Shani Dev: शनी देवाचे मकर राशीत मार्गस्थ होणे ठरणार लाभदायी; पाळा 'ही' पथ्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 12:37 PM2022-10-24T12:37:24+5:302022-10-24T12:39:18+5:30

Astrology: गुरुंचे आपल्या आयुष्यात जे स्थान असते, तेच शनी देवाचे आपल्या कुंडलीत असते. त्यांच्या स्थलांतराचे महत्त्व जाणून घ्या!

Shani Dev: Transit of Shani Dev in Capricorn will be beneficial; Follow this regimen! | Shani Dev: शनी देवाचे मकर राशीत मार्गस्थ होणे ठरणार लाभदायी; पाळा 'ही' पथ्य!

Shani Dev: शनी देवाचे मकर राशीत मार्गस्थ होणे ठरणार लाभदायी; पाळा 'ही' पथ्य!

googlenewsNext

>> संकलन: सौ. अस्मिता दीक्षित 

आपल्या आयुष्यात अनेक अचंबित करणाऱ्या अनाकलनीय घटना घडत असतात . अचानक माणसे आपल्या आयुष्यात येतात ,अचानक निघूनही जातात. एखाद्या व्यक्तीशिवाय आपण जगू शकणार नाही असे आपल्याला वाटत राहते त्या व्यक्तीला तितक्याच सहजपणे आपण कधी विसरून जातो ते आपल्यालाही समजत नाही. एखाद्या गोष्टीचा इतकं अट्टाहास करतो तीच गोष्ट काही दिवसांनी नकोशी वाटू लागते . एखादी मैत्री कमी काळात इतकी घट्ट होते आणि काही दिवसात ती जणू अळवावरचे पाणी ठरते .अनेकदा एखादी घटना हमखास घडणार असे वाटते पण तो आपला भ्रम ठरतो . ह्या सगळ्याचा वेध घेतला तर एक लक्ष्यात येते कि एक शक्ती आहे जी आपल्या अवकाल्नाच्या खूप पलीकडे आहे आणि तिच्या हातात सगळ्याची सूत्रे आहेत, मग त्या शक्तीला कुणी काहीही नाव द्या पण ती आहे. दिसत नाही पण अनुभवता येते . 

अध्यात्मात प्रचंड ताकद आहे. आपले सद्गुरू आपल्या मागे सदैव प्रत्येक क्षणी उभे असतात , जेव्हा आपल्यावर एखादा प्रसंग येणार असतो तेव्हा ते आपल्यासमोर उभे ठाकतात आणि सर्व निभावून नेतात .आपल्याला जे दिसत नाही ते त्यांना दिसते , आपल्याला जे ऐकू येत नाही ते त्यांना ऐकू येते आणि म्हणूनच ते आपल्यासाठी काहीतरी वेगळे प्लान करत असतात जे आपल्या भल्यासाठीच असतात . म्हणूनच एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून अचानक निघून गेली तर ती त्यांनीच केलेली लीला समजायला हरकत नाही . कारण ते त्रिकालज्ञानी आहेत सर्वेसर्वा आहेत . आपला त्यांच्यावरील विश्वास अभेद्य आणि अखंड असला पाहिजे .

ह्या सर्व घटनांमध्ये दडलेला विलक्षण अर्थ सर्व सामान्य व्यक्तीच्या बुद्धीच्या विचारांच्या पलीकडे असल्यामुळे त्यांना प्रचंड दुक्ख होते ,वाईट वाटते पण जसजशी आपली साधना वाढते तसे आपल्याला ह्या घटनांच्या मागील अर्थ उमगतो . दुसऱ्यामुळे आपले आणि आपल्यामुळे दुसऱ्याचे होणारे नुकसान त्यांनी थांबवलेले असते हे जाणवते आणि आपण मनात त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. एखादी व्यक्ती अचानक आपल्या आयुष्यातून निघून का गेली ह्याचे उत्तर शोधण्यात आपल्या साधनेचा वेळ साधक घालवणार नाहीत . जे होते आहे आणि होणार आहे ते त्यांच्याच इच्छेने हि भावना म्हणजेच आपली सद्गुरूंवर असलेली निष्ठा होय .

एकदा एक माणूस आपल्या कुटुंबासमवेत बाहेरगावी जाणार होता . सर्व तयारीनिशी त्याच्या गाडी जवळ येतो आणि बघतो तर त्याची गाडीच गायब . शेवटी त्याची तक्रार पोलिसात करून तो ट्रेनने रवाना होतो. चार दिवसांनी घरी आल्यावर त्याची गाडी नेहमी असते तिथेच उभी असलेली त्याला बघायला मिळते , एक थेंब सुद्धा पेट्रोल कमी झालेले नसते कि गाडीला एकही ओरखडा नसतो. आता सुज्ञास सांगणे न लगे . 

एकदा त्यांच्या शाळेत नाव घातले कि निर्धास्त राहायचे, चुकले तर माफी मागायचीही लाज वाटायला नको . संत हे त्रिकालज्ञानी आहेत आणि त्यांच्या तेजोमय अस्तित्वाने आपल्याला ते मार्गस्थ करत असतात.

आज शनी सारखा बलाढ्य ग्रह सुद्धा मकर राशीत मार्गस्थ होत आहे. मार्गी होणे म्हणजे तुमच्या अडलेल्या कामात तुम्हाला मार्ग मिळणे . शनीने आपल्या वक्री अवस्थेत सगळ्यांचे लगाम खेचून धरले होते आता सगळ्यांच्या कामाला गती येईल. अर्थात सचोटी , कष्ट , साधना , नम्रता आणि प्रयत्नांची पराकाष्टा करतील त्यांच्याच पाठीवार शनी सारख्या ग्रहाची शाबासकीची थाप पडेल. तुम्हा आम्हा सर्वांवर सद्गुरूंची कृपा अशीच बरसत राहुदे .

संपर्क : 8104639230

Web Title: Shani Dev: Transit of Shani Dev in Capricorn will be beneficial; Follow this regimen!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.