Ritual: आजारपण आणि दारिद्र्य तुमच्या घराचा रस्ता विसरतील! जेवणापूर्वी करा 'हा' विधी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 13:32 IST2026-03-27T13:32:52+5:302026-03-27T13:32:52+5:30

Ritual : चांगल्या सवयी लावून घ्याव्या लागतात, जेवणाआधी लावलेली ही सवय तुम्हाला दीर्घकाळ लाभ देणारी आहे, त्याबद्दल जाणून घेऊ. 

Ritual: Sickness and poverty will forget the way to your home! Do this ritual before meals! | Ritual: आजारपण आणि दारिद्र्य तुमच्या घराचा रस्ता विसरतील! जेवणापूर्वी करा 'हा' विधी!

Ritual: आजारपण आणि दारिद्र्य तुमच्या घराचा रस्ता विसरतील! जेवणापूर्वी करा 'हा' विधी!

आजच्या धावपळीच्या युगात आपण टीव्ही पाहत किंवा मोबाईल स्क्रोल करत जेवण करतो. यामुळे अन्नातील ऊर्जा आपल्याला पूर्णपणे मिळत नाही. शास्त्रानुसार, जेवणापूर्वी 'चित्राहूती' किंवा अन्नाचे पूजन केल्याने त्यातील 'अन्नदोष' दूर होतात.

Numeroloy: अंकशास्त्र सांगतंय तुमच्या जन्मतारखेचं गुपित; तुमचं मॅजिकल गिफ्ट तुम्हाला माहित आहे का?

आपल्या भारतीय संस्कृतीत अन्नाला 'पूर्णब्रह्म' मानले गेले आहे. आपण काय खातो यापेक्षा ते कशा भावनेने खातो, याला शास्त्रात फार मोठे महत्त्व आहे. जेवणापूर्वी केवळ एक मिनिट काढून केलेला एक छोटासा विधी तुमच्या आरोग्यावर आणि आयुष्यावर सकारात्मक परिणाम करू शकतो.

विधी: कसा करावा हा उपाय?

१. जेवायला बसल्यानंतर ताटासमोर शांत चित्ताने बसा.
२. हातात चमचाभर शुद्ध पाणी घ्या.
३. ते पाणी आपल्या अन्नाच्या ताटाभोवती (घड्याळाच्या काट्याच्या दिशेने) फिरवा.
४. त्यानंतर खालील पवित्र श्लोकाचे मनोभावे पठण करा:

अन्नं ब्रह्म रसो विष्णुः, भोक्ता देवो जनार्दनम।
एवं ध्यात्वा, तथा ज्ञात्वा, अन्नदोषो न लिप्यते ॥

 

५. श्लोक म्हणून झाल्यावर ते पाणी पिऊन टाका, देवाचे स्मरण करा आणि आनंदाने भोजनाला सुरुवात करा.

Vastu Tips: केवळ शोभेसाठीच नाही, तर नशिबासाठीही! घराच्या भिंतीवर कोणतं चित्र असावं? वाचा वास्तू गुपित

श्लोकाचा अर्थ आणि महत्त्व

अन्नं ब्रह्म: अन्न हे साक्षात 'ब्रह्म' (निर्माता) आहे.

रसो विष्णुः: अन्नातील रस किंवा चव हा 'विष्णू' (पालनकर्ता) आहे.

भोक्ता देवो जनार्दनम: हे अन्न ग्रहण करणारा जो आत्मा आहे, तो 'जनार्दन' (ईश्वर) आहे.

अन्नदोषो न लिप्यते: अशी भावना ठेवून जेव्हा आपण जेवण करतो, तेव्हा त्या अन्नासोबत आलेले कोणतेही दोष (नकारात्मक ऊर्जा) आपल्याला बाधत नाहीत.

आरोग्य प्राप्ती: जेव्हा आपण शांत मनाने आणि देवाचे नाव घेऊन जेवतो, तेव्हा पचनसंस्था सुधारते आणि शरीर व्याधीमुक्त राहते.

Chankya Niti: जगात फसवणूक टाळायचीय? मग चाणक्य नीतीनुसार चतुर व्यक्तीची 'ही' १० लक्षणे नक्की शिकून घ्या!

दारिद्र्य निवारण : अन्नाचा सन्मान केल्याने माता अन्नपूर्णा आणि लक्ष्मी प्रसन्न होते, ज्यामुळे घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही.

मानसिक शांती : कृतज्ञता व्यक्त करून जेवल्यामुळे मनातील चिडचिड, तणाव आणि दुःख दूर होऊन जीवनात समाधान लाभते.

Web Title : भोजन से पहले करें ये अनुष्ठान, दूर होंगे रोग और दरिद्रता!

Web Summary : भोजन से पहले एक सरल अनुष्ठान, जिसमें प्रार्थना और पानी शामिल है, नकारात्मक ऊर्जाओं को दूर करके और कृतज्ञता को बढ़ावा देकर स्वास्थ्य, समृद्धि और मानसिक शांति पर सकारात्मक प्रभाव डाल सकता है।

Web Title : Ritual before meals banishes illness, poverty from your home!

Web Summary : Performing a simple ritual before meals, involving a prayer and water, can positively impact health, prosperity, and mental peace by removing negative energies and fostering gratitude.