Navratri 2025: देवीचे वाहन सिंह आणि लक्ष्मीचे घुबड का? त्यामागे आहे महत्त्वपूर्ण कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 15:22 IST2025-09-26T15:20:01+5:302025-09-26T15:22:38+5:30

Navratri 2025: यंदा नवरात्रीत देवी सिंहावर आरुढ होऊन आली, तिच्याप्रमाणेच तिचे वाहनही वैशिष्ट्य पूर्ण असते. ते निवडण्यामागचे कारण जाणून घेऊ.

Navratri 2025: Why is Goddess' vehicle a lion and Lakshmi's an owl? There is an important reason behind it! | Navratri 2025: देवीचे वाहन सिंह आणि लक्ष्मीचे घुबड का? त्यामागे आहे महत्त्वपूर्ण कारण!

Navratri 2025: देवीचे वाहन सिंह आणि लक्ष्मीचे घुबड का? त्यामागे आहे महत्त्वपूर्ण कारण!

यंदा देवी कशावरून आली, हा भाविकांचा दर नवरात्रीत ठरलेला प्रश्न असतो. कारण देवी जशी वैशिष्ट्यपूर्ण आहे, तसे तिचे वाहनही वैशिष्ट्यपूर्ण आहे. यंदा ती हत्तीवर स्वार होऊन आली आहे त्यामुळे ती सुबत्ता, स्थैर्य आणि वैभव देईल असे ज्योतिषांनी भाकीत केले आहे. देवी युद्धाला जाताना सिंहावर आरुढ होऊन जाते. कारण युद्ध करायचे तर वाहनही तग धरणारे हवे, शत्रूच्या वाहनाचा पराभव करणारे हवे. महिषासुर मर्दिनी रूपात देवीची प्रतिमा पाहिली तर लक्षात येईल, देवी महिषासुराचा वध करतेय तर तिचे वाहन सिंह त्या महिषासुराच्या पायाचा लचका घेत आहे. म्हणून युद्धावर सर्व शक्तिनिशी उतरणारी देवी सिंहावर स्वार होऊन जाते. विविध रूपात तिने विविध वाहने घेतली आहेत. पण घुबडासारखा दुर्लक्षित पक्षी खुद्द लक्ष्मी मातेने वाहन म्हणून घेण्याचे काय कारण असेल बरं? आळंदीचे निसर्ग निरीक्षक समीर तुर्की यांच्या लेखणीतून जाणून घेऊ. 

Budh Gochar 2025: दसऱ्याला बाराही राशी सौभाग्याचे सोने लुटणार, बुध गोचर भाग्य पालटणार

घुबड हे लक्ष्मी मातेचे वाहन आहे असे आपण म्हणतो. काही जण म्हणतात त्याच्या दर्शनाने शुभ वार्ता कळतात, धनलाभ होतो, तर काही जण म्हणतात त्याचे दिसणे अशुभ लक्षण असते. मात्र या श्रद्धा अंधश्रद्धेच्या पलीकडे जाऊन विचार केला असता घुबडाचे अस्तित्व मानवासाठी लाभदायकच ठरते, म्हणून त्याला अशुभ ठरवण्याची चूक करू नये. त्याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ. 

रहस्यमय असलेला हा पक्षी स्वतःच्या गुणांनी मात्र आई महालक्ष्मीचं वाहन अगदीच शोभून दिसतो. क्षणात कधी उडून जाईल कळणारही नाही. जशी लक्ष्मी चंचल, तसे तिचे वाहनही चंचल! ह्यांची ऐकण्याची, पाहण्याची आणि आवाज करण्याची क्षमता आपल्या कल्पनेपेक्षाही कितीतरी जास्त असते. या गुणांमुळेच लक्ष्मी मातेने हे वाहन निवडले असावे. 

नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!

