Palmistry: फक्त नशीबवान लोकांच्याच मनगटावर असते 'ही' चौथी रेघ; दर्शवते अफाट प्रसिद्धी आणि अमाप संपत्ती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 15:00 IST2026-02-25T14:59:48+5:302026-02-25T15:00:49+5:30

Palmistry: हस्तसामुद्रिक शास्त्रानुसार, आपल्या हाताचे तळवेच नाही, तर मनगटावरील रेषा देखील आपल्या आयुष्याबद्दल बराच उलगडा करतात, जसे की चौथी रेघ!

Palmistry: Only lucky people have this fourth line on their wrist; it indicates immense fame and immense wealth! | Palmistry: फक्त नशीबवान लोकांच्याच मनगटावर असते 'ही' चौथी रेघ; दर्शवते अफाट प्रसिद्धी आणि अमाप संपत्ती!

Palmistry: फक्त नशीबवान लोकांच्याच मनगटावर असते 'ही' चौथी रेघ; दर्शवते अफाट प्रसिद्धी आणि अमाप संपत्ती!

हस्तसामुद्रिक शास्त्रात मनगटावरील रेषांना 'मणिबंध रेषा' (Rascette Lines/Bracelet Lines) म्हटले जाते. असे मानले जाते की या रेषा व्यक्तीचे आयुष्य, आरोग्य आणि आर्थिक स्थिती दर्शवतात. बहुतेकांच्या मनगटावर २ ते ३ रेषा असतात, पण काही नशीबवान लोकांच्या हातात ४ रेषाही पाहायला मिळतात.

Numerology: तुमची जन्मतारीख सांगते तुमच्या व्यक्तिमत्त्वाची आणि भविष्याची चांगली वाईट बाजू; दुर्लक्ष करू नका!

१. पहिली रेषा: आरोग्य आणि दीर्घायुष्य

पहिली रेषा सर्वात महत्त्वाची मानली जाते. जर ही रेषा स्पष्ट, खोल आणि न तुटलेली असेल, तर ती उत्तम आरोग्य आणि शारीरिक क्षमतेचे प्रतीक आहे. जर ही रेषा अस्पष्ट किंवा साखळीसारखी असेल, तर त्या व्यक्तीला आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. स्त्रियांच्या बाबतीत या रेषेचे स्वरूप त्यांच्या प्रजोत्पादन क्षमतेबद्दलही संकेत देते.

२. दुसरी रेषा: संपत्ती आणि यश

दुसरी रेषा व्यक्तीच्या आयुष्यातील आर्थिक स्थिती आणि यशाचे मोजमाप करते. जर तुमची दुसरी रेषा सरळ आणि स्पष्ट असेल, तर तुम्हाला आयुष्यात भरपूर संपत्ती, मानसन्मान आणि समृद्धी मिळण्याचे योग आहेत. ही रेषा जितकी अधिक स्पष्ट, तितका तुमचा आर्थिक प्रवास सुखकर होतो.

Vastu Shastra: घरात सुख-शांती हवी असेल, तर देवघरात नक्की ठेवा पाण्याचा कलश; जाणून घ्या त्याचे महत्त्व

३. तिसरी रेषा: कीर्ती आणि प्रभाव

तिसरी रेषा सर्वांच्या मनगटावर नसते, पण जर ती असेल, तर ती व्यक्ती समाजात खूप प्रभावशाली ठरते. अशी व्यक्ती आपल्या कर्तृत्वाने नाव कमावते आणि लोकांमध्ये प्रसिद्ध होते. ही रेषा नेतृत्वगुण आणि सामाजिक प्रतिष्ठेचे प्रतीक मानली जाते.

४. चौथी रेषा: दुर्लभ नशीब

चौथी रेषा खूप कमी लोकांच्या मनगटावर आढळते. जर तुमच्या मनगटावर चौथी रेषा असेल, तर ती तिसऱ्या रेषेच्या प्रभावाला अधिक बळकट करते. अशा व्यक्तीला दीर्घायुष्यासोबतच अफाट प्रसिद्धी आणि वारसाहक्काने मिळणारी संपत्ती मिळण्याची शक्यता असते. हे एक अत्यंत दुर्मिळ आणि शुभ लक्षण मानले जाते.

Power of Mantra: रात्री झोपण्यापूर्वी म्हणा 'हा' मंत्र; दुःख, कष्ट होईल दूर, मंत्राचा लाभ होईल पुरेपूर!

काही विशेष चिन्हे:

>> रेषेवर क्रॉस असणे: जर मनगटावरील रेषेवर 'X' (Cross) चिन्ह असेल, तर आयुष्यात काही कठीण संघर्षांना सामोरे जावे लागू शकते.

>> त्रिकोण किंवा बेट: रेषेवर त्रिकोण असणे हे अचानक धनलाभाचे संकेत देते, तर बेटासारखे (Island) चिन्ह आरोग्याच्या तक्रारी दर्शवते.

Web Title : हस्तरेखा: भाग्यवान लोगों के कलाई पर चौथी रेखा दर्शाती है अपार प्रसिद्धि, संपत्ति

Web Summary : कलाई की रेखाएं जीवन, स्वास्थ्य और धन दर्शाती हैं। दुर्लभ चौथी रेखा प्रसिद्धि, विरासत में मिली संपत्ति और दीर्घायु का संकेत देती है। स्पष्ट रेखाएं अच्छे स्वास्थ्य और समृद्धि का संकेत हैं। क्रॉस संघर्षों का सुझाव देते हैं; त्रिकोण, अचानक लाभ।

Web Title : Palmistry: Fourth wrist line signifies immense fame, wealth for lucky ones.

Web Summary : Wrist lines reveal life, health, and wealth. Rare fourth line indicates fame, inherited wealth, and longevity. Clear lines signify good health and prosperity. Crosses suggest struggles; triangles, sudden gains.