Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 13:41 IST2025-07-28T13:40:32+5:302025-07-28T13:41:08+5:30
Shravan Somvar 2025: महादेवाची पूजा करताना आपण बेल आणि पांढरे फुल वाहतो, मात्र त्यात केतकीच्या फुलांचा समावेश नसावा असे सांगितले जाते; का ते पाहू...

Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
आज श्रावणातला पहिला सोमवार(Shravan Somvar 2025). त्यानिमित्त महादेवाला दूध पाण्याचा अभिषेक आणि बेलाचे पान आणि पांढरी फुले आपण वाहतो. मात्र त्या फुलांमध्ये केतकीच्या फुलांचा समावेश नसतो, का ते जाणून घेऊ.
एक दिवस ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांच्यात वाद झाला की दोघांमध्ये श्रेष्ठ कोण? न्यायनिवाडा करण्यासाठी ते महादेवांकडे आले. निर्णय सुनावण्याआधी त्यांनी दोघांची परीक्षा घ्यायची असे ठरवले. महादेवांनी एक शिवलिंग प्रगट केले आणि दोघांना सांगितले, की या शिवलिंगाचा आदी आणि अंत जो शोधून काढेल तो सर्वश्रेष्ठ ठरेल.
ब्रह्मदेव निघाले पृथ्वी आणि पाताळाच्या दिशेने तर विष्णू देव निघाले स्वर्गाच्या सप्तपुरीमध्ये! बराच प्रवास विष्णूंना उत्तर न सापडल्याने ते हार पत्करून परत आले. तर ब्रह्मदेव स्पर्धा जिंकण्याच्या नादात पाताळात शिवलिंगाचा उगम आहे असे सांगत कैलासाकडे आले. येताना त्यांनी केतकीचे फुल साक्षीदार म्हणून आले.

Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
स्पर्धा जिंकण्यासाठी ब्रह्मदेवांनी खोटे बोलले हे महादेवांना आवडले नाही, म्हणून त्यांनी ब्रह्मदेवाचे शीर धडावेगळे केले आणि खोटी साक्ष देणाऱ्या केतकीच्या फुलाला शाप दिला, की तू कितीही सुंदर असलीस तरी माझ्या पूजेमध्ये तुझा समावेश होणार आहे.
तेव्हापासून केतकीचे फुल इतर पूजेमध्ये समाविष्ट केले जाते पण चुकूनही महादेवांना वाहिले जात नाही. या पौराणिक कथेची सत्यअसत्यता माहित नाही पण कथेचे तात्पर्य हेच सांगते की आपला स्वार्थ साधायचा म्हणून कधीही खोटे बोलू नका, तसे करणे तुमच्या हिताचे तर नसतेच शिवाय परमेश्वरालाही ते आवडत नाही!