Ram Navami 2026: राम श्रेष्ठ की रावण? मंदोदरीला युद्धभूमीवर मिळाले उत्तर; सांगताहेत कुमार विश्वास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 11:16 IST2026-03-24T11:14:53+5:302026-03-24T11:16:04+5:30

Ram Navami 2026: यंदा २६ मार्च रोजी श्रीराम नवमी आहे अर्थात प्रभू रामाचा जन्मदिवस, त्यानिमित्ताने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पैलू उलगडणारी कथा जरूर वाचा. 

Ram Navami 2026: Ram is better or Ravana? Mandodari got the answer on the battlefield; says Kumar Vishwas! | Ram Navami 2026: राम श्रेष्ठ की रावण? मंदोदरीला युद्धभूमीवर मिळाले उत्तर; सांगताहेत कुमार विश्वास!

Ram Navami 2026: राम श्रेष्ठ की रावण? मंदोदरीला युद्धभूमीवर मिळाले उत्तर; सांगताहेत कुमार विश्वास!

भारत ही श्रीराम प्रभूंची जन्मभूमी आहे. तरी इथे रामाचा आणि अखिल मानव जातीचा शत्रू असणाऱ्या रावणाचीही याच देशात पूजा होते, हा किती मोठा विरोधाभास आहे ना? एवढेच काय तर राम अस्तित्त्वातच नव्हता, रामायण काल्पनिक काव्य आहे, हे म्हणण्यापर्यंत काही लोकांची मजल जाते. याचे कारण या ग्रंथांचा अभ्यास न करता त्यावर भाष्य केले जाते. अशा वेळी जे अभ्यासक आहेत त्यांचे विचार दिशादर्शक ठरतात. जसे की आजच्या घडीचे प्रख्यात व्याख्याते कुमार विश्वास. त्यांनी एका प्रसंगातून राम श्रेष्ठ की रावण हे अतिशय सुंदर समजावून सांगितले आहे. 

कोणत्या देवाकडे काय मागावे? विष्णूंनी स्वतः सांगितलेले 'ते' रहस्य; जे तुमचे आयुष्य बदलू शकते!

ते म्हणतात, 'रावण कितीही बलाढ्य असला, शक्तिशाली असला, वेद शास्त्रात पारंगत असला तरी तो अनीतीने, अधर्माने वागणारा होता, त्यामुळे त्याची पूजा सर्वार्थाने चूकच आहे. याउलट प्रभू रामचंद्र यांनी आपल्या बिकट काळात सुद्धा अनीती आणि अधर्माची वाट कधीच धरली नाही, नेहमी सत्याचाच मार्ग धरला आणि याची पावती रावणाची पत्नी मंदोदरीने दिली. 

अनेक दिवस सुरू असलेले तुंबळ युद्ध दसऱ्याच्या दिवशी संपले आणि रामांनी रावणावर विजय मिळवला, तेव्हा वानरसेना जल्लोश करू लागली. मात्र श्रीराम एका खडकावर खिन्न मनस्थितीत बसले होते. एवढा रक्तपात झाला याची सल त्यांच्या मनाला टोचत होती. तेवढ्यात पावलांचा आवाज झाला आणि स्त्री आकृतीची सावली त्यांना दिसली. श्रीराम विनम्रतेने उठून उभे राहिले आणि त्यांनी झुकलेल्या नजरेनेच विचारले, 'या युद्धभूमीवर येणाऱ्या आपण कोण आहात माता?'

Ram Navami 2026: मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचे 'ते' ७ दिव्य मंत्र; जे तुमचे आयुष्य मुळापासून बदलू शकतात!

तेव्हा मंदोदरी म्हणाली, 'मी तीच दुर्दैवी स्त्री आहे, जिच्या पतीचा मृत्यू तुमच्या हातून झाला. मी रावण पत्नी मंदोदरी आहे.' 

श्रीराम आणखीनच खजील झाले आणि क्षमा मागू लागले. रावण हा शूर वीर योद्धा होता, परंतु तो अधर्माने वागणारा असल्यामुळे त्याचा अंत करावा लागला अशी प्रांजळ कबुली श्रीरामांनी दिली आणि मंदोदरीची क्षमा मागितली. 

मंदोदरी म्हणाली, 'हे होणार हे मला माहीत होतच, पण मी इथे आले ते वेगळ्या कारणासाठी! विश्वाला, देवाधिदेव महादेवाला जिंकून घेणारा माझा नवरा अशा कोणा पुरुषाच्या हातून मारला गेला हे मला बघायचं होतं. तुमचा जय आणि त्यांचा पराजय का झाला हे पाहण्यासाठी, त्यांच्यात आणि तुमच्यात काय फरक होता हे जाणून घ्यायचं होतं.'

Chankya Niti: जगात फसवणूक टाळायचीय? मग चाणक्य नीतीनुसार चतुर व्यक्तीची 'ही' १० लक्षणे नक्की शिकून घ्या!

श्रीराम म्हणाले, 'माते, तुम्हाला उत्तर मिळालं का?'

मंदोदरी किंचित हसली आणि म्हणाली, 'हो मिळालं! रावणाकडे त्रिभुवनातल्या सर्वोत्तम पाच सौंदर्यवतींपैकी एक सुंदरी मी मंदोदरी होते. तरी त्याला वनवासी सीतेच्या सौंदर्याची भुरळ पडली. त्याने तिचं अपहरण केलं. तिला मिळवण्याची लालसा ठेवली याउलट तुम्ही परस्त्रीची नुसती सावली पाहूनही माते असा उल्लेख केलात, हा सद्गुणी विचारच तुम्हा दोघांमधला मुख्य फरक होता. जी व्यक्ती स्त्रीचा आदर, सन्मान करते तिला कोणीही हरवू शकत नाही. याउलट जी व्यक्ती स्त्रीचे अधःपतन करते, तिला कमी लेखते, त्रास देते, तिला या ब्राह्णडात कोणीही वाचवू शकत नाही!' म्हणूनच मनुस्मृतीत म्हटले आहे, 

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः ।
यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः ।।

मग आता तुम्हीच ठरवा, तुमच्यात राम जिवंत आहे की रावण? 

Web Title : राम बनाम रावण: मंदोदरी का युद्धभूमि रहस्योद्घाटन, कुमार विश्वास ने समझाया।

Web Summary : कुमार विश्वास ने मंदोदरी के दृष्टिकोण से राम की रावण पर श्रेष्ठता को समझाया। रावण की शक्ति के बावजूद, उसके अधर्म ने उसे पतन की ओर अग्रसर किया। राम का सत्य के प्रति पालन और महिलाओं के लिए सम्मान, जैसा कि मंदोदरी ने उजागर किया, ने उनकी विजय को परिभाषित किया।

Web Title : Ram vs. Ravan: Mandodari's battlefield revelation, Kumar Vishwas explains.

Web Summary : Kumar Vishwas explains Ram's superiority over Ravan through Mandodari's perspective. Despite Ravan's power, his अधर्म led to his downfall. Ram's adherence to सत्य and respect for women, as highlighted by Mandodari, defined his victory.