संकष्ट चतुर्थी २०२६: बाप्पाची कृपा आणि संकटांचा अंत! हिंदू वर्ष संपण्यापूर्वी 'हा' एक विधी तुमचं नशीब पालटू शकतो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 11:40 IST2026-03-05T11:33:56+5:302026-03-05T11:40:31+5:30
Sankashti Chaturthi 2026: ६ मार्च रोजी फाल्गुन महिन्यातील भालचंद्र संकष्ट चतुर्थी आहे, हिंदू नवे वर्ष संकटमुक्त होण्यासाठी दिलेले उपाय करा आणि चुकवू नका चंद्रोदयाची वेळ!

संकष्ट चतुर्थी २०२६: बाप्पाची कृपा आणि संकटांचा अंत! हिंदू वर्ष संपण्यापूर्वी 'हा' एक विधी तुमचं नशीब पालटू शकतो
हिंदू वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन आणि या वर्षातील शेवटची भालचंद्र संकष्ट चतुर्थी(Sankashti Chaturthi 2026) ६ मार्च २०२६ रोजी आहे. 'भाल' म्हणजे कपाळ आणि 'चंद्र' म्हणजे शशी. ज्याच्या कपाळावर चंद्र विराजित आहे, अशा गणपतीच्या 'भालचंद्र' रूपाची पूजा केल्याने बुद्धी, शक्ती आणि यशाची प्राप्ती होते. जर तुमची कामे दीर्घकाळापासून रेंगाळली असतील किंवा कामात सतत अडथळे येत असतील, तर या संकष्टीला केलेले काही विशेष उपाय तुम्हाला निश्चितच यश मिळवून देऊ शकतात.
Numerology: आयुष्यात नक्की काय करायचंय? अंकशास्त्राच्या मदतीने शोधा तुमच्या जीवनाचं खरं ध्येय!
हिंदू पंचांगानुसार, संकष्ट चतुर्थी हा गणपतीची आराधना करण्याचा सर्वात उत्तम दिवस मानला जातो. त्यातही वर्षातील ही शेवटची संकष्टी असल्याने तिचे महत्त्व अधिक वाढते. जाणून घेऊया संकष्ट चतुर्थीचे खास उपाय आणि विधी:
१. यशाची पायाभरणी
सूर्योदयापूर्वी स्नान: या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे. यामुळे शरीरात सात्विक ऊर्जा संचारते.
दुर्वांचा हार: गणपतीला दुर्वा अत्यंत प्रिय आहेत. तीन दुर्वादलांच्या २१ गाठी बांधून त्यांचा एक सुंदर हार तयार करा आणि तो बाप्पाला अर्पण करा. असे केल्याने अडकलेल्या कामांना वेग मिळतो.
२. मंत्रशक्तीचा जागर
संध्याकाळी सूर्यास्तानंतर पुन्हा एकदा गणपतीची मनोभावे पूजा करावी.
मंत्र जप: बाप्पासमोर दिवा लावून 'ओम गं गणपतये नमः' या प्रभावी मंत्राचा १०८ वेळा जप करावा. हा मंत्र केवळ शब्द नसून ती एक शक्ती आहे, जी तुमच्या मार्गातील बाधा दूर करते.
३. चंद्रोदयाला पूजा
६ मार्च २०२६ रोजी चंद्रोदय रात्री ९ वाजून १९ मिनिटांनी होणार आहे.
चंद्रोदय झाल्यावर एका कलशात शुद्ध पाणी घेऊन त्यात थोडे दूध आणि अक्षता (तांदूळ) घाला. हे मिश्रण चंद्राला 'अर्घ्य' म्हणून अर्पण करा. यामुळे मानसिक शांती मिळते आणि नशिबाची साथ लाभते.
Vastu Tips: झोपताना उशाशी पाण्याची बाटली ठेवता? तुमची ही छोटी चूक ठरू शकते मोठ्या तणावाचं कारण!
या उपायांचे फळ काय?
असे मानले जाते की, वर्षातील शेवटच्या संकष्टीला हे नियम पाळल्याने वर्षभरातील कळत नकळत झालेले दोष दूर होतात. गणपतीच्या कृपेने घरातील नकारात्मकता (बाधा) हटते आणि नवीन कामांमध्ये विनाअडथळा यश मिळते.