Ram Navami 2026: रामनवमीला मनगटावर बांधा ११ गाठींचा 'हा' धागा; तुमचे आणि कुटुंबाचे होईल संरक्षण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 12:11 IST2026-03-24T12:10:09+5:302026-03-24T12:11:29+5:30

Ram Navami 2026: श्रीरामरक्षा स्तोत्र हे तर संरक्षण कवच मानले जाते, त्याबरोबरच दिलेला उपाय रामनवमीच्या तिथीला केला असता कुटुंबाला संरक्षण मिळेल; कसे ते पाहा.

Ram Navami 2026: Tie this 11-knot 'Ha' thread on your wrist on Ram Navami; You will get protection from negative energy and troubles! | Ram Navami 2026: रामनवमीला मनगटावर बांधा ११ गाठींचा 'हा' धागा; तुमचे आणि कुटुंबाचे होईल संरक्षण!

Ram Navami 2026: रामनवमीला मनगटावर बांधा ११ गाठींचा 'हा' धागा; तुमचे आणि कुटुंबाचे होईल संरक्षण!

गुरुवार २६ मार्च २०२६ रोजी प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव अर्थात 'श्रीराम नवमी(Ram Navami 2026) साजरी होत आहे. श्रीरामांचे जीवन हे केवळ एक कथा नसून ती मानवी जीवनातील प्रचंड संघर्षावर मिळवलेल्या विजयाची गाथा आहे. अयोध्येचे राजकुमार असूनही वाट्याला आलेला १४ वर्षांचा वनवास, पितृशोक, पत्नीचा विरह आणि मुलांपासून दुरावणे... असे अफाट दुःख सोसूनही त्यांनी 'मर्यादा पुरुषोत्तम' म्हणून स्वतःला सिद्ध केले.

कोणत्या देवाकडे काय मागावे? विष्णूंनी स्वतः सांगितलेले 'ते' रहस्य; जे तुमचे आयुष्य बदलू शकते!

अशाच प्रतिकूलतेवर मात करण्यासाठी आणि आपल्या आयुष्यात 'रामराज्य' उभे करण्यासाठी ज्योतिष अभ्यासक शिरीष कुलकर्णी यांनी रामनवमीनिमित्त एक अत्यंत प्रभावशाली उपाय सांगितला आहे.

 

प्रभू श्रीरामांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक संकटाचा खंबीरपणे सामना करण्यासाठी बुधकौशिक ऋषींनी रचलेले 'श्री रामरक्षा स्तोत्र' हे एक अमोघ शस्त्र आहे. या स्तोत्राच्या नित्य पठणाने वाणी सुधारते आणि प्रभू श्रीराम आपले नखशिखांत रक्षण करतात, अशी श्रद्धा आहे. त्याचे नित्य पठण करण्याबरोबरच पुढील उपाय रामनवमीला करावा असे कुलकर्णी सांगतात. 

Ram Navami 2026: राम श्रेष्ठ की रावण? मंदोदरीला युद्धभूमीवर मिळाले उत्तर; सांगताहेत कुमार विश्वास!

रामनवमी विशेष: ११ गाठींचा 'रक्षाकवच' उपाय

तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि वाईट शक्तींचा प्रभाव नष्ट करण्यासाठी रामनवमीच्या दिवशी (२६ मार्चला) खालील उपाय नक्की करा:

साहित्य: एक लाल-पिवळा धागा (मोळी/कलावा).

पहिली गाठ: रामनवमीच्या दिवशी हा धागा हातात घेऊन एकदा पूर्ण 'रामरक्षा' म्हणावी आणि धाग्याला पहिली गाठ बांधावी.

अकरा गाठी: अशा प्रकारे पुन्हा रामरक्षा म्हणून थोड्या अंतरावर दुसरी गाठ बांधावी. ही प्रक्रिया ११ वेळा पूर्ण करावी, जेणेकरून धाग्याला एकूण ११ गाठी बसतील.

अर्पण: हा ११ गाठींचा धागा प्रभू श्रीरामांच्या चरणापाशी ठेवावा आणि मनोभावे प्रार्थना करावी.

धारण करणे: त्यानंतर हा सिद्ध झालेला धागा स्वतःच्या किंवा आपल्या कुटुंबीयांच्या मनगटावर श्रद्धेने बांधावा.

Numerology: अंकशास्त्र सांगतंय तुमच्या मनाची श्रीमंती! 'या' तारखेला जन्मलेले लोक असतात निसर्ग आणि प्राणीप्रेमी

या उपायाचे फायदे (Benefits):

नकारात्मकतेचा विसर: आयुष्यात घडलेल्या जुन्या नकारात्मक घटनांचा प्रभाव कमी होण्यास मदत होते.

ऊर्जेचे संरक्षण: आपल्या सभोवती एक सकारात्मक ऊर्जा तयार होते, ज्यामुळे वाईट शक्तींपासून संरक्षण मिळते.

सकारात्मक सुरुवात: रामनवमीच्या मुहूर्तावर हा उपाय केल्याने वर्षाची आणि आयुष्याची नवी, सकारात्मक सुरुवात होते. पाहा व्हिडिओ -


Web Title : राम नवमी 2026: नकारात्मकता से सुरक्षा के लिए बांधें 11 गांठें

Web Summary : राम नवमी 2026 पर, रामरक्षा स्तोत्र का पाठ करते हुए लाल-पीले धागे में ग्यारह गांठें बांधें। ज्योतिषी शिरीष कुलकर्णी द्वारा सुझाया गया यह अनुष्ठान नकारात्मक ऊर्जाओं से सुरक्षा कवच बनाता है, सकारात्मकता को बढ़ावा देता है और जीवन में एक नई शुरुआत करता है।

Web Title : Ram Navami 2026: Tie 11 knots for protection from negativity.

Web Summary : On Ram Navami 2026, tie a red-yellow thread with eleven knots while reciting Ramraksha Stotra. This ritual, as suggested by astrologer Shirish Kulkarni, creates a protective shield against negative energies, fostering positivity and a fresh start to life.