शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

Lunar Eclipse 2026: चंद्रग्रहणाचे वेध कधीपासून? कोणावर परिणाम? कशी घ्यावी काळजी; घ्या इत्थंभूत माहिती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 12:36 IST

Lunar Eclipse 2026: ३ मार्च २०२६: धुळवडीच्या दिवशी वर्षातील पहिले चंद्रग्रहण! जाणून घ्या ग्रहणाची वेळ, होणारा परिणाम आणि उपाय!

२०२६ मधील पहिले चंद्रग्रहण(Lunar Eclipse 2026) मंगळवार, ३ मार्च रोजी होत आहे. हे ग्रहण 'पूर्ण चंद्रग्रहण' असून ते होळीच्या(Holi 2026) (धुलिवंदन) दिवशी येत असल्याने त्याचे महत्त्व अधिक वाढले आहे. कन्या राशी आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात होणारे हे ग्रहण जगभरातील अनेक भागांसह भारतातही ज्योतिषशास्त्रीय दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे.

Holi 2026 Date: २ की ३ मार्च कधी आहे होळी? पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी केला शास्त्रोक्त माहितीसह खुलासा 

चंद्रग्रहणाची वेळ (भारतीय प्रमाणवेळेनुसार) (Lunar Eclipse Indian Time)

खगोलशास्त्रीय गणनानुसार ग्रहणाच्या वेळा खालीलप्रमाणे असतील:

ग्रहणाची सुरुवात (Penumbral Phase): दुपारी १:४२ वाजता

खंडग्रास ग्रहण प्रारंभ (Partial Phase): दुपारी २:५० वाजता

खग्रास ग्रहण प्रारंभ (Total Phase Begins): दुपारी ४:०४ वाजता

ग्रहणाचा मध्य (Maximum Eclipse): सायंकाळी ४:५४ वाजता

खग्रास ग्रहण समाप्त (Total Phase Ends): सायंकाळी ५:४४ वाजता

ग्रहणाचा मोक्ष (Partial Phase Ends): सायंकाळी ६:५८ वाजता

(भारतात ग्रहणाचे वेध सकाळी ६ वाजल्यापासूनच पाळणे शास्त्रशुद्ध मानले जाईल.)

Holika Dahan 2026: यंदा होळीत द्या 'या' ८ वस्तूंची आहुती; दारिद्र्य, रोगराई, गृहक्लेशातून मिळेल मुक्ती

ज्योतिषशास्त्रीय प्रभाव (Astrological Impacts):

१. कन्या आणि मीन राशीवर सर्वाधिक परिणाम:

हे ग्रहण कन्या राशीत होत असल्याने, कन्या आणि त्याच्या समोरील मीन राशीच्या व्यक्तींनी अधिक सावध राहणे आवश्यक आहे. त्यांना मानसिक तणाव किंवा आरोग्याच्या तक्रारी जाणवू शकतात.

२. भावनिक अस्थिरता:

चंद्र हा मनाचा कारक असल्याने या काळात लोकांमध्ये विनाकारण चिडचिड, भीती किंवा भावनिक गोंधळ निर्माण होऊ शकतो. महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नका.

३. होळीच्या उत्सवावर परिणाम:

होळीच्या दिवशीच ग्रहण असल्याने, रंग खेळताना आणि सण साजरा करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. चंद्र ग्रहणामुळे होलिका दहन आदल्या दिवशी म्हणजेच २ मार्च रोजी केली जाईल आणि ३ मार्चला ग्रहण काळ पाळला जाईल. 

४. नैसर्गिक आणि राजकीय बदल:

या ग्रहणामुळे नैसर्गिक आपत्ती किंवा राजकीय क्षेत्रात मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळतात. शेअर बाजार आणि सोन्याच्या दरामध्येही चढ-उतार पाहायला मिळू शकतात.

होलाष्टक २०२६: होलाष्टकाचा दुष्परिणाम टाळण्यासाठी होळीपूर्वी ८ दिवस राशीनुसार काय करावे आणि काय टाळावे?

