सुर्यास्तानंतर जन्मलेल्या बालकांचे व्यक्तिमत्व कसे असते? जाणून घ्या ज्योतिषशास्त्र काय सांगते

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 06:33 PM2022-08-25T18:33:23+5:302022-08-25T18:33:59+5:30

सूर्यास्तानंतर किंवा रात्रीच्या वेळी जन्मलेल्या मुलांवर चंद्र, शुक्र आणि मंगळाचा प्रभाव जास्त असतो. सूर्यास्तानंतर जन्माला आलेल्या मुलांचे वर्तन लाजाळू मानले जाते. ते लाजाळू स्वभावाचे असतात.

know the personality of the child who is born after sunset | सुर्यास्तानंतर जन्मलेल्या बालकांचे व्यक्तिमत्व कसे असते? जाणून घ्या ज्योतिषशास्त्र काय सांगते

सुर्यास्तानंतर जन्मलेल्या बालकांचे व्यक्तिमत्व कसे असते? जाणून घ्या ज्योतिषशास्त्र काय सांगते

googlenewsNext

जन्माची वेळ ठरवण्याची शक्ती अजून तरी कोणाही मनुष्याला नाही. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीची जन्मतारीख, वेळ आणि जन्मस्थान याला खूप महत्त्व असते. ज्योतिष शास्त्रामध्ये असे मानले जाते की, या तीन गोष्टींमुळे त्या व्यक्तीचे भविष्य आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाबाबत बऱ्याच अंशी भाकीत करता येते. सूर्यास्तानंतर जन्मलेल्या अशा मुलांच्या वर्तनाबद्दल आणि व्यक्तिमत्त्वाबद्दल भोपाळचे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया.

व्यक्तिमत्व -
ज्योतिषशास्त्रात असे सांगितले आहे की, सूर्यास्तानंतर किंवा रात्रीच्या वेळी जन्मलेल्या मुलांवर चंद्र, शुक्र आणि मंगळाचा प्रभाव जास्त असतो. सूर्यास्तानंतर जन्माला आलेल्या मुलांचे वर्तन लाजाळू मानले जाते. ते लाजाळू स्वभावाचे असतात. याशिवाय अशी मुले भावनिक असल्याचेही दिसून आले आहे. सूर्यास्तानंतर जन्मलेली मुले त्यांच्या भावनांना सर्वस्व मानतात. या मुलांमध्ये आईबद्दल खूप आपुलकी दिसून येते. असे लोक आपले प्रत्येक काम पूर्ण प्रामाणिकपणे करतात आणि ते काम पूर्ण करूनच श्वास घेतात.

दूरदर्शी -
सूर्यास्तानंतर ज्यांचा जन्म होतो ते लोक द्रष्टे असतात. त्यांना त्यांच्या भविष्याची चिंता असते. असे लोक काहीही करण्याआधी खोलवर विचार करतात. अशा लोकांमध्ये जागरूकतेचा अभाव अजिबात नसतो.

आशावादी असतात-
सूर्यास्तानंतर जन्माला आलेली मुलं खूप ज्ञानी असतात असंही अनेक वेळा पाहायला मिळालं आहे. ते आशावादी आणि कल्पनाशक्तीने भरलेली असतात. सूर्यास्तानंतर जन्मलेली मुले सर्जनशील क्षेत्रात खूप चांगले स्थान प्राप्त करतात. अशा व्यक्तींनी त्यांच्या इच्छेने कार्यक्षेत्र निवडले तर ते स्वत:साठी यशाचे अनेक मार्ग उघडू शकतात.

Web Title: know the personality of the child who is born after sunset

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.