Navratri 2025: अश्विन शुद्ध सप्तमीला सरस्वतीला आवाहन आणि दशमीला पूजन; ३ दिवसांचा शारदोत्सव का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 17:11 IST2025-09-29T17:11:12+5:302025-09-29T17:11:43+5:30
Navratri 2025: सध्या नवरात्रोत्सव सुरु आहे, पण त्यात शेवटचे तीन दिवस देवी शारदेचे पूजन का आणि कसे केले जाते ते जाणून घ्या.

Navratri 2025: अश्विन शुद्ध सप्तमीला सरस्वतीला आवाहन आणि दशमीला पूजन; ३ दिवसांचा शारदोत्सव का?
यंदा २ ऑक्टोबर रोजी दसरा(Dussehra 2025) आहे आणि त्यादिवशी सरस्वती पूजन केले जाते. त्याची सुरुवात अश्विन शुद्ध सप्तमीला म्हणजेच आजच्या दिवशी २९ सप्टेंबर रोजी केली जाते. असा हा तीन दिवसाचा शारदोत्सव का आणि कसा साजरा करायचा ते जाणून घेऊ.
Dussehra 2025: आपट्याचे पान देऊन 'सोनं लुटणं' म्हणण्याचा प्रघात कसा रूढ झाला माहितीय?
शारदीय नवरात्रीत देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. अश्विन शुद्ध षष्ठीला सरस्वतीचे आगमन होते आणि सप्तमीला पूजन. आपण दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजन करतोच, परंतु नवरात्रीत सरस्वतीची खरी पूजा सप्तमीला सुरू होऊन दशमीला अर्थात दसऱ्याच्या दिवशी पूर्ण होते. ही पूजा आपण सर्वांनी केली पाहिजे. विशेषतः विद्यार्थ्यांनी ही पूजा केली असता अनेक लाभ होतात, असे शास्त्र सांगते. ते उपाय जाणून घेऊ.
प्रत्येकासाठी नवरात्रीचे महत्त्व आहे. या नऊ दिवसांमध्ये, विद्यार्थ्यांनी देवी सरस्वतीची पूजा केली पाहिजे. कारण सरस्वती देवी हे विद्येचे रूप आहे. विद्या, शिक्षण, ज्ञान नसेल तर आयुष्याला वळण लाभत नाही. म्हणून नवरात्रीच्या शेवटच्या तीन दिवसात हा शारदोत्सव केला जातो. जेणेकरून देवीच्या या रूपाचेही पूजन व्हावे. आज सरस्वतीला आवाहन करून तिची कृपा लाभावी म्हणून प्रार्थना करायची आहे. ज्यांना सरस्वतीच्या कठीण मंत्राचा जप करता येत नाही, त्यांच्यासाठी येथे सरस्वतीचा साधा मंत्र येथे देत आहे. नवरात्रीमध्ये या मंत्राचा जप करण्यास सुरुवात केली असता, त्यात सातत्य ठेवून नित्य पठण केल्यास ज्ञान आणि बुद्धीमध्ये वाढ होते. पुढील मंत्र म्हणा -
'ॐ शारदा माता ईश्वरी मैं नित सुमरि तोय हाथ जोड़ अरजी करूं विद्या वर दे मोय।'
सरस्वती मातेची कृपादृष्टी लाभून शैक्षणिक मार्गातील सर्व अडथळे दूर व्हावेत म्हणून हा मंत्रजप केला जातो.
शारदा शारदांभौजवदना, वदनाम्बुजे। सर्वदा सर्वदास्माकमं सन्निधिमं सन्निधिमं क्रियात्।
शरद ऋतूत जन्माला आलेली, कमळासारखा प्रफुल्लित चेहरा असलेली आणि सर्व इच्छा पूर्ण करणारी देवी शारदा तुझी कृपा माझ्यावर सदैव राहू दे.
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
सरस्वतीचा बीज मंत्र 'क्लिं' आहे. शास्त्रांमध्ये, क्लिंकरी कामरूपीनाय अर्थात 'क्लिं' कार्याच्या रूपात आदरणीय आहे. पुढील मंत्र हा सिध्दिमंत्र आहे. यालाच सरस्वतीचा दिव्य मंत्र असेही म्हटले जाते.
सरस्वती गायत्री मंत्र : 'ॐ वागदैव्यै च विद्महे कामराजाय धीमहि। तन्नो देवी प्रचोदयात्।'
हा मंत्र पटकन पाठ होण्यासारखा आहे. या मंत्राचा जप करत ५ वेळा जपमाळ ओढावी. त्यामुळे अभ्यासात लक्ष केंद्रित होऊन यश प्राप्त होते. विद्यार्थ्यांनी ध्यान करण्यासाठी त्राटक केले पाहिजे. दररोज १० मिनिटे त्राटक केल्याने स्मरणशक्ती वाढते. त्याला उपासनेची जोड म्हणून सरस्वतीचे सिद्धमंत्र नियमित म्हणावेत. जपाचे सामर्थ्य असे की, की त्यामुळे इतर विषयांतून लक्ष दूर होऊन अभ्यासात केंद्रित होते. त्यामुळे अभ्यासात प्रगती होण्यास मदत होते.