Maha Shivratri 2026: शरीराचे कंपन आणि पाणावलेले डोळे देतील दिव्य प्रचिती; महाशिवरात्रीचा 'तो' ५२ मिनिटांचा काळ महत्त्वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 15:28 IST2026-02-12T15:27:43+5:302026-02-12T15:28:48+5:30

Mahashivratri 2026 Vrat Importance in Marathi: महाशिवरात्रीला 'या' ठराविक कालावधीत तुमची प्रत्येक इच्छा महादेवापर्यंत पोहोचवण्याची आहे सुवर्णसंधी; सविस्तर वाचा. 

Mahashivratri 2026: Body vibrations and watery eyes will give a divine feeling; 'That' 52 minutes of Mahashivratri is important! | Maha Shivratri 2026: शरीराचे कंपन आणि पाणावलेले डोळे देतील दिव्य प्रचिती; महाशिवरात्रीचा 'तो' ५२ मिनिटांचा काळ महत्त्वाचा!

Maha Shivratri 2026: शरीराचे कंपन आणि पाणावलेले डोळे देतील दिव्य प्रचिती; महाशिवरात्रीचा 'तो' ५२ मिनिटांचा काळ महत्त्वाचा!

फेब्रुवारी १५, २०२६ रोजी साजरी होणारी महाशिवरात्री(Mahashivratri 2026) ही केवळ उपवासाची  किंवा उपासनेची रात्र नसून, ती ब्रह्मांडीय ऊर्जा (Cosmic Energy) आपल्या बाजूने वळवण्याची एक मोठी संधी आहे. महाशिवरात्रीच्या रात्री येणारा 'निशीत काळ' हा भगवान शिवाची आराधना आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी (Manifestation) सर्वात शक्तिशाली मानला जातो.

महाशिवरात्री २०२६: नशिबाची साथ कोणाला मिळणार? महादेवाच्या कृपेसाठी राशीनुसार करा 'हे' दान

महाशिवरात्रीच्या रात्री जेव्हा जग निद्रावस्थेत असते, तेव्हा शिवभक्त मात्र 'जागर' करतात. हा जागर केवळ डोळे उघडे ठेवण्यासाठी नसून तो अंतर्मनातील इच्छा जागृत करण्यासाठी असतो. यंदा १५ फेब्रुवारीला रात्री १२:०९ ते पहाटे १:०१ या मुहूर्तावर 'निशीत काळ' असेल. हा असा काळ आहे जेव्हा शिव आणि शक्तीचे मिलन होते आणि विश्वातील ऊर्जा उच्च स्तरावर असते.

मॅनिफेस्टेशन (Manifestation) विधी: 

जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात एखादा सकारात्मक बदल हवा असेल किंवा एखादी इच्छा पूर्ण करायची असेल, तर निशीत काळात खालील कृती करा:

१. तुमची इच्छा लिहा: रात्री १२:०९ ते १:०१ च्या दरम्यान शांत ठिकाणी बसा. एका कागदावर तुमची इच्छा 'पूर्ण झाली आहे' अशा सकारात्मक भाषेत लिहा. 
२. १०८ वेळा मंत्रजप: डोळे मिटून 'ॐ नमः शिवाय' या मंत्राचा १०८ वेळा जप करा. जप करताना तुमची इच्छा पूर्ण होत असल्याचे दृश्य (Visualize) डोळ्यांसमोर आणा. 
३. शरण जा (Surrender): जप पूर्ण झाल्यानंतर तो कागद महादेवाच्या चरणी अर्पण करा किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवा. "हे महादेवा, मी माझी इच्छा तुझ्या चरणी सोपवत आहे, आता तूच मार्ग दाखव," असा भाव ठेवा. 
४. विश्वास ठेवा: विधी पूर्ण झाल्यावर 'विश्वास' ठेवा की प्रक्रिया सुरू झाली आहे.

महाशिवरात्री २०२६: ७२ तासांचा महासंयोग! महाशिवरात्रीला जोडून आले 'हे' दोन मोठे शुभ योग बदलतील तुमचे नशीब!

शक्तीची प्रचिती कशी ओळखावी?

हा विधी करताना जर तुम्हाला खालीलपैकी काही जाणवले, तर समजा की तुमची प्रार्थना महादेवापर्यंत पोहोचली आहे:

>> शरीरात विशेषतः पाठीच्या कण्यात कंपने (Vibrations) जाणवणे.

>> डोळ्यांतून आनंदाश्रू येणे किंवा मन अत्यंत भावूक होणे.

>> हृदय चक्र किंवा आज्ञा चक्र (Third Eye) जवळ ऊर्जेची हालचाल जाणवणे.

Solar Eclipse 2026: सूर्यग्रहणाबरोबरच पंचकाचेही सावट; ज्योतिषांनी दिलाय खास 'या' राशींना सावधतेचा इशारा!

निशीत काळ का महत्त्वाचा?

निशित काळ (Nishita Kaal) हा हिंदू पंचांगानुसार मध्यरात्रीचा आठवा मुहूर्त आहे, जो सामान्यतः १ तासापेक्षा कमी असतो. महाशिवरात्रीच्या वेळी हा काळ अत्यंत शुभ मानला जातो, जेव्हा महादेवाचे अस्तित्व पृथ्वीवर सक्रिय असते असे मानले जाते. या कालावधीत पूजा, अभिषेक आणि नामस्मरण करणे अत्यंत पुण्यफलदायी मानले जाते. पाहा व्हिडिओ - 


 

Web Title : महाशिवरात्रि २०२६: दिव्य ऊर्जा का अनुभव; महत्वपूर्ण ५२ मिनट का समय

Web Summary : महाशिवरात्रि २०२६, १५ फरवरी को, 'निशिता काल' में इच्छाओं को प्रकट करने का एक शक्तिशाली अवसर प्रदान करती है। १२:०९ पूर्वाह्न से १:०१ पूर्वाह्न तक, मनिफेस्टेशन अनुष्ठानों में इच्छाओं को लिखना, 'ओम नमः शिवाय' का जाप करना और भगवान शिव को समर्पित करना शामिल है। कंपन या आँसू का अनुभव प्रार्थना स्वीकृति का संकेत देता है।

Web Title : Mahashivratri 2026: Experience Divine Energy; The Crucial 52-Minute Window

Web Summary : Mahashivratri 2026 offers a powerful opportunity to manifest desires during the 'Nishita Kaal,' from 12:09 AM to 1:01 AM on February 15th. Manifestation rituals include writing desires, chanting 'Om Namah Shivaya,' and surrendering to Lord Shiva. Experiencing vibrations or tears indicates prayer acceptance.