सकाळच्या वेळी पैसे पडले अथवा सापडले तर त्याचा संकेत काय? ज्योतिषशास्त्र सांगते...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 19:30 IST2022-07-22T19:28:35+5:302022-07-22T19:30:02+5:30
एखाद्याचे सकाळच्या वेळी पैसे हरवले तर आपण त्याबद्दल आनंदी असले (Astro Tips) पाहिजे.

सकाळच्या वेळी पैसे पडले अथवा सापडले तर त्याचा संकेत काय? ज्योतिषशास्त्र सांगते...
पैशाचे महत्त्व प्रत्येक लहानापासून मोठ्या व्यक्तीला माहीत आहे. त्यासाठी प्रत्येक व्यक्ती आपल्या स्तरावर मेहनत करून पैसा कमावतो. घाईगडबडीने किंवा अज्ञानाने अनेक वेळा आपल्या खिशातून किंवा आपल्या हातातून पैसे पडतात. जर रक्कम मोठी असेल तर आपल्याला अधिक खेद वाटतो. कष्टाने कमावलेले पैसे गहाळ झाले तर स्वाभाविकपणे आपल्याला वाईट वाटते. मात्र, भोपाळचे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा News18 हिंदीला सांगतात की, जर एखाद्याचे सकाळच्या वेळी पैसे हरवले तर आपण त्याबद्दल आनंदी असले (Astro Tips) पाहिजे.
सकाळी पैसे पडण्याचा अर्थ काय?
सकाळी चुकून एखाद्याच्या खिशातून पैसे पडले तर ते शुभ मानले जाते. भविष्यात तुम्हाला मोठा फायदा होणार असल्याचे ते लक्षण आहे.
नाणे पडण्याचा अर्थ -
मान्यतेनुसार, आपल्या खिशातून एखादे नाणे सकाळच्या वेळी जमिनीवर पडले तर ते शुभ चिन्ह मानले जाते. हे आगामी काळात होणाऱ्या चांगल्या करारांचे लक्षण आहे. यामुळे तुम्हाला धनलाभ होण्याचे संकेत मिळतात. परंतु कोणी नाणे जाणूनबुजून टाकत असेल तर तो देवी लक्ष्मीचा अपमान मानला जातो, त्यामुळे उलट तुमचे पैसे जाऊ शकतात.
पैसे देताना खाली पडले तर?
जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला पैसे देत असाल आणि त्यावेळी पैसे तुमच्या हातातून निसटून खाली पडले तर ते तुमच्यासाठी आणि समोरच्या व्यक्तीसाठी शुभ मानले जाते. याचा अर्थ तुमचे अडकलेले पैसे लवकरच मिळणार आहेत.
सकाळी पैसे सापडणे -
जर तुम्ही फिरायला जात असाल आणि सकाळी तुम्हाला वाटेत पैसे पडलेले दिसले तर ते शुभ चिन्ह मानले जाते. याचा अर्थ असा की तुमची प्रगती लवकरच होणार आहे. हे पैसे शक्यतो खर्च करणे टाळा. त्यांना नशीब मानून ते तुमच्या पर्समध्ये ठेवा.
पैशांनी भरलेली पर्स सापडणे -
जर तुम्हाला सकाळी पैशांनी भरलेली पर्स मिळाली तर याचा अर्थ देवी लक्ष्मी तुमच्यावर कृपा करणार आहे. तुम्ही कोणतेही काम कराल, तुम्हाला यश आणि नफा मिळेल.