ललिता पंचमी व्रत २०२५: शुक्रवारी इच्छापूर्तीसाठी 'असे' करा ललिता पंचमीचे व्रत; टाळा 'ही' एक चूक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 11:38 IST2025-09-25T11:35:39+5:302025-09-25T11:38:32+5:30

Lalita Panchami Vrat 2025: २६ सप्टेंबर रोजी ललिता पंचमी आहे, नवरात्रीत या व्रताला अतिशय महत्त्व आहे, ते का आणि कसे करायचे ते सविस्तर जाणून घ्या. 

Lalita Panchami Vrat 2025: Do this Lalita Panchami Vrat on Friday to fulfill your wishes; Avoid this mistake! | ललिता पंचमी व्रत २०२५: शुक्रवारी इच्छापूर्तीसाठी 'असे' करा ललिता पंचमीचे व्रत; टाळा 'ही' एक चूक!

ललिता पंचमी व्रत २०२५: शुक्रवारी इच्छापूर्तीसाठी 'असे' करा ललिता पंचमीचे व्रत; टाळा 'ही' एक चूक!

शारदीय नवरात्रीचे(Navaratri 2025) सगळेच दिवस उपासनेसाठी महत्त्वाचे, पण त्यातही पंचमी, अष्टमी, नवमी तिथी देवीला प्रिय असल्याने त्या तिथीशी संबंधित काही व्रतांचे आयोजन केले जाते. यंदा २६ सप्टेंबर रोजी पंचमीला उपांग ललिता पंचमी व्रत(Lalita Panchami Vrat 2025) केले जाईल, त्याबद्दल जाणून घेऊ. 

शारदीय नवरात्रीत अश्विन शुद्ध पंचमीला ललिता पंचमीचे व्रत केले जाते. हे काम्य व्रत आहे. म्हणजे इच्छापूर्ती साठी केले जाणारे व्रत आहे. ललिता मातेला उद्देशून हे व्रत केले जाते आणि त्याला पूजापाठाची जोड दिली जाते. या व्रताबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय

पौराणिक मान्यता : पौराणिक कथेनुसार या दिवशी ललिता मातेने  'भांडा' नावाच्या राक्षसाचा वध केला होता. हा राक्षस कामदेवाच्या राखेतून उत्पन्न झाला होता. या असुरापासून महिला, मुलांना धोका होता.. देवीने तो दूर केला म्हणून नवरात्रीच्या पंचमीला स्कंद मातेची अर्थात कार्तिकेयाच्या आईची म्हणजेच माता पार्वतीची पूजा केली जाते. हे व्रत केले असता देवीची कृपा मिळते आणि जीवनात सुख-समृद्धी आणि शांती नांदते.. 

देवी ललिता  : शक्तिची देवी ललिताचे पुराणात वर्णन आढळते. जेव्हा दक्ष राजा आपली कन्या सती हीचा अपमान करतो तेव्हा ती आत्मदहन करून घेते तेव्हा शिव सतीचे पार्थिव आपल्या खांद्यावर घेऊन चारी दिशेत फिरतात. मृत पार्थिव असे फिरवणे योग्य नाही, मात्र शंकर बेभान झाले असल्याने त्यांना आपल्या कृतीची जाणीव करून देणे शक्य नव्हते. तेव्हा ही भ्रमंती थांबवण्यासाठी विष्णू चक्राने सतीची देह विभाजित करतात. सतीला मुक्ती मिळते आणि ती नंतर भगवान शंकराच्या हृदयात प्रवेश करते आणि तिला 'ललिता' नावाने ओळख मिळते. 

Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न

 पूजा पद्धत(Lalita Panchami Puja Vidhi 2025):

ललिता मातेच्या पूजेकरिता छोटी ताटली घेतात. त्यात देव्हाऱ्यातली देवीची मूर्ती आसन घालून विराजित करतात. फुलं पत्री, गंधाक्षता वाहून तिची पूजा करतात.काही ठिकाणी चौरंगावर देवीची आरास करून त्यात स्थानापन्न करतात आणि चौरंगाला केळीचे खांब बांधून पूजा करतात. ही पूजा करताना म्हणावयाचे मंत्र -

नील कौशेयवसनां हेमाभं कमलासनाम। 
भक्तांना वरदां नित्यं ललितां चिन्तयाम्यहम्।। 

''कमलावर अधिष्ठित, निळे, रेशमी वस्त्र परिधान करणारी, सुवर्णकांतीची, भक्तांना नित्य वर देणारी अशा ललितेचे मी चिंतन करतो.'' 

Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 

ललिता पंचमी व्रत नियम(Lalita Panchami puja vidhi rule) : 
 
>> ललिता पंचमीचे व्रत झालेल्या दिवशी उपास करावा, कथा कीर्तन ऐकावे, जागरण करावे आणि देवीची भक्ती करावी.

>> हे व्रताचरण शक्य नसेल तर घटस्थापना केलेल्या जागीच देवीला ललिता माता संबोधून वरील मंत्र १०८ वेळा म्हणावा.

>> गूळ खोबरं, दूध साखर, लाडू, पेढे यथाशक्ती जे शक्य असेल त्या गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. 

>> वाद टाळा, मौन पाळा आणि देवीच्या उपासनेत रममाण व्हा, देवी तुमची मनोकामना पूर्ण करेल हे नक्की. 

Web Title : ललिता पंचमी व्रत २०२५: इस शुक्रवार इच्छापूर्ति के लिए करें ये व्रत।

Web Summary : नवरात्रि में अश्विन शुक्ल पंचमी को ललिता पंचमी व्रत देवी ललिता को समर्पित है। देवी ने 'भांडा' नामक राक्षस का वध किया था। भक्त मंत्रों और प्रसाद से उनकी पूजा करते हैं। व्रत रखने, मंत्रों का जाप करने और मिठाई चढ़ाने से मनोकामनाएं पूरी होती हैं।

Web Title : Lalita Panchami Vrat 2025: Fulfill desires with this Friday's ritual.

Web Summary : Lalita Panchami Vrat, observed on Ashwin Shukla Panchami during Navratri, is dedicated to Goddess Lalita for wish fulfillment. The goddess killed the demon 'Bhanda,' and devotees worship her with mantras and offerings. Observing the fast, chanting mantras, and offering sweets are key to fulfilling desires.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.