Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 17:53 IST2025-10-04T17:51:51+5:302025-10-04T17:53:16+5:30

Kojagiri Purnima 2025: ६ ऑक्टोबर रोजी कोजागरी पौर्णिमे आहे आणि या रात्री जागरण, पूजन करण्याला विशेष महत्त्व आहे, का आणि कसे ते जाणून घेऊ.

Kojagiri Purnima 2025: According to scriptures, staying awake and worshipping on the night of Kojagiri brings blessings of Lakshmi; Read the fast rituals! | Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!

Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!

मोबाइल हाती आल्यापासुन जागरण रोजचेच झाले आहे, पण कोजागरीचे जागरण हे विशेष आहे. त्यादिवशी केवळ जागायचे नाही तर लक्ष्मीची उपासना करायची, नाम:स्मरण करायचे आणि गप्पा गाणी म्हणत रात्र जागवायची, त्यामुळे लक्ष्मी कृपा होते असे शास्त्रात म्हटले आहे, पण हे खरे आहे का? सविस्तर जाणून घेऊ. 

Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!

अश्विन शुद्ध पौर्णिमेला 'कोजागिरी पौर्णिमा' म्हणतात. ६ ऑक्टोबर रोजी कोजागरी पौर्णिमा(Kojagiri Purnima 2025) आहे. या रात्री लक्ष्मी पूजन करायचे असते व रास-गरबा खेळत रात्रभर जागरण करायचे असते. आजच्या रात्री देवी लक्ष्मी येऊन पाहते, `कोण जागे आहे?' जो जागत असेल, त्याला देवीचा आशीर्वाद मिळतो आणि खुद्द लक्ष्मीचा वरदहस्त म्हणजे धनसंपत्तीचा वर्षाव! हे महत्त्व लक्षात घेऊन अनेक जण कोजागिरी पौर्णिमेचे व्रत करतात.

कोजागिरी पौर्णिमा म्हणजे जागृतीचा उत्सव, वैभवाचा उत्सव, आनंदाचा उत्सव! जागे राहणे म्हणजे केवळ झोपलेले नसणे, हा त्याचा अर्थ नाही. मोबाइल हाती आल्यापासुन तसे जागरण तर आपण रोजच करतो. परंतु, आपल्या कर्तव्याप्रती, धर्माप्रती, संस्कृतीप्रती, जागृत असणे महत्त्वाचे! जो कोणी अशा पद्धतीने जागृत असतो, अशा जागृत माणसालाच लक्ष्मी प्राप्त होते. आळशी, प्रमादी, झोपाळू माणसापासून लक्ष्मी दूर जाते. 

Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 

कोजागिरी पौर्णिमेला चंद्र सोळा कलांनी फुललेला असतो. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने त्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जास्त जवळ असतो. संपूर्ण वर्षापेक्षा त्या दिवसाचा चंद्र सर्वात मोठा वाटतो. चातुर्मासात मेघ भरलेले असल्यामुळे चंद्रदर्शन होत नाही. त्यामुळे पाऊस गेल्यानंतरच्या निरभ्र आकाशात चंद्र अधिक आकर्षक वाटतो. 

चंद्राजवळ सुंदरता आणि शीतलता आहे. ती आपल्याही आयुष्यात यावी, हा चंद्रदर्शनाचा हेतू. आपल्या सभोवताली अशी शांत वृत्तीचे लोक विंâवा संतवृत्तीचे लोक असतील, तर आपण त्यांच्या सहवासात रमतो. त्यांच्यासारखे होण्याचा प्रयत्न करतो. चंद्रदर्शनही असेच विलोभनीय असते. कोजागिरीनिमित्त त्याच्या सान्निध्यात वेळ घालवणे, हे निमित्त! त्यानिमित्ताने खाण्याचे-गाण्याचे कार्यक्रम रंगतात. चंद्रावर आधारित गाण्यांनी वातावरणात आणखीनच प्रसन्नता येते. 

कोजागरी पौर्णिमा २०२५: कोजागरी ते लक्ष्मीपूजन, आर्थिक वृद्धीसाठी सलग १५ दिवस म्हणा 'हे' लक्ष्मी मंत्र!

कोजागरीचा पूजा विधी :

लक्ष्मीचे वाहन हत्ती असल्यामुळे पाटावर रांगोळी किंवा तांदुळाने हत्ती रेखाटून त्याला हळद-कुंकू वाहिले जाते. फुले , हार वाहिले जातात. श्रीसुक्त किंवा देवीचे स्तोत्र म्हटले जाते. देवीला आणि चंद्राला दुधसाखरेचा नैवेद्य दाखवला जातो. चंद्रकिरणे दुधात पडल्यावर तो प्रसाद सर्वांना वाटला जातो. दुधाच्या जोडीला पोह्यांचा बेत ठेवला जातो. पूजा झाली, की देवीचा श्लोक म्हणून पूजेची सांगता केली जाते.

अश्विने शुद्धपक्षे तु भवेद्या चैव पूर्णिमा
तद्रात्रौ पूजनं कुर्याच्छ्रियो जागृतिपूर्वकम्
निशीये वरदा लक्ष्मी: को जागतीरति भाषिणी
जगति भ्रमते तस्यां लोकचेष्टावलोकिनी
तस्मै वित्तं प्रयच्छामि यो जागर्ति महितले।।

‘रांधा, वाढा आणि उष्टी काढा’, या जीवनसूत्रात अडकलेल्या स्त्रियांना या सणांच्या निमित्ताने थोडीशी विश्रांती, मनोरंजन, पोटभर गप्पा आणि खिरापतीची मेजवानी. 

Web Title : कोजागिरी पूर्णिमा 2025: जागने और पूजा से लक्ष्मी कृपा.

Web Summary : 6 अक्टूबर को कोजागिरी पूर्णिमा पर लक्ष्मी पूजा और रात्रि जागरण का महत्व है। जागना कर्तव्य और संस्कृति के प्रति सजगता का प्रतीक है, जिससे धन आकर्षित होता है। पूर्णिमा की रात चंद्रमा सुंदरता और शीतलता लाता है, जिससे आनंद मिलता है। दूध और पोहा का भोग लगाया जाता है।

Web Title : Kojagiri Purnima 2025: Lakshmi's blessings through vigil and worship.

Web Summary : Kojagiri Purnima, on October 6th, involves Lakshmi Puja and all-night festivities. Staying awake symbolizes alertness towards duty and culture, attracting wealth. The full moon enhances the night, encouraging reflection and joy with loved ones. The ritual includes offering milk and poha to the goddess.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.