चंद्रग्रहणाचे नियम 

चंद्रग्रहण ही केवळ एक खगोलशास्त्रीय घटना नसून आध्यात्मिक दृष्टीने हा काळ अत्यंत संवेदनशील मानला जातो. या काळात वातावरणातील सूक्ष्म लहरींचा परिणाम आपल्या अन्नावर आणि मनावर होत असतो.

१. ग्रहण कोणी पाळावे आणि कोणी टाळावे?

सामान्य निरोगी व्यक्तींनी ग्रहण आणि त्याचे वेध आवर्जून पाळावेत. ग्रहणाच्या काळात शारीरिक आणि मानसिक उर्जेचे रक्षण करणे महत्त्वाचे असते. लहान मुले, वृद्ध व्यक्ती, आजारी माणसे आणि गर्भवती महिलांना शास्त्राने ग्रहणाचे कडक नियम पाळण्यात सवलत दिली आहे. त्यांनी त्यांच्या तब्येतीनुसार आहार आणि विश्रांती घ्यावी, मात्र शक्य असल्यास देवाचे नामस्मरण नक्की करावे.

२. आहार विषयक नियम (काय खावे आणि काय टाळावे?)

ग्रहणाचे वेध लागल्यापासून (सूतक काळात) जेवण टाळावे. शिजवलेले अन्न ग्रहण काळात दूषित होते असे मानले जाते, त्यामुळे ग्रहण लागण्यापूर्वीच जेवण उरकावे. ग्रहण काळात पाणी पिणेही शक्यतो टाळावे. मात्र गरज पडल्यास तुळशीचे पान टाकलेले पाणी प्यावे. घरात असलेले दूध, दही किंवा साठवलेले पाणी यामध्ये 'तुळशीचे पान'किंवा 'दर्भ' टाकावेत. यामुळे त्यातील नैसर्गिक गुणधर्म टिकून राहतात आणि ग्रहणाच्या लहरींचा त्यावर परिणाम होत नाही. ग्रहण सुटल्यानंतर स्नान करून ताजे शिजवलेले अन्न खाणे उत्तम मानले जाते.

३. ग्रहण काळात काय टाळावे? (वर्ज्य गोष्टी)

ग्रहण सुरू असताना झोपणे टाळावे (आजारी लोकांसाठी अपवाद). ग्रहण काळात भाजी चिरणे, कापड कापणे किंवा शिवणकाम करणे अशुभ मानले जाते. कोणतेही नवीन किंवा महत्त्वाचे काम ग्रहण काळात सुरू करू नये.

Holashtak 2026: येत्या आठ दिवसात काहीही खरेदी करण्यापूर्वी 'हे' वाचा; सुरु होत आहे होलाष्टक!

४. कोणते नामस्मरण करावे? (मंत्र साधना)

ग्रहण काळ हा मंत्र सिद्धीसाठी आणि नामस्मरणासाठी सर्वोत्तम मानला जातो. या काळात केलेला जप हजार पटीने अधिक फळ देतो असे म्हणतात. 'ओम सोमाय नमः' चा जप करावा तसेच 'ओम नमो भगवते वासुदेवाय' किंवा 'महामृत्युंजय मंत्र' म्हणावा. नकारात्मकता दूर करण्यासाठी 'हनुमान चालीसा' किंवा 'बजरंग बाण' पठण करावे. आपल्या कुलदैवताचे नाव घेणे सर्वात जास्त प्रभावी ठरते.

English
हिंदी सारांश
Web Title : Lunar Eclipse 2026: Timing, Impact, and Precautions – Complete Guide

Web Summary : The March 3, 2026 lunar eclipse, a total eclipse on Holi, impacts Virgo and Pisces. Astrologically sensitive, expect emotional volatility, and potential natural or political shifts. Follow precautions regarding food, activities, and chant mantras for positivity and well-being during this time.
टॅग्स :Lunar Eclipseचंद्रग्रहणHoliहोळी 2026Holika Dahanहोलिका दहनIndian Festivalsभारतीय उत्सव-सणPuja Vidhiपूजा विधीTraditional Ritualsपारंपारिक विधीAstrologyफलज्योतिष