मार्गशीर्ष गुरुवार २०२५: मार्गशीर्षातले ४ गुरुवार 'अशी' करा स्वामी उपासना; दुप्पट लाभ होईल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 11:26 IST2025-11-26T11:25:46+5:302025-11-26T11:26:39+5:30
Margashirsha Guruvar 2025: २७ नोव्हेंबर रोजी मार्गशीर्षातला पहिला गुरुवार आहे, त्यानिमित्त महालक्ष्मी उपासनेला स्वामी उपासनेची जोड द्या; दुप्पट लाभ होईल.

मार्गशीर्ष गुरुवार २०२५: मार्गशीर्षातले ४ गुरुवार 'अशी' करा स्वामी उपासना; दुप्पट लाभ होईल!
मार्गशीर्ष महिना हा धार्मिक दृष्टीने अत्यंत पवित्र मानला जातो, कारण हा महिना साक्षात धन आणि ऐश्वर्याची देवी माता लक्ष्मीला समर्पित आहे. या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी व्रत केले जाते. त्याबरोबरच या महिन्यात दत्त उपासना, गुरु उपासनाही महत्त्वाची ठरते. कारण घरात आलेली लक्ष्मी वाईट मार्गाने जाऊ नये किंवा वाईट मार्गाने कमावलेली लक्ष्मी घरात येऊ नये, यासाठी मन, बुद्धी स्थिर हवी, ती गुरु कृपेने होते. म्हणून या महिन्यात लक्ष्मी उपासनेला गुरु उपासनेचीही जोड दिली जाते. ४ डिसेंबर रोजी दत्त जयंती(Datta Jayanti 2025) आहे आणि २७ नोव्हेंबर रोजी मार्गशीर्षातला पहिला गुरुवार तसेच दत्त नवरात्रीचा(Datta Navratra 2025) प्रारंभ होत आहे. त्यानिमित्त दिलेली गुरु उपासना जरूर सुरु करा.
मार्गशीर्षातला पहिला गुरुवार, महालक्ष्मी व्रताची तयारी झाली का? वाचा साहित्य आणि पूजाविधी
उपासनेचे महत्त्व :
गुरुवार हा मूळतः गुरू ग्रहाचा दिवस आहे. स्वामी समर्थांना साक्षात दत्तावतार मानले जाते, आणि दत्तात्रय हे सर्व गुरूंचे गुरु आहेत. त्यामुळे, महालक्ष्मी व्रताच्या या विशेष गुरुवारी स्वामींची उपासना केल्यास महालक्ष्मीची कृपा आणि स्वामींचा आशीर्वाद अशा दोन्ही गोष्टी प्राप्त होतात, ज्यामुळे घरात स्थिरता, शांती आणि धन-समृद्धी येते.
स्वामी समर्थ उपासना विधी :
ब्रह्म मुहूर्तावर किंवा सूर्योदयाआधी उठून स्नान करावे. शक्य असल्यास पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे.
पूजेच्या ठिकाणी चौरंग किंवा पाट मांडावा. महालक्ष्मीच्या कलशाशेजारी किंवा बाजूला श्री स्वामी समर्थांची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी. दोन्ही नसेल तर निदान महालक्ष्मीचे आणि स्वामींचे मनोभावे स्मरण करावे.
मूर्तीला किंवा देव्हाऱ्यातील देवांना हळद-कुंकू, चंदन आणि अक्षता अर्पण कराव्यात. त्यांना पिवळ्या फुलांची माळ अर्पण करावी.
शुद्ध तुपाचा दिवा (निरांजन) लावावा.
स्वामींना नैवेद्यासाठी दूध-साखर, किंवा गुळ-शेंगदाण्याचा नैवेद्य अर्पण करणे विशेष शुभ मानले जाते.
महालक्ष्मी व्रतकथा: महालक्ष्मी व्रत कथेशिवाय पूजा अपूर्ण; पती-पत्नीने मिळून वाचल्यास मिळते अधिक फळ!
मुख्य उपासना:
नित्य जप: स्वामी समर्थांचा मुख्य मंत्र "श्री स्वामी समर्थ" या मंत्राचा कमीत कमी १०८ वेळा (एक माळ) जप करावा.
तारक मंत्र: श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र आणि अष्टक यांचे वाचन करणे विशेष फलदायी ठरते.
गुरुचरित्र वाचन: शक्य असल्यास, या दिवशी 'गुरुचरित्र' ग्रंथातील गुरुवारचा अध्याय (उदा. १४, १८ वा) किंवा संपूर्ण पारायण करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते.
प्रार्थना: पूजेच्या शेवटी, "माझ्या घरावर आपली आणि महालक्ष्मीची कृपादृष्टी कायम राहो" अशी प्रार्थना करावी.
दत्त नवरात्र २०२५: दत्त नवरात्र कधीपासून? कशी करावी उपासना आणि कशाने मिळेल सर्वाधिक फळ?
स्वामी उपासनेचे विशेष लाभ
अटल विश्वास: स्वामींच्या उपासनेमुळे जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी अटल विश्वास आणि मानसिक शांती मिळते.
धन आणि समृद्धी: महालक्ष्मी व्रतासोबत स्वामींची उपासना जोडल्यास स्थिर धनलाभ होतो.
अशक्य ते शक्य: स्वामींच्या कृपेने अनेक अशक्य वाटणारी कार्ये देखील मार्गी लागतात, अशी भक्तांची श्रद्धा आहे.
मार्गशीर्षाचा हा पहिला गुरुवार स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती घेऊन येवो!