शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

Shravan Shukrawar 2023: श्रावण शुक्रवारी जिवतीला दाखवा पुरणपोळी आणि कटाच्या आमटीचा नैवेद्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 07:00 IST

Shravan Shukrawar 2023: कणिक आणि मैदा समप्रमाणात वापरून केलेली पुरणपोळी अधिक लुसलुशीत होते आणि कटाच्या आमटी बरोबर उत्तम लागते; वाचा दोन्ही रेसेपी!

श्रावण मास सुरू होताच नैवेद्याची सिद्धी होऊ लागते. जशा आपल्या आवडी निवडी असतात, तशा देवाच्याही आवडी निवडी आपण जपण्याचा प्रयत्न करतो. श्रावण शुक्रवारी जिवतीच्या पूजेचे महत्त्व असते. तिच्या स्वागतासाठी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून कटाच्या आमटीचा बेत केला तर या दिवसाची गोडी अधिकच वाढेल. पुरण केल्यावर तळण ओघाने आलेच. त्यासाठी आपण पापड, कुरडाया, भजीची जोड देऊ शकता. मात्र त्याबरोबर पुरणाचे पातेले रिकामे झाले की त्याला लगडलेल्या चमचाभर पुराणातून कटाची चविष्ट आमटी कशी बनवायची तेही जाणून घेऊ. या दोन्ही रेसेपी वैदेही भावे यांच्या चकली ब्लॉगस्पॉटवरून आपण फॉलो करत आहोत. 

पुरणपोळी 

साहित्य:१ कप चणाडाळ१ कप किसलेला गूळएक कप मैदा१/२ कप गव्हाचे पिठ७ ते ८ टेस्पून तेल१ टिस्पून वेलचीपूडकोरडे तांदुळाचे पीठ

कृती:१) चणाडाळ कूकरमध्ये चणाडाळीच्या अडीचपट पाणी घालून शिजवून घ्यावे. डाळ शिजली कि त्यातील पाणी निथळू द्यावे. हे पाणी वापरून कटाची आमटी करता येते.२) डाळीतील पाणी निघून गेल्यावर हि डाळ पातेल्यात घ्यावे. त्यात किसलेला गूळ घालावा. मध्यम आचेवर हे मिश्रण आटवावे. आटवताना ढवळत राहावे. जर ढवळायचे थांबवले मिश्रण पातेल्याला लागून करपू शकते. या पुरणात १ चमचा वेलचीपूड घालावी.३) मिश्रण घट्टसर झाले कि पातेले गॅसवरून उतरवावे. मिश्रण पुरणयंत्रातून फिरवून घ्यावे.४) मैदा आणि कणिक मिक्स करून त्यात ५-६ चमचे तेल घालावे. आणि सैलसर मळून घ्यावे. भिजवलेले पिठ २ तास मुरू द्यावे.५) पुरणाचे दिड इंचाचे गोळे बनवून घ्यावे. मैद्याचा अर्धा ते एक इंचाचा गोळा घ्यावा व त्याची पातळसर पारी बनवून घ्यावी. त्यात पुरणाचा गोळा भरावा. सर्व बाजूंनी बंद करून घ्यावा.६) पोळपाटावर थोडी तांदुळाची पिठी घेउन हलक्या हाताने पोळी लाटून घ्यावी. तव्यावर खरपूस भाजून घ्यावी.साजूक तूप घालून गरम गरम सर्व्ह करावी. या पोळ्या टिकाऊ असतात. आठ एक दिवस सहज टिकतात. थंड पोळ्या दूधाबरोबर छान लागतात.

टीप:१) वेलचीऐवजी  जायफळपूड वापरू शकतो. त्याचा स्वादही चांगला येतो.

