नवे वर्ष २०२६: आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी या वर्षात करा 'हे' ५ उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 11:29 IST2026-01-01T11:26:07+5:302026-01-01T11:29:34+5:30
New Year 2026 Astro Tip: २०२६ हे तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचे वर्ष ठरावे यासाठी लेखात दिलेल्या ५ उपासना आणि ज्योतिष विषयक सूचना नक्की कामी येतील.

नवे वर्ष २०२६: आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी या वर्षात करा 'हे' ५ उपाय!
नवीन वर्ष जवळ आले की आपल्याकडे राशीभविष्य पाहण्याची लाट येते. "कोणत्या राशीला धनलाभ होणार?" किंवा "कोणाला साडेसाती नडणार?" यांसारख्या सोशल मीडियावरील बातम्यांमध्ये आपण तासनतास घालवतो. मात्र, खऱ्या अर्थाने नवीन वर्ष समृद्ध करायचे असेल, तर आपल्याला ज्योतिषाच्या पलीकडे जाऊन अध्यात्माची कास धरावी लागेल, असा मोलाचा सल्ला ज्योतिष आणि अध्यात्माच्या अभ्यासक अस्मिता दीक्षित यांनी दिला आहे.
संकल्पाचा मुहूर्त 'आत्ताच'!
अनेकजण १ जानेवारीची वाट बघतात. पण अस्मिता ताई म्हणतात, "जेव्हा एखादी गोष्ट करायची इच्छा मनात येते, तोच संकल्पाचा खरा मुहूर्त असतो." त्यासाठी नवीन वर्षाची वाट पाहण्याची गरज नाही. विचार कृतीत उतरवणे हीच यशाची पहिली पायरी आहे.
ज्योतिष: भीती नको, सकारात्मक दृष्टी हवी
सोशल मीडियावर राहूचे राज्य आहे, जो आपल्याला दिशाहीन करू शकतो. म्हणूनच कुणाच्याही विचारात अडकण्यापेक्षा नामस्मरणात स्वतःला गुंतवून घेणे उत्तम.
ग्रह शत्रू नाहीत: सूर्य, चंद्र, मंगळ हे आपले शत्रू नसून ते आपल्या आयुष्याचा भाग आहेत. त्यांच्या अस्तित्वामुळेच आपले आयुष्य समृद्ध होते.
दोषांचे बिल ग्रहावर फाडू नका: जर आहार-विहार चुकीचा असेल आणि आरोग्य बिघडले, तर त्याला ग्रह कारणीभूत नसून आपले कर्म कारणीभूत असते. ग्रह केवळ कर्माची फळे देण्यास बांधील असतात.
२०२६ मधील ग्रहांची स्थिती
गुरु भ्रमण: २०२६ मध्ये गुरु मिथुन, कर्क आणि सिंह राशीतून भ्रमण करेल. ११ मार्चपर्यंत गुरु वक्री स्थितीत आहे, याचा अर्थ विसरलेली किंवा राहिलेली कामे पूर्ण करण्याची ही संधी आहे.
शनि आणि राहू-केतू: शनि महाराज संपूर्ण वर्ष मीन राशीत असतील, तर राहू कुंभ राशीत आणि केतू सिंह राशीत भ्रमण करतील.
सूर्याची उपासना: २०२६ हे वर्ष सूर्याच्या अंमलाखाली असल्याने गायत्री मंत्र आणि सूर्याला अर्घ्य देणे अधिक फलदायी ठरेल.
यशासाठी पुढील ५ उपाय करा
तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी त्यांनी खालील सोपी साधना सुचवली आहे:
१. सूर्योपासना: रोज सकाळी सूर्याला अर्घ्य देऊन गायत्री मंत्राचा उच्चार करावा.
२. हनुमान चालीसा: रोज किमान एकदा श्रीरामाचा जप आणि हनुमान चालीसा म्हणावी.
३. पारायण: १ जानेवारीपासून रोज 'श्री गजानन विजय' ग्रंथाचा एक अध्याय वाचावा. वर्षातून १२ पारायणे पूर्ण होतील.
४. कुंकुमार्चन: दर शुक्रवारी देवीवर कुंकुमार्चन करून ते कुंकू मिश्रित पाणी घरभर शिंपडावे, जेणेकरून सकारात्मक ऊर्जा टिकून राहील.
५. नामस्मरण: 'श्री स्वामी समर्थ' जप न चुकता करावा. ६. तारक मंत्र: दररोज श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचे पठण करावे.
Swami Samartha: नवीन वर्षाच्या पाहिल्याच दिवशी घ्या स्वामींच्या 'या' मंत्राची दीक्षा!
मूळ मंत्र: 'सोच बदलो'
अस्मिता ताईंच्या मते, ज्योतिषाचे काम पत्रिकेतील उणीवा काढणे नसून 'आशेचा किरण' शोधणे हे आहे. शनि विलंब लावतो, कारण कदाचित त्या कामाची योग्य वेळ अजून आलेली नसते. ग्रहांचा धसका घेण्यापेक्षा 'सद्गुरू कृपेवर' विश्वास ठेवा. ज्याने विश्व निर्माण केले, तो तुमच्या भक्तीचा भुकेला आहे, साडी-चोळी किंवा मिठाईचा नाही, ठेवा आणि आत्मिक, अध्यात्मिक उन्नती साधण्याचा प्रयत्न करा.