फेब्रुवारीची ही संध्याकाळ आत्ताच बुक करून ठेवा...; आठपैकी सहा ग्रह उघड्या डोळ्यांनी पाहता येणार, सातवी पृथ्वी, ज्यावर तुम्ही असणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 10:42 IST2026-01-02T10:41:44+5:302026-01-02T10:42:40+5:30

Planetary Parade 2026: फेब्रुवारी २०२६ मध्ये बुध, शुक्र, शनि, गुरू, युरेनस आणि नेपच्यून हे सहा ग्रह एकाच वेळी आकाशात दिसणार आहेत. जाणून घ्या हा दुर्मिळ नजारा कधी आणि कसा पाहायचा.

Planetary Parade 2026: Book this February evening now...; Six of the eight planets will be visible to the naked eye, the seventh being Earth, on which you will be... | फेब्रुवारीची ही संध्याकाळ आत्ताच बुक करून ठेवा...; आठपैकी सहा ग्रह उघड्या डोळ्यांनी पाहता येणार, सातवी पृथ्वी, ज्यावर तुम्ही असणार...

फेब्रुवारीची ही संध्याकाळ आत्ताच बुक करून ठेवा...; आठपैकी सहा ग्रह उघड्या डोळ्यांनी पाहता येणार, सातवी पृथ्वी, ज्यावर तुम्ही असणार...

ब्रह्मांडाचे रहस्य जाणून घेण्याची इच्छा असलेल्या लोकांसाठी फेब्रुवारी २०२६ हा महिना ऐतिहासिक ठरणार आहे. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात, विशेषतः २६ ते २८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान, सौरमालेतील सहा ग्रह एकाच वेळी आकाशात एका सरळ रेषेत दिसणार आहेत. या दुर्मिळ 'प्लॅनेटरी परेड'मध्ये बुध, शुक्र, शनि, गुरू, युरेनस आणि नेपच्यून यांचा समावेश असेल.

फेब्रुवारीच्या अखेरीस सूर्यास्तानंतर पश्चिम दिशेला क्षितिजाजवळ हा अद्भुत नजारा पाहायला मिळेल. बुध (Mercury), शुक्र (Venus), शनि (Saturn) आणि गुरू (Jupiter) हे चार ग्रह अत्यंत तेजस्वी असल्याने आपण ते उघड्या डोळ्यांनी पाहू शकणार आहोत.

दुर्बिणीची गरज
युरेनस (Uranus) आणि नेपच्यून (Neptune) हे ग्रह पृथ्वीपासून खूप लांब असल्याने ते पाहण्यासाठी शक्तिशाली दुर्बीण किंवा टेलिस्कोपची आवश्यकता भासणार आहे. या काळात चंद्र देखील गुरू ग्रहाच्या अगदी जवळ असेल, ज्यामुळे आकाशाचे सौंदर्य अधिकच वाढणार आहे.

'प्लॅनेटरी परेड' म्हणजे काय?
जेव्हा सौरमालेतील अनेक ग्रह सूर्याच्या एकाच बाजूला येतात आणि पृथ्वीवरून पाहताना ते एका रेषेत किंवा विशिष्ट रचनेत दिसतात, तेव्हा त्याला 'प्लॅनेटरी परेड' किंवा 'ग्रहांची युती' म्हटले जाते. यापूर्वी २०२५ मध्येही असा नजारा दिसला होता, मात्र २०२६ मधील ही घटना अधिक स्पष्ट आणि मोठी असेल असे शास्त्रज्ञांचे मत आहे.

कधी आणि कसे पाहाल?
वेळ: २६ ते २८ फेब्रुवारी २०२६, सूर्यास्तानंतर सुमारे १ तास.

दिशा: पश्चिम आणि दक्षिण-पश्चिम आकाश.

Web Title : अभी बुक करें! 2026 में छह ग्रह नग्न आंखों से दिखेंगे

Web Summary : फरवरी 2026 के अंत में एक दुर्लभ ग्रहों की परेड होगी। बुध, शुक्र, शनि, बृहस्पति, यूरेनस और नेपच्यून सहित छह ग्रह एक सीध में होंगे। चार बिना सहायता के दिखाई देंगे। यूरेनस और नेपच्यून के लिए दूरबीन का उपयोग करें। इसे न चूकें!

Web Title : Book Now! Six Planets Visible to the Naked Eye in 2026

Web Summary : A rare planetary parade will occur in late February 2026. Six planets—Mercury, Venus, Saturn, Jupiter, Uranus, and Neptune—will align. Four will be visible unaided. Use binoculars for Uranus and Neptune. Don't miss it!