Ritual: एखाद्याची खोटी शपथ घेतल्याने ती व्यक्ती खरोखरंच मरते का? जाणून घ्या गंभीर परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 13:28 IST2026-01-08T13:27:19+5:302026-01-08T13:28:04+5:30
Ritual: खोट्या शपथेने खरंच कोणाचा मृत्यू होतो का? प्रिय व्यक्तीचं आयुष्य धोक्यात टाकण्याआधी 'हे' वाचा

Ritual: एखाद्याची खोटी शपथ घेतल्याने ती व्यक्ती खरोखरंच मरते का? जाणून घ्या गंभीर परिणाम
दैनंदिन जीवनात अनेकदा स्वतःला खरं सिद्ध करण्यासाठी लोक सहजपणे कोणाचीही शपथ घेतात. "तुझी शपथ", "आईची शपथ" किंवा "देवाची शपथ" हे शब्द आजकाल अगदी संवादाचा भाग बनले आहेत. पण एखाद्याची खोटी शपथ घेतल्याने खरंच त्या व्यक्तीचा मृत्यू होतो का? हा प्रश्न अनेकांच्या मनात भीती निर्माण करतो.
Makar Sankranti 2026: यंदा 'संक्रांत' कोणावर? जाणून घ्या तिचे वाहन, वस्त्र, शस्त्र आणि राशीभविष्य!
शपथ किंवा प्रतिज्ञा ही आपल्या संस्कृतीत अत्यंत पवित्र मानली गेली आहे. "प्राण जाय पण वचन न जाय" हे ब्रीदवाक्य जपणारा आपला इतिहास आहे. भीष्म पितामह यांनी घेतलेली प्रतिज्ञा त्यांनी मरेपर्यंत पाळली, म्हणूनच आजही आपण 'भीष्मप्रतिज्ञा' हा शब्द आदराने वापरतो. पण आजच्या स्वार्थी जगात, स्वार्थापोटी किंवा एखाद्याला फसवण्यासाठी लोक सहज खोट्या शपथा घेतात.
खोट्या शपथेमुळे समोरची व्यक्ती मरते का?
सर्वसाधारणपणे भीती अशी असते की, ज्याची शपथ घेतली ती व्यक्ती दगावेल. कथाकार शिवम साधक यांच्या मते, खोटी शपथ घेतल्याबरोबर समोरची व्यक्ती लगेच मरते असे नाही, परंतु त्याचे परिणाम अत्यंत भयानक आणि विनाशकारी असतात. शपथेचा प्रभाव हा केवळ शब्दांपुरता मर्यादित नसून तो ऊर्जेशी संबंधित असतो.
शुक्र गोचर २०२६: शनीच्या राशीत शुक्राचा प्रवेश; 'या' राशींच्या नशिबात संक्रांतीपूर्वीच मोठा धमाका!
खोट्या शपथेचे ५ विपरीत परिणाम (शिवम साधक यांच्या मते):
१. मानसन्मान कमी होणे: जो माणूस खोटी शपथ घेतो, त्याचे समाजातले वजन आणि प्रतिष्ठा हळूहळू नष्ट होते. लोकांचा त्याच्यावरील विश्वास उडतो.
२. कुंडली दोष आणि नशीब: अध्यात्मिक दृष्टिकोनातून, खोटी शपथ घेतल्याने व्यक्तीच्या कुंडलीत अशुभ योग निर्माण होतात. भाग्याची साथ मिळणे बंद होते आणि कामात अडथळे येऊ लागतात.
३. आरोग्यावर परिणाम: खोटी शपथ घेणारी व्यक्ती आणि ज्याची शपथ घेतली जाते, या दोघांच्याही आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. अज्ञात भीती, मानसिक दडपण आणि शारीरिक व्याधी जडू शकतात.
४. आर्थिक समस्या: खोटेपणाचा आधार घेऊन घेतलेली शपथ लक्ष्मीला अप्रिय असते. अशा घरात किंवा व्यक्तीकडे पैसा टिकत नाही आणि दरिद्रता येऊ लागते.
५. संघर्षमय जीवन: ज्याची खोटी शपथ घेतली जाते, त्या व्यक्तीच्या आयुष्यातही विनाकारण संघर्ष आणि कटकटी वाढतात. ती ऊर्जा त्या व्यक्तीला त्रासदायक ठरू शकते.
घोरकष्टोद्धारण स्तोत्र: कर्ज आणि संकटांनी वेढला आहात? मग 'हे' एक स्तोत्र तारेल तुमची जीवन नौका!
शपथ घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा
शिवम साधक सांगतात की, शपथ ही एक मोठी शक्ती आहे. ती जाणीवपूर्वक घेतली पाहिजे.
शपथ घेण्याआधी विचार करा: खरंच शपथ घेण्याची गरज आहे का? हे स्वतःला विचारा.
प्रतिज्ञा पाळा: जर एकदा शपथ घेतली, तर ती प्राणपणाने पूर्ण करण्याची तयारी ठेवा.
सवय सोडा: उगीचच संभाषणात आई-वडिलांची किंवा मुलांची शपथ घेण्याची सवय असल्यास ती वेळीच थांबवा. पाहा व्हिडिओ -