कटाची आमटी 

साहित्य:१/४ कप चणाडाळ (महत्त्वाची टीप १)::::ताजा कुटलेला मसाला::::१ टेस्पून सुक्या खोबर्‍याचा किस,१/२ टिस्पून जिरे,१ ते २ काळी मिरी,१ ते २ लवंगा,१ लहान तमालपत्र, आणिअगदी छोटा दालचिनीचा तुकडा (टीप २).फोडणीसाठी: २ टिस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, १/२ टिस्पून जिरे, चिमूटभर हिंग, १/४ टिस्पून हळद, १/२ टिस्पून लाल तिखट, ४ कढीपत्ता पाने१ टिस्पून गोडा मसाला१ टेस्पून चिंचेचा घट्ट कोळ१ टेस्पून गूळ१ टेस्पून ओला खवलेला नारळ२ टेस्पून चिरलेली कोथिंबीरचवीपुरते मिठ

कृती:१) चणाडाळ कूकरमध्ये नेहमीप्रमाणे मऊसर शिजवून घ्यावी.२) खोबर्‍याचा किस, जिरे, मिरी, लवंगा, दालचिनी आणि तमालपत्र असे वेगवेगळे मंद आचेवर थोडावेळ भाजून घ्यावे. खलबत्त्यात कुटून त्याची पूड करावी.३) चणाडाळ व्यवस्थित घोटून घ्यावी. एका पातेल्यात तेल गरम करून, मोहोरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट, कढीपत्ता घालून फोडणी करावी. त्यात डाळ फोडणीस घालावी. गरजेनुसार पाणी घालावे.४) आमटीला उकळी फुटली कि कुटलेला मसाला चमचाभर घालावा आणि गोडा मसाला घालावा. ढवळून चिंचेचा कोळ आणि गूळ घालावे. चवीपुरते मिठ घालावे. आमटी घट्ट वाटल्यास थोडे पाणी वाढवावे.५) एका उकळीनंतर आमटीची चव पाहावी गरज वाटल्यास कुटलेला मसाला घालून थोडावेळ उकळावे.६) ओलं खोबरं आणि चिरलेली कोथिंबीर घालून एकदोन मिनीट मंद आचेवर उकळावी.हि आमटी पुरणपोळी खाताना तोंडी लावणी म्हणून घेतात तसेच गरमागरम तूपभातावर हि आमटी अप्रतिम लागते.तसेच हि आमटी आदल्या दिवशी करून दुसर्‍या दिवशी खाल्ली तर छान मुरते आणि अजून चविष्ट लागते.

टीप:१) हि आमटी बर्‍याचदा पुरणपोळी केली कि करतात. जर तुम्ही पुरणपोळी करणार असाल तर चणाडाळ शिजवताना थोडे जास्त पाणी घालून डाळ शिजवावी. पाणी वाडग्यात निथळून घ्यावे. जर निथळलेले पाणी १ कप असेल तर १/२ कप शिजवलेली डाळ बाजूला काढावी आणि वर दिलेल्या कृतीनुसार (स्टेप २ पासून) आमटी करावी.२) दालचिनीच्या तुकड्याऐवजी दालचिनीची पूड मिळते तीसुद्धा वापरली तरी चालेल, ती न भाजता थेट आमटीत घालावी.चिमूटभरच वापरावी.३) ताजा कुटलेला मसाला वापरल्याने चव अप्रतिम येते. थोडी मेहनत पडली तरी ताजा मसाला वापरल्याने चवीत खुपच फरक पडतो. जर हा मसाला वापरायचा नसेल तर १ टिस्पून ऐवजी २ टिस्पून गोडा मसाला वापरावा.४) बरेचजण वेगळ्या पद्धतीने हि आमटी बनवतात. घोटलेली डाळ पाणी घालून सारखी करावी त्यात गूळ, चिंच कोळ, फ्रेश कुटलेला मसाला, गोडा मसाला, मीठ, खवलेला नारळ असे एकत्र करून पातेल्यात उकळत ठेवावी. छोट्या कढल्यात फोडणी करून ती वरून घालावी आणि अजून थोडावेळ उकळी काढावी.५) काहीजणांना या आमटीत कांद्याची चव आवडते, अशावेळी फोडणीत बारीक चिरलेला कांदा (१/२ कप) घालून परतावे.

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलfoodअन्न