: Solar Eclipse 2025: The same remedy used during the lunar eclipse will be applied during the solar eclipse as well, keep basil leaves on stored food and water.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.