शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी नवरात्रीत मंगळवारी करा 'अशी' उपासना; लाल वस्त्राला असते अधिक महत्त्व
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 07:05 IST2025-12-30T07:00:01+5:302025-12-30T07:05:01+5:30
Shakambhari Navratri 2025: यंदा २८ डिसेंबर ते ३ जानेवारी शाकंभरी देवीचा उत्सव असणार आहे, त्यात आजचा मंगळवार उपासनेसाठी अधिक लाभदायी ठरेल, कसा ते पाहा.

शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी नवरात्रीत मंगळवारी करा 'अशी' उपासना; लाल वस्त्राला असते अधिक महत्त्व
ज्यांची कुलदेवी श्रीशाकंभरी देवी आहे, व ज्यांना शाकंभरी देवीचा काहीच कुळाचार माहिती नाही त्यांनी ही उपासना कुळाचार म्हणून केली तरी चालेल अशा दोन्हीसाठी कुलकर्णी गुरुजी यांनी उपासना दिली आहे.
मकर राशीसाठी नवीन वर्ष 2026: जुन्या आव्हानांचा होणार अंत; प्रगतीसाठी 'हे' सूत्र वापरा आणि यश मिळवा!
शाकंभरी नवरात्र सुरू झाल्यावर येणाऱ्या मंगळवारी लाल रंगाचे सोवळे नेसावे व शाकंभरी देवीच्या फोटो, मूर्ती, किंवा टाकाची यथासांग अभिषेक, धूप, दीप, गंध, नैवेद्य, आरती, या पद्धतीने आधी पूजा करून घ्यावी. त्यानंतर देवीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावून खालील मंत्राचा 108 वेळा जप करावा. उपासनेची वेळ ही सकाळ किंवा संध्याकाळ कोणतीही ठेऊ शकता परंतु एकदा वेळ ठरवली की त्यामध्ये कोणताही बदल करू नये. ठरलेल्या वेळी अंघोळ करून उपासना सुरू झालीच पाहिजे. ह्या साधनेची सांगता पौष पोर्णिमा म्हणजेच शाकंभरी पोर्णिमेला करायची आहे.
पोर्णिमे दिवशी एका कुमारिकेला बोलवावे. कुमारिका अशी असावी जिला अद्याप मासिक पाळी सुरू झालेली नाही. ते बालस्वरूप देवीस्वरूप मानले जाते.
कुमारिका पूजन : अशी कुमारिका बोलवल्यावर सर्वात प्रथम त्या कुमारिकेचे पाय धुवून तिच्या पायावर कुंकुवाने स्वस्तिक काढून फूल व अक्षता वाहाव्यात. त्यानंतर नैवेद्य म्हणून यथाशक्ती जे काही भोजन बनवले असेल ते त्या कुमारिकेला पोटभर जेवू घालावे.
शक्यतो त्या दिवशी पूरण पोळीचा नैवेद्यच करावा, तो नाही जमल्यास चपाती किंवा पुरी व इतर मिक्स भाजीपाला वापरुन एखादी भाजी बनवून सोबत काहीतरी चांगले घोडधोड पदार्थ ठेवावेत.
धनु राशीसाठी नवीन वर्ष 2026: प्रगती आणि भाग्योदयाचे वर्ष; जोखीम घेण्याची वृत्ती देईल मोठे यश!
भोजन झाल्यावर लाल रंगाचा ड्रेस, किंवा पूर्ण पोशाख होईल असे ड्रेसचे कापड, किंवा फक्त लाल कापड, किंवा लाल रंगाची साडी घेऊन व त्यामध्ये 1 गजरा, 1 नारळ, थोडे तांदूळ, खारीक खोबरे, थोडा सुका मेवा, 1 लाल फूल, 5 प्रकारची फळे, व 101 रुपये दक्षिणा, तसेच त्या कुमारिकेला सौन्दर्य सजावटीचे काही समान, इत्यादि सर्व वस्तू साक्षात देवी समजून अर्पण कराव्यात व तिला साष्टांग नमस्कार करून आत्तापर्यंत कुळाचारात ज्या काही चुका झाल्या असतील त्याची माफी मागून ही भोळी सेवा मानून घेण्याची प्रार्थना करावी.
उपासनेचा मंत्र : ॐ ह्रीं श्रीं क्लीं भगवति अन्नपूर्णे नम:
संपर्क : 7387928628