Scorpio Yearly Horoscope 2026: वृश्चिक राशीसाठी नवीन वर्ष 2026: आव्हानांमधून प्रगतीची 'आशा'; परिश्रमात सातत्य ठेवल्यास होणार नाही निराशा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 11:28 IST2025-12-27T10:52:18+5:302025-12-27T11:28:14+5:30
Scorpio Yearly Horoscope 2026 in Marathi: नवे वर्ष आपल्या राशीसाठी कसे असणार याची उत्सुकता प्रत्येकाला असते, त्यासाठीच हे रशिनुसार वार्षिक भविष्य जरूर वाचा.

Scorpio Yearly Horoscope 2026: वृश्चिक राशीसाठी नवीन वर्ष 2026: आव्हानांमधून प्रगतीची 'आशा'; परिश्रमात सातत्य ठेवल्यास होणार नाही निराशा
वृश्चिक(Scorpio Yearly Horoscope 2026) राशीच्या जातकांसाठी २०२६ हे वर्ष संयमाची परीक्षा घेणारे असले, तरी ते यशाची मोठी कवाडे उघडणारे ठरेल. चढ-उतार असूनही, केवळ 'आशा' आणि 'परिश्रम' या दोन सूत्रांच्या जोरावर तुम्ही अशक्य गोष्टी शक्य करू शकाल.
तूळ राशीसाठी नवीन वर्ष 2026 नियोजन आणि स्वप्नपूर्तीचे वर्ष; 'या' एका चुकीमुळे होऊ शकते मोठे नुकसान!
वर्षाची सुरुवात आणि सतर्कता
वृश्चिक राशीसाठी २०२६ ची सुरुवात काही प्रमाणात चढ-उतारांची असू शकते. वैयक्तिक आयुष्यापासून व्यावसायिक क्षेत्रापर्यंत तुम्हाला वर्षभर सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. कधीकधी गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडत नाहीत असे वाटून नैराश्य येऊ शकते, पण अशा वेळी खचून न जाता अंतर्मनाचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा.
यशाची गुरुकिल्ली: कौटुंबिक सल्ला आणि प्रबळ इच्छाशक्ती
कोणताही मोठा निर्णय घेताना कुटुंबातील सदस्यांचा सल्ला आवर्जून घ्या, कारण त्यांच्या पाठिंब्यामुळे तुम्हाला मानसिक बळ मिळेल.
संधींचे सोने करा: तुमच्यासमोर वर्षाच्या मध्यात काही उत्तम संधी येतील. या संधींना ओळखणे आणि त्यांचे वेळेत सोने करणे तुमच्या हातात आहे.
सातत्य: मालमत्ता, पैसा, प्रेम किंवा यश—या सर्व गोष्टी तुमची वाट पाहत आहेत, फक्त तुमच्या परिश्रमात सातत्य हवे.
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
करिअर आणि शिक्षण
ड्रीम जॉब: करिअरच्या बाबतीत विनाकारण चिंता करत बसण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर भर द्या. तुमची 'ड्रीम जॉब' मिळण्याची शक्यता या वर्षी दाट आहे.
विद्यार्थी: विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष मेहनतीचे गोड फळ देणारे ठरेल. तुमची एकाग्रता तुम्हाला परीक्षेत यश मिळवून देईल.
कौटुंबिक नातेसंबंध आणि स्वभाव
कुटुंबात संवाद साधताना काळजी घ्या. तुमचे परखड बोलणे काही जणांना खपू शकते, ज्यामुळे विनाकारण मतभेद होण्याची शक्यता आहे. संयमित भाषा आणि थोरामोठ्यांचा आशीर्वाद तुमच्यासाठी या वर्षी 'सुरक्षा कवच' म्हणून काम करेल.
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
आत्मिक शांती आणि समृद्धी
या वर्षी तुम्हाला भौतिक सुखापेक्षा आत्मिक समाधान अधिक महत्त्वाचे वाटेल.
साधना: ध्यान आणि साधना केल्याने मनाला शांती मिळेल आणि आव्हानांशी लढण्याची ताकद मिळेल.
बरकत: तुमच्या कमाईतील काही भाग गरिबांना दान करा किंवा धार्मिक कार्यासाठी वापरा. यामुळे केवळ मानसिक समाधान मिळणार नाही, तर तुमच्या धनातही बरकत येईल.