शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

Shrvan Purnima 2022 : नारळी पौर्णिमेला कोळी बांधव समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? जाणून घ्या कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 14:06 IST

Narali Purnima 2022: नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा केली जाते. पंचमहाभूतांपैकी ही एक पूजा आहे, त्यामागचे कारणही जाणून घ्या... 

यंदा ११ ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमा आहे. यादिवशी आपले कोळीबांधव समुद्राची पूजा करतात आणि त्याला श्रीफळ अर्पण करून ऋणनिर्देश व्यक्त करतात. परंतु ही कृतार्थता कशाबद्दल? ते सविस्तर जाणून घेऊ. 

नदी वहावत जाते परंतु समुद्र आपली मर्यादा कधीच ओलांडत नाही. आणि यदाकदाचित त्याने आपली मर्यादा ओलांडली तर प्रलय, त्सुनामी आलीच म्हणून समजा. खवळलेल्या समुद्राकडे पाहून आपल्याल धडकी भरते, परंतु कोळीबांधव त्याला आपला मायबाप मानून खुशाल स्वत:ला झोकून देत लाटांवर स्वार होतात. कारण तोच त्यांचा पोशिंदा असतो. समुद्री मेवा त्यांना पुरवतो. तोच आपल्यापर्यंत पोहोचतो. अशा सागराप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा (Narali Purnima 2022)

आपल्याकडे कोणाचाही आदर सत्कार करायचा असेल तर मानाची वस्तू म्हणून शाल श्रीफळ देण्याचा प्रघात आहे. त्याचप्रमाणे समुद्राचा सत्कार म्हणून त्याला नारळ अर्थात श्रीफळ अर्पण केले  जाते आणि आमचा सांभाळ कर, पोटापाण्याचा प्रश्न सुटू दे अशी प्रार्थना केली जाते. 

या दिवशी पावसाळ्यामुळे उधाण आलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी विधिवत त्याची म्हणजे जलदेवता वरुणाची पूजा करून त्याला नारळ अर्पण केला जातो. प्रामुख्याने समुद्राशी संबंधित व्यवसाय करणारे कोळीबांधव आणि जलपर्यटन हा व्यवसाय करणारी मंडळी हा सण `उत्सव' म्हणून साजरा करतात. कोळीवाडयातील आपल्या निवासस्थानापासून समुद्रापर्यंत सोनेरी कागदाने सुशोभित केलेला नारळ पालखीत घालून सर्व आबालवृद्ध स्त्री पुरुष नाचत गात आनंदाने मिरवणूक काढतात. समुदायानेच आपापला नारळ समुद्रात अर्पण करतात. धंद्याला बरकत यावी आणि पुढचे वर्ष समुद्राने आपले रक्षण करावे म्हणून प्रार्थना करतात. नंतरही बराच वेळ सर्व समुद्रकिनारे आणि कोळीवाडे नाचत बागडत असतात. या दिवशी नारळ घातलेला गोड पदार्थ केला जातो. पावसाळा सुरू झाल्यापासून बंद ठेवलेले व्यवसाय या दिवशी पुन्हा सुरू केले जातात. 

यादिवशी अनेक घरांमध्ये नारळी भात किंवा नारळाच्या वड्यांचा मुख्य बेत केला जातो. कारण याच दिवशी रक्षाबंधन हा सणही साजरा केला जातो. आवडत्या भाऊरायाला औक्षण करून राखी बांधली जाते आणि त्याची किर्ती सागरासारखी अमर्याद पसरू देत अशी देवाकडे प्रार्थना केली जाते. 

सणांचे हे सुंदर रूप पाहिले, की आपल्या संस्कृतीचा आणि पूर्वजांचा हेवा वाटतो. त्यांच्या दूरदृष्टीची कमाल वाटते. नर्मदेला साडी नेसवणे असो नाहीतर समुद्राला नारळ अर्पण करणे असो, निसर्गाला कवेत घेण्याचा, सलगी साधण्याचा, ऋणानुबंध जोडण्याचा प्रयत्न किती सुंदर आहे. निसर्गामुळे आपले अस्तित्त्व टिकून आहे अन्यथा नदी, डोंगर, वृक्ष, फळं, फुलं, आकाश, समुद्र, पर्वतरांगा यांच्याशिवाय आपण अपूर्ण आहोत. याचे भान राहावे, यासाठीच धर्मशास्त्राने या सणांची सांगड चपखलपणे निसर्गाशी घालून दिली आहे. 

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनShravan Specialश्रावण स्पेशल