Ritual: पानाच्या टपरीवर का असते शंकराची पितळी मूर्ती? धार्मिक मान्यता की आणखी काही?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 12:32 IST2025-11-17T12:30:06+5:302025-11-17T12:32:41+5:30
Ritual: पान टपरी कितीही छोटी असो नाहीतर मोठी, तिथे शंकराची मूर्ती का असते, हा प्रश्न तुम्हालाही कधी पडला असेल तर हे घ्या उत्तर!

Ritual: पानाच्या टपरीवर का असते शंकराची पितळी मूर्ती? धार्मिक मान्यता की आणखी काही?
पानाचे शौकीन सगळेच असतात असे नाही, पण अनेकदा जेवण झाल्यावर पान खाण्याची लहर येते. तेव्हा पान पटरीकडे कूच केली जाते आणि पान तयार होईपर्यंत शंकराची सुंदर पितळी मूर्ती आपले लक्ष वेधून घेते. सगळ्या पान पटरी वाल्यांचे आराध्य दैवत शंकरच कसे काय, हा प्रश्न मनात घोळतो आणि त्यावर माहिती शोधल्यावर पुढील उत्तर सापडते.
हिंदू धर्मातील मान्यतेनुसार, विड्याचे पान भगवान शिवशंकरांना अत्यंत प्रिय आहे. पूजेमध्ये याचा उपयोग करणे खूप शुभ मानले जाते आणि यामुळे भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात, असा भाविकांचा अनुभव आहे. त्यामुळे पान विक्रीचा व्यवसाय करणारे महादेवाची कृपा व्हावी म्हणून आपल्या ठेल्यावर सुंदर शंकर मूर्ती ठेवतात आणि दिवसभरातला पहिला विडा/पान शंकराला अर्पण करतात. त्याच्या कृपेने व्यवसायात बरकत व्हावी हा त्यामागचा हेतू असतो.
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
म्हणूनच इतर भाविकांनीही सोमवारी महादेवाला विड्याचे पान वाहावे असे म्हटले जाते. त्याचे लाभ जाणून घेऊ आणि शिवपूजेत त्याचा समावेश करू.
शिवलिंगावर पान अर्पण केल्याने होणारे लाभ:
शिवलिंगावर विड्याचे पान अर्पण केल्याने साधकाच्या जीवनातील अनेक अडचणी आणि संकटे दूर होतात. हे पान अर्पण करण्याचे प्रमुख फायदे खालीलप्रमाणे आहेत:
१. संकटांपासून मुक्ती: भोलेनाथांना पान अर्पण केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटे दूर होऊ लागतात. कामांमध्ये येणाऱ्या बाधा आणि अडथळ्यांपासून मुक्ती मिळते.
२. मनोकामना पूर्ती: जर तुमची कोणती इच्छा दीर्घकाळापासून पूर्ण होत नसेल, तर शिवलिंगावर विड्याचे पान अर्पण करणे अत्यंत शुभ फलदायी ठरते. असे केल्याने साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ लागतात.
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार...
३. कार्यात यश: तुम्हाला तुमच्या कामात दीर्घकाळापासून यश मिळत नसेल किंवा तुमची कामे वारंवार थांबत असतील, तर शिवलिंगावर पान अर्पण करणे उपयुक्त ठरते. यामुळे थांबलेली कामे मार्गी लागतात आणि कार्यात यश मिळण्याचे मार्ग मोकळे होतात.
४. आर्थिक स्थिती मजबूत: भगवान शंकराच्या पूजेदरम्यान शिवलिंगावर विड्याचे पान अर्पण केल्यास आर्थिक स्थिती मजबूत होऊ लागते. यामुळे घरात धन-धान्याची प्राप्ती होते आणि समृद्धीचे आगमन होते.
सोमवारी विशेष उपाय:
जर तुम्ही सोमवारी विड्याच्या पानावर थोडे चंदन लावून ते शिवलिंगावर अर्पण केले, तर जीवनातील सर्व कष्ट आणि समस्या दूर होतात. तसेच, कुटुंबात सुख-समृद्धी टिकून राहते, असे म्हटले जाते.
यामुळे, भगवान शंकराची कृपा मिळवण्यासाठी आणि जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी, पूजेमध्ये विड्याच्या पानाचा वापर करणे अत्यंत शुभ मानले जाते, असे धर्मग्रंथात म्हटले आहे.