गुरुवार, २६ मार्च २०२६ रोजी येणारी यंदाची श्रीराम नवमी(Ram Navami 2026) अत्यंत खास आहे. अनेक वर्षांनंतर असा योग जुळून आला आहे की, अष्टमी आणि नवमी तिथी एकाच दिवशी आल्या आहेत. प्रभू श्रीरामांचा जन्म ज्या 'पुनर्वसु' नक्षत्रात झाला, तेच नक्षत्र आणि सूर्याची 'उच्च' राशीतील स्थिती या रामनवमीला अधिक फलदायी बनवत आहे. या दुर्मिळ योगाचा लाभ घेण्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार कोणती ३ महत्त्वाचे उपाय आवर्जून करा.
चैत्र नवरात्रीची सांगता आणि प्रभू रामांचा जन्मोत्सव हा काळ ऊर्जेने भरलेला असतो. यंदा सूर्य आपल्या उच्च राशीत असल्यामुळे सूर्याची आणि रामाची उपासना केल्यास त्याचे फळ अनेक पटीने वाढते.
१. सूर्याला अर्घ्य आणि मंत्रजप (यश व आरोग्यासाठी)
प्रभू श्रीराम हे 'सूर्यवंशी' होते आणि सूर्य त्यांचे कुलदैवत आहे. त्यामुळे रामाच्या पूजेपूर्वी सूर्याची उपासना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
विधी: एका तांब्याच्या कलशात शुद्ध पाणी घ्या. त्यात एक लाल फूल आणि थोड्या अक्षता (तांदूळ) टाका. सूर्याकडे पाहून हे पाणी अर्पण करा.
मंत्र: अर्घ्य देताना आणि त्यानंतर 'ओम आदित्याय नमः' या मंत्राचा १०८ वेळा जप करा.
लाभ: यामुळे समाजात मान-सन्मान, कीर्ती वाढते आणि जुन्या आजारांपासून मुक्ती मिळून उत्तम आरोग्य लाभते.
Ram Navami 2026: रामनवमीला मनगटावर बांधा ११ गाठींचा 'हा' धागा; तुमचे आणि कुटुंबाचे होईल संरक्षण!
२. तुळशीचा प्रभावी उपाय (धनप्राप्तीसाठी)
जिथे प्रभू श्रीराम असतात तिथे माता लक्ष्मी वास करतेच, पण तुळस ही श्रीविष्णूची अत्यंत प्रिय आहे.
विधी: पूजेच्या वेळी तुळशीची ५ पाने प्रभू रामांच्या चरणापाशी अर्पण करा. पूजा संपन्न झाल्यावर ही पाने उचलून आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर (दोन्ही बाजूंना) ठेवा.
लाभ: तुळस ही लक्ष्मीचे प्रतीक मानली जाते. हा उपाय केल्याने घरातील दारिद्र्य दूर होऊन धनवृद्धी होते आणि माता लक्ष्मीची कृपादृष्टी कायम राहते.
Ram Navami 2026 Puja: रामनवमीला घरी पूजा कशी करावी? जन्मवेळ, पाळणा आणि राममंत्रांची संपूर्ण माहिती
३. 'विजय मंत्राचा' जप (कार्यसिद्धीसाठी)
श्रीराम जन्माची वेळ म्हणजेच दुपारी १२ ते १२.४० हा काळ ब्रह्मांडीय ऊर्जेने भारीत असतो.
विधी: या ४० मिनिटांच्या कालावधीत शांत चित्ताने बसून 'श्रीराम जय राम जय जय राम' या १३ अक्षरी मंत्राचा किमान १०८ वेळा जप करा.
लाभ: याला 'विजय मंत्र' म्हटले जाते. कितीही जुनी अडलेली कामे असतील किंवा कोर्ट-कचेरीचे प्रश्न असतील, तर या जपाने त्यातील अडथळे दूर होऊन मार्गी लागतात.
विशेष टिप: यंदा रामनवमी गुरुवारी आल्यामुळे गुरु-राहाू किंवा इतर दोषांचा प्रभाव कमी करण्यासाठी हा दिवस सुवर्णसंधी आहे. प्रभू रामांच्या नामस्मरणाने मन शांत ठेवा आणि सात्त्विक आहार घ्या.
Web Summary : Ram Navami 2026 is especially auspicious. Perform these simple astrological remedies for success, health, and prosperity. Offer water to the sun, worship Tulsi for wealth, and chant the 'Vijay Mantra' to remove obstacles. This Ram Navami is a golden opportunity to overcome challenges.
Web Summary : राम नवमी 2026 बेहद खास है। सफलता, स्वास्थ्य और समृद्धि के लिए ज्योतिषीय उपाय करें। सूर्य को जल अर्पण करें, तुलसी की पूजा करें और बाधाओं को दूर करने के लिए 'विजय मंत्र' का जाप करें। यह राम नवमी चुनौतियों से उबरने का सुनहरा अवसर है।