तोतरेपणा घालवण्यासाठी आणि अभ्यासात प्रगतीसाठी मुलांकडून म्हणवून घ्या प्रज्ञाविवर्धन स्तोत्र!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 05:27 PM2022-01-24T17:27:10+5:302022-01-24T17:27:48+5:30

अवघ्या ८ श्लोकांच्या या स्तोत्राचा तुम्हाला काय अनुभव येतो याची स्वयं प्रचिती घ्या आणि मुलांकडून अवश्य म्हणवून घ्या!

Pray Prajnavivardhan Stotra for children to get rid of stuttering and progress in studies! | तोतरेपणा घालवण्यासाठी आणि अभ्यासात प्रगतीसाठी मुलांकडून म्हणवून घ्या प्रज्ञाविवर्धन स्तोत्र!

तोतरेपणा घालवण्यासाठी आणि अभ्यासात प्रगतीसाठी मुलांकडून म्हणवून घ्या प्रज्ञाविवर्धन स्तोत्र!

googlenewsNext

कालपर्यंत मोबाईल घेऊ नकोस म्हणून मुलांना ओरडणारे पालक आता मोबाईल घे आणि अभ्यास कर असे मुलांना सांगताना दिसतात. 'कालाय तस्मै नमः' मोबाईल ही काळाची गरज बनली आहे. परंतु मोबाईलचा अतिवापर होऊन लहान मुले त्यांचे बालपण गमावून अकाली प्रौढ झाल्यासारखी वागतात, लवकर वयात येतात. त्यांच्यावर माहितीचा भरमसाठ मारा होत असल्याने त्यांचे चित्त विचलित झाले नाही तर नवल! शिवाय मैदानी खेळ बंद झाल्याने मुले एकलकोंडी होऊन अबोल झाल्याचेही दिसून येत आहे. दिवसेंदिवस आधुनिकीकरणाचे पडसाद या ना त्या स्वरूपात आपल्याला आढळणार आहेतच! 

अशात आपल्या पाल्याला चांगल्या शिक्षणाची, ज्ञानाची ओढ लागावी, मन शांत व्हावे, चित्त स्थिर राहावे आणि त्याचे बोलणे संस्कारी असावे याकरिता मुलांकडून प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचा पाठ अवश्य करवून घ्या. या स्तोत्राचे सामर्थ्य प्रचंड आहे. या स्तोत्राच्या नित्य पठणाने स्मरणशक्ती वाढते, यश मिळते, ध्येय स्पष्ट होते. ज्यांना ज्ञानार्जनाची ओढ आहे अशा लोकांनीदेखील रोज सकाळी अंघोळ करून शक्य झाल्यास ब्रह्म मुहूर्तवार किंवा सकाळी ६ ते ८ या वेळेत प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचे पठण करावे. 

या स्तोत्राचे पठण रविपुष्य नक्षत्र किंवा गुरुपुष्यामृत योगावर सुरू करणे अधिक लाभदायक ठरते. परंतु नजीकच्या काळात हे दोन्ही योग नसल्याने गणपती बाप्पाचे नाव घेऊन या स्तोत्र पठणास सुरुवात करावी आणि अनुभूती घ्यावी. या स्तोत्राच्या पठणामुळे तोतरेपणा देखील दूर होतो असा अनेकांना अनुभव आहे. अवघ्या ८ श्लोकांच्या या स्तोत्राचा तुम्हाला काय अनुभव येतो याची स्वयं प्रचिती घ्या आणि मुलांकडून अवश्य म्हणवून घ्या!

!! प्रज्ञा विवर्धन स्तोत्र !!

अस्य श्री प्रज्ञा विवर्धन स्तोत्र मन्त्रस्य 
सनत्कुमार ऋषि: स्वामी कार्तिकेयो देवता 
अनुष्टुप छन्द : मम सकल विद्या सिध्यर्थे , 
प्रज्ञा वृध्यर्थे प्रज्ञा विवर्धन स्तोत्र पारायणे विनियोग: !!

योगिश्वरो महासेन: कार्तिकेयोग्नि नंदन: !
स्कन्द: कुमार सेनानी: स्वामी शंकर सम्भव: !!

गाँगेयस्ताम्र चूडश्च ब्रम्हचारी शिखिध्वज:!
तारकारी उमापुत्र क्रौंचारिश्च षडानन: !!

शब्दब्रम्ह समुद्रश्च सिद्ध सारस्वतों गुह:!
सनत्कुमारो भगवान भोगमोक्ष फलप्रद:!!

शरजन्मा गणाधीश पूर्वजो मुक्ति मार्ग कृत!
सर्वागम प्रणेताच वांच्छितार्थ प्रदर्शन : !!

अष्टाविंशति नामानि मदीयानीति य: पठेत!
प्रत्यूषं श्रद्धया युक्तो मूको वाचस्पति: भवेत् !!

महामंत्र मयानीति मम नामानु कीर्तनम्!
महाप्रज्ञा मवाप्नोति नात्रकार्या विचारणा !!
!! इति श्री रुद्रयामले प्रज्ञा विवर्धन स्तोत्रं सम्पूर्णम  !!

Web Title: Pray Prajnavivardhan Stotra for children to get rid of stuttering and progress in studies!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.