Ritual: सावधान! हातातील पूजेचा धागा 'इतक्या' दिवसांनंतर बनतो नकारात्मक ऊर्जेचं कारण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 14:47 IST2026-01-07T14:45:37+5:302026-01-07T14:47:38+5:30
Kalawa Tying Ritual and Importance: अनेक जण पूजेत, धार्मिक स्थळी गेल्यावर केशरी पिवळा धागा बांधून घेतात, पण तो तुटेपर्यंत काढत नाहीत; मग तो कधी काढावा? जाणून घ्या!

Ritual: सावधान! हातातील पूजेचा धागा 'इतक्या' दिवसांनंतर बनतो नकारात्मक ऊर्जेचं कारण!
धार्मिक विधी किंवा पूजेनंतर मनगटावर बांधलेला लाल धागा (ज्याला आपण कलावा किंवा मौली म्हणतो) हा केवळ एक दोरा नसून ते एक संरक्षणात्मक कवच मानले जाते. पण हा धागा हातावर किती दिवस ठेवावा? यावर भागवत निरूपणकार डॉ. शिवम साधक यांनी दिलेला सल्ला अत्यंत महत्त्वाचा आहे.
Numerology: तुमचा जोडीदार तुमच्या आयुष्यात कोणत्या 'हेतूने' आला? याचे गुपित जन्मतारखेवरुन कळणार!
आपल्याकडे कोणत्याही शुभ कार्यात, पूजेत किंवा मंदिरात गेल्यानंतर मनगटावर मंत्रोपचारासह कलावा किंवा मौली बांधली जाते. हा धागा आपल्याला संकटांपासून वाचवतो आणि सकारात्मक ऊर्जा देतो, अशी आपली श्रद्धा आहे. मात्र, अनेक लोक हा धागा महिनानुमहिने, तो आपोआप तुटेपर्यंत हातावर तसाच ठेवतात. प्रसिद्ध आध्यात्मिक अभ्यासक डॉ. शिवम साधक यांच्या मते, ही पद्धत चुकीची ठरू शकते.
२१ दिवसांचा नियम:
डॉ. शिवम साधक यांच्या मते, पूजेच्या धाग्यामध्ये असलेली मंत्रशक्ती आणि सकारात्मक ऊर्जा एका ठराविक काळापर्यंतच प्रभावी असते. त्यांच्या मार्गदर्शनानुसार:
२१ दिवसांची मर्यादा: पूजेच्या वेळी बांधलेला धागा जास्तीत जास्त २१ दिवसच मनगटावर ठेवावा.
सकारात्मकतेचा प्रभाव: मंत्रांच्या उच्चाराने भारलेला हा धागा २१ दिवसांपर्यंत आपल्या शरीरातील ऊर्जा केंद्रांना (Chakras) सकारात्मक लहरी पुरवतो.
नकारात्मक ऊर्जेचा धोका: २१ दिवसांनंतर तो धागा जुना होतो, मळतो आणि त्याची ऊर्जा ग्रहण करण्याची क्षमता संपते. कालानुकाळ तो धागा तसाच ठेवला, तर त्यात बाह्य वातावरणातील नकारात्मक ऊर्जा साठू लागते, ज्याचा परिणाम आपल्या मानसिक स्थितीवर होऊ शकतो.
Life Lesson: जिथे प्रश्न आहे तिथे उत्तरही, पण शोधायचे कसे? सांगताहेत भगवान बुद्ध!
धागा अशुद्ध होणे हे देखील एक कारण
दैनंदिन कामे करताना, अंघोळ करताना किंवा जेवताना हा धागा ओला होतो आणि त्यावर घाण साचते. शास्त्रानुसार, अशुद्ध झालेला धागा अंगावर ठेवणे शुभ मानले जात नाही. यामुळे त्यातील सात्त्विकता नष्ट होते.
जुना धागा काढल्यानंतर काय करावे?
जर तुमच्या हातावरील धाग्याला २१ दिवसांपेक्षा जास्त काळ झाला असेल, तर तो सन्मानाने काढावा.
१. जुना धागा कधीही कचऱ्यात टाकू नये.
२. तो धागा एखाद्या झाडाच्या मुळाशी ठेवावा किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करावा.
३. शक्य असल्यास मंगळवार किंवा शनिवारी जुना धागा काढून नवीन कलावा बांधावा. पाहा त्यांचा व्हिडिओ -