काही गुण जे आपण शिकले पाहिजेत

●हे कधीही विचलित होत नाही
●हे डिवचल्याशिवाय कोणावरही विनाकारण हल्ला करत नाही
●हे कोणालाच घाबरत नाही. उलटपक्षी ह्याच्याच हल्ल्यात इतर पक्षी स्वतःची घरटी सोडून घाबरून पळून जातात.. अपवाद फक्त पक्षीराज गरुड.
●कोणी जर पाळले तर मालकावरच हल्ला केला आहे असं अपवादात्मक म्हणून सुद्धा उदाहरण सापडत नाही.

>> ज्या प्रमाणे ह्याचं चालणं रुबाबदार आणि शांत त्याचप्रमाणे ह्याचं उडणं सुद्धा अतिशय शांत आणि जबरदस्त असतं.. इतकं की हे उडतांना अजिबातच आवाज करत नाही.

>> ह्याची नजर इतकी तीक्ष्ण आणि भेदक की विचारता सोय नाही.. रात्री पाहण्याची ह्याची विलक्षण क्षमता ही तर ह्याची सर्वात ताकदीची बाजू. 

>> अगदी आरामात कोणत्याही पक्षाच्या घरट्यावर हल्ला करून तिथून आपली शिकार उचलून क्षणार्धात उडून जाणं कोणालाही धस्सं करू शकतं. जर कोणी ह्याला शिकार करतांना पाहिलं असेल किंवा ह्याची शिकार करायची पद्धत माहिती असेल तर मी काय म्हणतोय ते सहज कळेल.

Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 

लक्षात ठेवण्यासारखं काही

>> घुबडाचा हल्ला एखाद्या कुत्रं चावल्याएव्हढाच वाईट असू शकतो. कारण तो इतका वेगवान असतो की काय झालंय हे कळायला सुद्धा वेळ लागतो.

>>  घुबडाची पिल्लं कधी जमिनीवर दिसली तर त्यांच्या जास्त जवळ जाऊ नका, वरुन कुठून तरी घुबडं लक्ष ठेवून असतात आणि ती त्यांच्या पिल्ल्यांच्या बाबतीत अत्यंत सजग असल्याने भयानक आक्रमक होऊ शकतात.

>> घुबडाच्या हल्ल्यात माणसं मरत नाहीत, त्यामुळे उगाच जास्त घाबरून त्यांच्यावर प्रतिहल्ला करू नका किंवा त्यांना मारून टाकू नका तर फक्त लवकर दुसरीकडे पळून जा. 

>> आणि हो.. ह्याचा आवाज जरी ऐकू आला तरी उगाच अशुभ अशुभ म्हणून घाबरून जाऊ नका. काही अशुभ नसतं. थोडक्यात काय गैरसमजांपोटी घुबडांना घाबरून जाऊ नका, त्यांच्या शिकारी करू नका.

नवरात्र(Navratri 2025) सुरू आहे, त्यामुळे जैवविविधतील या दुर्मिळ घटकाला इजा पोहोचवू नका, उलट त्याच्यासाठी अनुकूल वातावरण निर्मिती करून पुण्यसंग्रह करा. 

Web Title : नवरात्रि 2025: देवी का सिंह और लक्ष्मी का उल्लू, क्या है महत्व?

Web Summary : नवरात्रि में देवी अलग-अलग जानवरों पर सवार होती हैं, जो अद्वितीय विशेषताओं का प्रतीक हैं। सिंह युद्ध में शक्ति का प्रतिनिधित्व करता है, जबकि लक्ष्मी का उल्लू चंचलता और तेज धारणा का प्रतीक है। उल्लू मनुष्यों के लिए फायदेमंद हैं और उन्हें अशुभ नहीं माना जाना चाहिए। नवरात्रि में जैव विविधता की रक्षा करें।

Web Title : Navratri 2025: Significance of the Goddess's Lion and Lakshmi's Owl.

Web Summary : During Navratri, the Goddess rides different animals, each symbolizing unique attributes. The lion represents strength in battle, while Lakshmi's owl signifies agility and sharp perception. Owls benefit humans and should not be considered inauspicious. Protect biodiversity during Navratri.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.