Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 15:52 IST2025-09-25T15:52:20+5:302025-09-25T15:52:53+5:30
Navratri 2025: नवरात्रीत अनेक घरांमध्ये अखंड दिवा लावण्याची प्रथा आहे, पण तुम्हाला तसे करणे शक्य झाले नाही, तर शेवटच्या दोन दिवसात करा हा उपाय!

Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील
नवरात्रीच्या(Navratri 2025) उपासनेचे अनेक प्रकार आहेत. पैकी एक म्हणजे देवघरात अखंड दिवा लावणे. ते एक व्रत आहे आणि ते नवरात्रीच्या नऊ दिवसात अखंडपणे पाळावे लागते. मात्र काही कारणाने ज्यांना ते पाळणे शक्य होत नाही त्यांच्यासाठी ज्योतिष शास्त्रात उपाय दिला आहे, तो जाणून घ्या.
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
नवरात्रीत अष्टमी आणि नवमीच्या तिथींना विशेष महत्त्व दिले जाते. यंदा अष्टमी पूजा ३० सप्टेंबर रोजी केली जाईल, तर नवमी पूजा १ नोव्हेंबर रोजी केली जाईल. म्हणून, या दिवसांमध्ये तुमच्या घरात एका विशिष्ट ठिकाणी दिवे ठेवल्याने तुम्हाला केवळ देवीची आशीर्वाद मिळत नाहीत तर तुमच्या घरात आनंद आणि समृद्धी देखील नांदते.
अष्टमी नवमीला दिवा लावण्याचे लाभ :
>> शारदीय नवरात्रात, तुम्ही संध्याकाळी तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावू शकता. असे करणे वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून शुभ मानले जाते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो, आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होते. दिव्याची ज्योत उत्तरेकडे ठेवा.
>> अष्टमी-नवमीला सायंकाळी आठवणीने तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा. यामुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होईल आणि आनंद आणि समृद्धी येईल.
ललिता पंचमी व्रत २०२५: शुक्रवारी इच्छापूर्तीसाठी 'असे' करा ललिता पंचमीचे व्रत; टाळा 'ही' एक चूक!
>> वास्तुशास्त्रात, घराच्या ईशान्य कोपऱ्यात दिवा लावणे खूप शुभ मानले जाते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. म्हणून, नवरात्रीच्या आठव्या आणि नवव्या दिवशी या दिशेने दिवा लावल्याने सकारात्मक परिणाम मिळू शकतात. असे केल्याने देवीचे आशीर्वाद मिळतात.
>> नवरात्रीत देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी, देवीच्या मंदिरात जाऊन दिवा लावून या, त्यामुळे तुमचेही आयुष्य चैतन्य, ऊर्जा आणि सकारात्मकतेने उजळून निघेल.
देवीचा नामजप आणि दिव्याचा हा उपाय अष्टमी-नवमीला केला तरी नऊ दिवस अखंड दिवा लावल्याचे पुण्य मिळेल.