Makar Sankranti 2026: मकर संक्रांत ते रथसप्तमी; हळदी-कुंकवासाठी हाच काळ का निवडला जातो?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 17:10 IST2026-01-14T16:41:05+5:302026-01-14T17:10:09+5:30
Makar Sankranti 2026 Haldi Kunku Ceremony: यंदा १४ ते २५ जानेवारी या काळात अर्थात रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू समारंभ केला जाईल, पण हाच कालावधी योजण्यामागे नेमके कारण काय ते पाहू.

Makar Sankranti 2026: मकर संक्रांत ते रथसप्तमी; हळदी-कुंकवासाठी हाच काळ का निवडला जातो?
Haldi Kunku Importance in Marathi: भारतीय संस्कृतीत मकर संक्रांतीला सूर्य उत्तरायणात प्रवेश करतो. हा काळ अत्यंत शुभ मानला जातो. संक्रांतीपासून सुरू होणारे हळदी-कुंकवाचे कार्यक्रम रथसप्तमी (सूर्याचा जन्मदिवस) पर्यंत चालतात. या सोहळ्यामागे केवळ परंपरा नाही, तर अनेक महत्त्वाची कारणे आहेत.
Makar Sankranti 2026: किंक्रांत म्हणजे नेमके काय? जाणून घ्या हा दिवस खरंच अशुभ असतो का?
१. आदिमाया शक्तीची उपासना
हळदी-कुंकू हा सुवासिनींचा सण आहे. हळद आणि कुंकू हे सौभाग्याचे आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते. या सोहळ्याच्या निमित्ताने सुवासिनी एकमेकींमधील 'स्त्री तत्त्वाचा' किंवा 'देवी तत्त्वाचा' सन्मान करतात. एकमेकींना हळद-कुंकू लावणे म्हणजे समोरच्या स्त्रीमधील देवत्वाची पूजा करणे होय.
२. ऋतुमानानुसार आरोग्याचे महत्त्व (शास्त्रीय कारण)
हा काळ थंडीचा असतो. संक्रांतीच्या वाणात आपण तीळ, गूळ, ऊस, हरभरे, बोरं आणि गाजर अशा गोष्टी देतो.
तीळ-गूळ: उष्णता वाढवण्यासाठी आणि स्निग्धता टिकवण्यासाठी उपयुक्त असतात.
वाण लुटणे: या निमित्ताने शरीराला आवश्यक असणारी हिवाळ्यातील फळे आणि धान्ये एकमेकींना दिली जातात, ज्यामुळे आरोग्याची काळजी घेतली जाते.
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक स्वभावाने तीळगुळाहून गोड, पण चिडले की समोरच्यावर संक्रांत!
३. सामाजिक सलोखा आणि संवादाचे माध्यम
पूर्वीच्या काळी स्त्रियांना घराबाहेर पडून सामाजिक कार्यात सहभागी होण्याच्या संधी मर्यादित होत्या. अशा वेळी हळदी-कुंकू हे एक हक्काचे व्यासपीठ होते. या निमित्ताने महिला एकत्र येतात, सुख-दु:ख वाटून घेतात आणि विचारांची देवाणघेवाण करतात. 'तिळगुळ घ्या आणि गोड बोला' असे म्हणून जुने हेवेदावे विसरून नाती पुन्हा जोडली जातात.
४. रथसप्तमीपर्यंतच का?
रथसप्तमी हा सूर्याच्या रथाचा मार्ग बदलण्याचा आणि सूर्याचा प्रखर प्रकाश पृथ्वीवर येण्याचा दिवस आहे. रथसप्तमीला संक्रांतीच्या 'संक्रमण' काळाची सांगता होते. असे मानले जाते की, या दिवसापर्यंत निसर्गात चैतन्य पूर्णपणे पसरलेले असते. म्हणून संक्रांतीला सुरू झालेला हा आनंदाचा सोहळा रथसप्तमीला पूर्ण होतो.
५. 'वाण' लुटण्याचे महत्त्व
हळदी-कुंकवाच्या वेळी वाण (भेटवस्तू) दिले जाते. वाण म्हणजे केवळ वस्तू नसून ते 'दानाचे' एक रूप आहे. दान केल्याने पुण्य मिळते आणि घरातील समृद्धी वाढते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.