सफला एकादशी २०२५: सफला एकादशीचा गुप्त उपाय! कागदावर ३ इच्छा लिहा, २०२६ ला इच्छापूर्तीचा अनुभव घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 11:46 IST2025-12-13T11:46:23+5:302025-12-13T11:46:35+5:30
Safala Ekadashi 2025: सोमवार, १५ डिसेंबर २०२५ रोजी सफला एकादशीचा अद्भुत योग आहे आणि त्यादिवशी आयुष्यातील ३ स्वप्ने पूर्ण करण्यासाची संधीही आहे!

सफला एकादशी २०२५: सफला एकादशीचा गुप्त उपाय! कागदावर ३ इच्छा लिहा, २०२६ ला इच्छापूर्तीचा अनुभव घ्या!
प्रत्येक एकादशीला भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते, परंतु मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला सफला एकादशी (Saphala Ekadashi) म्हणतात. नावातच 'सफल' (यशस्वी) असल्याने, या दिवशी केलेली पूजा आणि उपाय हे राहिलेल्या, अडलेल्या कामांमध्ये यश आणि अपूर्ण मनोकामनांची पूर्ती करतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
सोमवार, १५ डिसेंबर २०२५ रोजी आलेली सफला एकादशी(Safala Ekadashi 2025) तुमच्या २०२६ या वर्षाचे भाग्य बदलण्यासाठी अत्यंत खास आहे.
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
सफला एकादशीचे महत्त्व
सफला एकादशीचा दिवस हा यश आणि कामाच्या सिद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी भगवान विष्णूची आणि लक्ष्मीची पूजा केल्यास, भक्तांच्या सर्व अडचणी दूर होतात आणि त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होते.
या दिवशी पूजा केल्यास राहिलेली कामे पूर्ण होतात आणि अडथळे दूर होतात, अशी मान्यता आहे. विशेषतः या दिवशी पिवळ्या रंगाला आणि तुळशीला लक्ष्मी स्वरूप मानून पूजा केल्यास शुभ फल मिळते.
२०२६ मधील ३ स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रभावी उपाय
सफला एकादशीच्या दिवशी (सोमवार, १५ डिसेंबर २०२५) जर तुम्ही खालील उपाय श्रद्धेने केला, तर २०२६ च्या अखेरीस तुमच्या जीवनातील तीन प्रमुख इच्छा पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे.
Garud Puran: गरुड पुराणानुसार विवाह बाह्य संबंध ठेवणाऱ्यांना मिळते 'ही' भयानक शिक्षा!
१. देव दर्शन आणि पिवळ्या वस्तूंचे महत्त्व
देव दर्शन: या दिवशी सकाळी लवकर स्नान करून भगवान विष्णू, बालाजी किंवा विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घ्या.
नैवेद्य: देवाला पिवळ्या रंगाच्या मिठाईचा (उदा. बुंदी, बेसन लाडू किंवा पिवळ्या रंगाचे पेढे) नैवेद्य दाखवा.
पिवळे वस्त्र: तुमच्या देवघरात किंवा तुळशीजवळ पिवळ्या रंगाचे एक छोटे वस्त्र ठेवा. पिवळा रंग हा विष्णू आणि समृद्धीचे प्रतीक आहे.
२. इच्छापूर्तीचा गुप्त कागद
हा उपाय अत्यंत श्रद्धेने आणि शांत चित्ताने करायचा आहे:
कागद घ्या: एक पिवळा कागद (Yellow Paper) किंवा पिवळ्या रंगाची छोटी चिठ्ठी घ्या.
तीन स्वप्ने लिहा: या कागदावर २०२६ मध्ये तुमच्या आयुष्यात प्राधान्याने पूर्ण व्हावी अशी फक्त तीन स्वप्ने किंवा इच्छा स्पष्टपणे लिहा. (उदा. 'नोकरीत बढती मिळावी', 'घराचे काम पूर्ण व्हावे', किंवा 'आर्थिक स्थैर्य लाभावे').
मंत्र लिहा: त्यानंतर मोठ्या श्रद्धेने 'ओम विष्णवे नमः' हा मंत्र त्या खाली लिहा.
देवघरात ठेवा: हा पिवळा कागद काळजीपूर्वक दुमडून किंवा गुंडाळून आपल्या देवघरात किंवा पूजास्थळी अशा ठिकाणी ठेवा, जिथे तो सुरक्षित राहील.
Astro Tips: तिन्ही सांजेला 'या' ५ चुका करणे म्हणजे घरी आलेली लक्ष्मी परतावून लावणे!
हा उपाय अत्यंत सरळ आणि साधा आहे, परंतु त्याचे फळ प्राप्त होण्यासाठी श्रद्धा आणि सकारात्मकता अत्यंत आवश्यक आहे. सफला एकादशीच्या शुभ मुहूर्तावर हा उपाय करून पाहा आणि २०२६ च्या अखेरीस तुमची स्वप्ने पूर्ण झालेली अनुभवा. याबाबत डॉ. योगेश शर्मा यांचा व्हिडीओ पाहा -