Palmistry: तळ हाताच्या शुक्र पर्वतावर 'या' चिन्हाचे असणे म्हणजे राजयोगच; तुम्हीपण तपासून बघा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 16:05 IST2025-10-07T16:01:17+5:302025-10-07T16:05:28+5:30
Palmistry: हस्तरेषाशास्त्रानुसार केवळ रेघाच नाही तर हातावरील विशिष्ट खुणांवरूनही भाकीत वर्तवले जाते, तूर्तास आपण राजयोग नशिबात आहे की नाही ते जाणून घेऊ.

Palmistry: तळ हाताच्या शुक्र पर्वतावर 'या' चिन्हाचे असणे म्हणजे राजयोगच; तुम्हीपण तपासून बघा!
ज्योतिष शास्त्रात अनेक बारकावे आपले भाकीत सांगतात. त्याचा सखोल अभ्यास हवा. पण काही गोष्टी सहज नजरेस पडणाऱ्या आणि त्यामागचा अर्थ उलगडून सांगणाऱ्या असतात. हस्तरेषाशास्त्र हे त्यापैकीच एक आहे. त्यात हातावरील तीळ, बोटांची उंची, रेघा इ. गोष्टीवरून आपल्या व्यक्तिगत आयुष्याशी निगडित अनेक गोष्टींचा खुलासा करता येतो. आज आपण तळ हातावरील शुक्र पर्वत, त्यावरील चिन्ह आणि आपले भविष्य याबद्दल जाणून घेऊ.
आठवड्याची सुरुवात गजकेसरी योगाने; करिअर, कमाईत ६ राशींना मिळणार भरघोस फायदे!
शुक्र ग्रहाला ज्योतिषशास्त्रात वैवाहिक जीवन, प्रेम संबंध, भौतिक सुख-सुविधा आणि आकर्षण याचा कारक मानले जाते. हस्तरेषाशास्त्रानुसार, तळहातावर असलेला शुक्र पर्वत (Mount of Venus) व्यक्तीच्या याच गोष्टींशी संबंधित भविष्य आणि स्वभाव दर्शवतो. तळहातामध्ये अंगठ्याच्या खालच्या बाजूला जो उंचवटा असतो आणि जो जीवनरेषेने वेढलेला असतो, तोच शुक्र पर्वत असतो.
शुक्र पर्वताची शुभ लक्षणे
जर एखाद्याच्या तळहातावरील शुक्र पर्वत चांगला उभारलेला असेल आणि त्याचा रंग गुलाबी असेल, तर अशा व्यक्तींमध्ये विपरीत लिंगाबद्दल तीव्र आकर्षण असते. हे लोक इतरांना सहजपणे आपल्याकडे आकर्षित करण्यात यशस्वी होतात. अशा व्यक्ती भविष्यात अतिशय आरामदायक जीवन जगतात आणि त्यांना सुख-सुविधांची कधीही कमतरता भासत नाही.
धनवान बनवणारी शुभ चिन्हे : शुक्र पर्वतावर काही खास चिन्हे असल्यास, ती व्यक्तीला जीवनात भरपूर धन आणि ऐश्वर्य मिळवून देतात ती पुढीलप्रमाणे...
१. त्रिशूळ (Trident)
हस्तरेषाशास्त्रानुसार, शुक्र पर्वतावरील त्रिशूळाचे चिन्ह अत्यंत भाग्यशाली मानले जाते. ज्या व्यक्तीच्या तळहातावर शुक्र पर्वतावर त्रिशूळ चिन्ह असते, त्यांना जीवनात सच्चे प्रेम प्राप्त होते आणि त्यांना कधीही पैशाची कमतरता जाणवत नाही. हे चिन्ह व्यक्तीला सर्व भौतिक सुख प्रदान करते.
Lifelesson: प्रेमानंद महाराजांच्या 'या' ३ सूचना, तुमच्या मनाला उभारी देतील हे नक्की!
२. त्रिकोण (Triangle)
जर शुक्र पर्वतावर त्रिकोणाचे (Triangle) चिन्ह असेल, तर असा जातक मोहून टाकणारा आणि मधुर वाणीचा मालक असतो. अशा व्यक्तीला विपरीत लिंगाचे मन जिंकण्याचे कौशल्य अवगत असते. हे लोक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी नफा-तोटा काळजीपूर्वक तपासतात आणि मगच कोणतीही योजना सुरू करतात.
३. ताऱ्याचे चिन्ह (Star)
शुक्र पर्वतावर जर ताऱ्याचे (Star) चिन्ह असेल, तर अशा व्यक्तींना प्रेमात जबरदस्त यश मिळते. त्यांना प्रेमसंबंधात कधीही निराशेचा सामना करावा लागत नाही. हे लोक खूप उत्कट (Passionate) स्वभावाचे असतात आणि जीवनातील प्रत्येक प्रकारचे सुख भोगतात. भविष्यात त्यांना भरपूर पैसा मिळतो.
आज नवान्न पौर्णिमा: अन्नपूर्णेच्या कृपेने धन-संपत्तीप्राप्तीसाठी आज 'हा' विधी चुकवू नका!
इतर महत्त्वपूर्ण पण संमिश्र फळ देणारी चिन्हे :
वर्ग/चौकोन: आकर्षक व्यक्तिमत्त्व (नेतृत्त्वाचे गुण)
क्रॉस : फुली (प्रेमभंग)
जाळी : तीव्र इच्छाशक्ती
तीळ : वैवाहिक जीवनात अडचणी