दिवाळीच्या (Diwali 2025) पाच दिवसांच्या उत्सवातील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मी पूजन (Laxmi Pujan 2025). अश्विन अमावस्येला (यावर्षी, २१ ऑक्टोबर, मंगळवार) लक्ष्मी पूजन मोठ्या उत्साहाने साजरे केले जाते. या दिवशी स्थिर धन-संपत्तीची देवी माता लक्ष्मी, गणेश (बुद्धी आणि शुभ-लाभासाठी) आणि कुबेर (धनाचे रक्षण करणारे देव) यांची विधिवत पूजा केली जाते. या पूजेमागे अशी श्रद्धा आहे की, या रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवर संचार करते आणि जे भक्त स्वच्छ घरात तिचे स्वागत करतात, त्यांच्या घरी ती दीर्घकाळ वास करते.
सोमवती अमावस्या आणि लक्ष्मी पूजनाचा दुर्मिळ योग; 'या' ७ राशींच्या आयुष्याला मिळणार कलाटणी
लक्ष्मी पूजनाचे महत्त्व (Laxmi Pujan Importance)
लक्ष्मी पूजनाचा मुख्य उद्देश घरात धन, समृद्धी आणि ऐश्वर्य कायम राहावे हा असतो. या पूजेने केवळ पैसाच नाही, तर आरोग्य, यश आणि मानसिक शांती देखील प्राप्त होते. लक्ष्मी पूजनाच्या रात्री घरात तेलाचे, तुपाचे दिवे लावले जातात, जे अंधारावर प्रकाशाचा विजय दर्शवतात. या प्रकाशात माता लक्ष्मी सहजपणे घरात प्रवेश करते.
पूजेचा शुभ मुहूर्त (Laxmi Pujan Shubh Muhurta 2025)
लक्ष्मी पूजनासाठी सर्वात शुभ वेळ प्रदोष काळ (सूर्यास्तानंतरचा काळ) आणि वृषभ काल (स्थिर लक्ष्मीचा काळ) मानला जातो. २१ ऑक्टोबर, मंगळवार रोजी सायंकाळी ५.३२ वाजल्यापासून ते रात्री ८.१६ वाजेपर्यंत (वेळेत स्थानिक पंचांगानुसार थोडा बदल असू शकतो) हा पूजेसाठी उत्तम शुभ मुहूर्त आहे. याच काळात विधिवत पूजा केल्यास लक्ष्मीची स्थिर कृपा प्राप्त होते.
पूजेसाठी लागणारे साहित्य (Laxmi Pujan Puja List 2025) :
लक्ष्मी पूजनाच्या तयारीसाठी अनेक वस्तूंची आवश्यकता असते. पूजेसाठी लागणारे मुख्य साहित्य म्हणजे लक्ष्मी आणि गणेशाची मूर्ती, पूजेसाठी पाट (चौरंग), लाल किंवा पिवळे वस्त्र, तांब्याचा कलश, अक्षता, हळद-कुंकू, गंगाजल, जानवे, पंचामृत, धूप-दीप आणि कापूर. नैवेद्यासाठी दूध-साखरेचा प्रसाद आणि फळे लागतील. यासोबतच कमळ, गुलाब, बेलपत्र, श्रीफळ (नारळ), नवीन नाणी (रुपये), सोन्याची किंवा चांदीची वस्तू, तसेच हळदीची गाठ आणि आंब्याची पाने पूजेत अवश्य वापरावीत.
लक्ष्मी पूजनाची विधिवत पूजा खालीलप्रमाणे करावी:
स्वच्छता आणि स्थापना: पूजेच्या जागेची पूर्ण स्वच्छता करून त्यावर पाट (चौरंग) ठेवा आणि त्यावर लाल वस्त्र पसरावे. पाटावर तांदळाचे छोटे आसन (रास) तयार करून त्यावर लक्ष्मी आणि गणेशाची मूर्ती स्थापित करावी.
कलश स्थापना आणि दीप प्रज्वलन: मूर्तीजवळ पाण्याने भरलेला तांब्याचा कलश ठेवा. तुपाचा दिवा (उदा. तिन्हीसांजेचा दिवा) लावा आणि 'दीप' हे साक्षात् विष्णूंचे स्वरूप आहे, या भावनेने त्यांना आवाहन करून पूजेला सुरुवात करा.
संकल्प आणि गणेश पूजा: उजव्या हातात पाणी घेऊन पूजेचा संकल्प करावा. त्यानंतर प्रथम भगवान गणेशाची पूजा करावी, त्यांना दुर्वा आणि मोदक किंवा मिठाई अर्पण करावेत. तयार केलेला फराळ अर्पण करावा.
लक्ष्मी पूजा आणि मंत्र: आता माता लक्ष्मीची विधिवत पूजा सुरू करावी. त्यांना हळद-कुंकू, अक्षता, कमळाचे फूल आणि कमलगट्टा अर्पण करावा. यानंतर 'ॐ महालक्ष्म्यै नमः' किंवा 'ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः' या मंत्राचा १०८ वेळा जप करावा.
नैवेद्य आणि आरती: तयार केलेला नैवेद्य माता लक्ष्मीला अर्पण करावा. मूर्तीसमोर पैसा, दागिने, नवीन वस्तू ठेवाव्यात. शेवटी, लक्ष्मीची आणि गणपतीची आरती करून सर्वांना प्रसाद वाटावा आणि देवघरात नंदादीप आणि घरात पणत्यांची रोषणाई करावी.
श्री महालक्ष्मी आरती | Shri Mahalakshmi Aarti
Web Summary : Laxmi Pujan, celebrated on Ashwin Amavasya, seeks wealth and prosperity. The most auspicious time is Pradosh Kaal. Essential items include idols, kalash, and sweets. Perform Lakshmi and Ganesh puja with mantras.
Web Summary : लक्ष्मी पूजन अश्विन अमावस्या को मनाया जाता है, जिसका उद्देश्य धन और समृद्धि प्राप्त करना है। प्रदोष काल सबसे शुभ समय है। मूर्तियों, कलश और मिठाई सहित आवश्यक वस्तुएं शामिल हैं। मंत्रों के साथ लक्ष्मी और गणेश की पूजा करें।