Religious Pendant Rules: देव-देवतांचे लॉकेट गळ्यात घालणे कितपत योग्य? तुम्हीही धारण करत असाल तर वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 19:55 IST2022-07-28T19:54:18+5:302022-07-28T19:55:15+5:30
Religious Pendant Rules: ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक गोष्टीचा सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. अनेक लोक गळ्यात किंवा हातामध्ये देव-देवतांचे लॉकेट गळ्यात धारण करत असल्याचे तुम्ही पाहिले असेल.

Religious Pendant Rules: देव-देवतांचे लॉकेट गळ्यात घालणे कितपत योग्य? तुम्हीही धारण करत असाल तर वाचा
ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक गोष्टीचा सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. अनेक लोक गळ्यात किंवा हातामध्ये देव-देवतांचे लॉकेट गळ्यात धारण करत असल्याचे तुम्ही पाहिले असेल. मात्र काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर त्याचा दुष्परिणाम तुमच्या जीवनावर होऊ शकतो. देव-देवतांचे चित्र अशलेले लॉकेट धारण केल्यानंतर खूप गोष्टींची काळजी घ्यावी लागते. त्या लॉकेटची स्वच्छता, शुद्धी आदींवर भर दिला जातो.
ज्योतिषशास्त्रानुसार गळ्यात देवांचे लॉकेट धारण करणे योग्य ठरत नाही, कारण जर तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली नाही, तर त्याचा तुमच्या जीवनावर नकारात्मक प्रभाप पडू लागतो. त्यासाठी लॉकेट धारण करताना कोणत्या चुका करू नयेत त्याबाबत आज जाणून घेऊयात.
ज्योतिष शास्त्रामध्ये सांगितले आहे की, देव-देवतांचे फोटो किंवा त्यांच्या चेहऱ्याची आकृती असलेले लॉकेट धारण करणे योग्य ठरत नाही. कारण आपण दररोजच्या धावपळीमध्ये शरीरावर विविध प्रकारची घाण येत असते. अनेकदा आपले घाणीचे हात या लॉकेटला लागतात. त्यामुळे आपल्या जीवनात नकारात्मक उर्जा उत्पन्न होऊ लागले. त्यामुळे लॉकेट धारण करणे योग्य वाटत नाही.
ज्योतिषशास्त्रानुसार शुभ प्रभावांची प्राप्ती करण्यासाठी देव-देवतांशी संबंधित यंत्र असलेले लॉकेट कुठल्याही ज्योतिषाच्या सल्ल्याने धारण करू शकता. जर ही यंत्र असलेले लॉकेट योग्य पद्धतीने धारण केले, तर जीवनामध्ये सकारात्मक उर्जेचा वास होऊ शकतो. तसेच कुंडलीमधून ग्रहांचा दोष दूर होऊ शकतो.