Sankashti Chaturthi 2026: संकष्टीला चंद्रोदयापूर्वी न विसरता करा 'ही' ३ कामं; बाप्पा दूर करेल विघ्न!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 13:23 IST2026-04-04T13:21:47+5:302026-04-04T13:23:12+5:30
Sankashti Chaturthi 2026: यंदा रविवार ५ एप्रिल रोजी हिंदू नववर्षातील पहिली संकष्टी आली आहे, त्या मुहूर्तावर सुख, ऐश्वर्य, आरोग्य प्राप्तीसाठी दिलेले ३ उपाय करा.

Sankashti Chaturthi 2026: संकष्टीला चंद्रोदयापूर्वी न विसरता करा 'ही' ३ कामं; बाप्पा दूर करेल विघ्न!
५ एप्रिल २०२६ रोजी चैत्र महिन्यातील पहिली संकष्ट चतुर्थी आहे, जिला 'विकट संकष्ट चतुर्थी(Sankashti Chaturthi 2026) म्हटले जाते. नावाप्रमाणेच ही चतुर्थी आयुष्यातील 'विकट' किंवा कठीण संकटांचा नाश करणारी मानली जाते. विशेष म्हणजे या दिवशी रविवारची सुट्टी आहे, पण ही सुट्टी आळसात न घालवता जर तुम्ही बाप्पाची भक्ती केली, तर त्याचे फळ अनेक पटींनी मिळेल. या शुभ तिथीला तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य खेचून आणणारे ३ विशेष उपाय अजिबात चुकवू नका.
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
१. ब्रह्म मुहूर्तावरील विशेष 'ऊर्जा' साधना (पहाटे ४.३५ - ५.२१)
रविवारची सुट्टी असली तरी आळस झटका. पहाटे ४.३५ ते ५.२१ हा ब्रह्म मुहूर्ताचा काळ आहे. या काळात ब्रह्मांडात सर्वोच्च पातळीवर सकारात्मक ऊर्जा कार्यन्वित असते.
काय करावे: या वेळेत उठून स्नान करा आणि 'ॐ गं गणपतये नमः' या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. स्नान शक्य नसले तरी जप चुकवू नका.
ध्यान: बाप्पाच्या 'विकट' रूपाचे अर्थात विघ्नहर्ता मूर्तीचे डोळे मिटून ध्यान करा. हे ध्यान तुमच्या कोणत्याही क्षेत्रातील (नोकरी, व्यवसाय किंवा वैयक्तिक) संकटांचे निवारण करण्यासाठी अत्यंत शक्तिशाली ठरेल.
२. चंद्र दर्शन आणि अर्घ्य विधी (चंद्रोदय रात्री ९.४७)
संकष्ट चतुर्थीचे व्रत हे चंद्रदर्शनाशिवाय पूर्ण होत नाही. यंदा संकष्टीला चंद्रोदय रात्री ९.४७ मिनिटांनी होणार आहे.
व्रत: सूर्योदयापासून रात्री चंद्रोदयापर्यंत उपवास करावा. शक्यतो फलाहाराव्यतिरिक्त काही खाऊ नये आणि उपासनेत मन गुंतवावे.
उपाय: चंद्रोदय झाल्यावर चंद्राला दूध आणि पाण्याचे मिश्रण करून अर्घ्य द्यावे.
फायदा: या उपायाने मनातील अस्वस्थता, उद्विग्नता किंवा नैराश्य नष्ट होऊन तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
३. उंबरठ्यावर तुपाचा दिवा आणि नकारात्मकता निवारण
संध्याकाळची वेळ ही घरात लक्ष्मी येण्याची आणि नकारात्मकता बाहेर जाण्याची असते.
वेळ: संध्याकाळी ६.४० ते ७.०० च्या दरम्यान हा उपाय करावा.
काय करावे: घराच्या मुख्य उंबरठ्यावर शुद्ध तुपाचा दिवा लावावा. यामुळे घरातील सगळी नकारात्मक ऊर्जा आणि वास्तुदोष निघून जातात.
नैवेद्य: चंद्रोदय झाल्यानंतर बाप्पाची मनोभावे आरती करून त्याला आवडणाऱ्या मोदकाचा नैवेद्य अर्पण करावा.
हे व्रत आणि वरील ३ उपाय श्रद्धेने केल्यास तुम्हाला उत्तम आरोग्य, ऐश्वर्य आणि मानसिक शांती प्राप्त होईल. नवीन वर्षाची ही पहिली संकष्टी तुमच्यासाठी 'विघ्नहर्ता' ठरेल.