Paush Amavasya 2026: अमावस्येला कोणाची वाट पाहू नका; 'या' मंत्राने स्वतःच काढा तुमची दृष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 11:49 IST2026-01-16T11:46:38+5:302026-01-16T11:49:08+5:30

Paush Amavasya 2026: १८ जानेवारी पौष अमावस्या आहे, त्यादिवशी घरात कोणी ज्येष्ठ व्यक्ती नसेल तर पुढील पद्धतीने स्वतःची दृष्ट काढता येईल. 

Paush Amavasya 2026: Don't wait for anyone on Amavasya; Remove your evil eye yourself with this mantra! | Paush Amavasya 2026: अमावस्येला कोणाची वाट पाहू नका; 'या' मंत्राने स्वतःच काढा तुमची दृष्ट!

Paush Amavasya 2026: अमावस्येला कोणाची वाट पाहू नका; 'या' मंत्राने स्वतःच काढा तुमची दृष्ट!

दृष्ट काढणे, लागणे हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. त्याला कोणी नजर म्हणतात तर कोणी नकारात्मक ऊर्जा. ती नष्ट व्हावी आणि सगळे काही मंगलमय व्हावे म्हणून पूर्वी आई, आजी विशेषतः शनिवारी, अमावस्येला घरातल्या लहानग्यांची दृष्ट काढत असत. मात्र आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरात कोणी ज्येष्ठ व्यक्ती नसेल तर स्वतःची दृष्ट स्वतःला काढता येते का ते पाहू. 

Palmistry: तळहातावर शंख, कमळ, मासा, धनुष्य यांसारखी चिन्ह देतात राजयोगाचे संकेत

१८ जानेवारी रोजी येणारी पौष अमावस्या(Paush Amavasya 2026) ही धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची मानली जाते. अमावस्येच्या दिवशी नकारात्मक ऊर्जा प्रबळ असते, असे मानले जाते. त्यामुळेच या दिवशी 'दृष्ट' (नजर) काढण्याची परंपरा आहे. अनेकदा घरात ज्येष्ठ व्यक्ती नसल्यास आपण दृष्ट काढणे टाळतो, परंतु स्वतःची दृष्ट स्वतः कशी काढावी, यावर आधारित ही माहिती जाणून घ्या. 

अमावस्येचा दिवस हा नकारात्मक शक्तींच्या निवारणासाठी सर्वोत्तम मानला जातो. अनेकदा आपल्याला कारणाशिवाय थकवा जाणवतो, चिडचिड होते किंवा कामात अडथळे येतात; ज्याला आपण 'नजर लागणे' असे म्हणतो. जर तुमच्या घरात दृष्ट काढण्यासाठी कोणी ज्येष्ठ व्यक्ती नसेल, तर काळजी करू नका. मिठाचा एक छोटा उपाय करून तुम्ही स्वतःची नकारात्मकता दूर करू शकता.

काही हरवलंय? काळजी सोडा! 'हा' एक मंत्र तुमची वस्तू शोधून देईल; अनेकांनी घेतलाय अनुभव 

मिठाने दृष्ट काढण्याची सोपी पद्धत

मीठ हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते. अमावस्येच्या दिवशी हा उपाय केल्यास विशेष लाभ होतो.

कृती: 

१. तुमच्या उजव्या मुठीत थोडे खडे मीठ (किंवा साधे मीठ) घ्या. 
२. ताठ बसून किंवा उभे राहून खालील मंत्राचा ७ वेळा उच्चार करा. 
३. मंत्र म्हणत असताना तुमची मुठ तुमच्या डोक्यावरून ७ वेळा 'अँटी-क्लॉकवाईज' (घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने) फिरवा. 
४. त्यानंतर ते मीठ लगेच बेसिनच्या सिंकमध्ये टाकून द्या आणि नळ सोडून ते वाहून जाऊ द्या. 
५. मिठाचे हात स्वच्छ धुवून टाका.

प्रभावी मंत्र:

नमस्ते रुद्ररूपाय करीरुपाय ते नमः।।

Makar Sankranti 2026: मकर संक्रांत ते रथसप्तमी; हळदी-कुंकवासाठी हाच काळ का निवडला जातो?

हा उपाय अमावस्येलाच का करावा?

अमावस्येला वातावरणात रज-तम कणांचे प्रमाण जास्त असते. या मंत्रातील 'रुद्ररूप' हे शिवाचे संहारक रूप आहे, जे नकारात्मकतेचा नाश करते. मिठाच्या प्रयोगामुळे शरीराभोवती असलेले नकारात्मक वलय (Aura) स्वच्छ होते आणि व्यक्तीला हलके वाटते.

या उपायाचे फायदे:

>> विनाकारण येणारा मानसिक ताण कमी होतो.

>> घरातील कलह आणि नकारात्मकता दूर होते.

>> आरोग्यामध्ये सुधारणा जाणवते आणि कामात उत्साह येतो.  पाहा ज्योतिषांनी सांगितलेला हा उपाय व्हिडिओच्या माध्यमातून -

टीप : ही ज्योतिषांची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी लोकमत सहमत असेलच, असे नाही.

Web Title : Paush Amavasya 2026: अमावस्या पर इस मंत्र से स्वयं नकारात्मक ऊर्जा दूर करें।

Web Summary : पौष अमावस्या नकारात्मकता दूर करने के लिए उत्तम है। घर में बड़े न होने पर, नमक और मंत्र का उपयोग करके नकारात्मक ऊर्जा दूर करें। नमक को सिर के ऊपर घुमाकर फेंक दें। इससे तनाव कम होता है और स्वास्थ्य बेहतर होता है।

Web Title : Paush Amavasya 2026: Remove negative energy yourself with this mantra.

Web Summary : Paush Amavasya is ideal for dispelling negativity. If no elders are present, use salt and a mantra to remove negative energy by rotating salt over your head and discarding it. This cleanses your aura, reduces stress, and improves well-being.