शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 12:18 IST2025-11-07T12:10:39+5:302025-11-07T12:18:19+5:30
Ganadhipa Sankashti Chaturthi November 2025 Shani Upay In Marathi: कार्तिक महिन्यातील संकष्ट चतुर्थी शनिवारी आली असून, नेमके काय उपाय करावेत, ते जाणून घ्या...

शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
Kartik Sankashti Chaturthi November 2025 Shani Upay In Marathi: शनिवार, ०८ नोव्हेंबर २०२५ रोजी कार्तिक संकष्ट चतुर्थी आहे. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो, अशी मान्यता आहे. कार्तिकी एकादशीला चातुर्मास समाप्त झाला आहे. यानंतर कार्तिक महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जात आहे. कार्तिक महिन्यातील संकष्ट चतुर्थी शनिवारी आल्याने साडेसाती आणि ढिय्या प्रभाव असलेल्या व्यक्तींनी काही उपाय करणे शुभ पुण्य फलदायी मानले गेले आहे. जाणून घेऊया...
गणपती बाप्पा हे अबालवृद्धांचे आराध्य दैवत! गणपती ही वैश्विक देवता आहे. गणपती बुद्धीची देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोड-धोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे. तर शनि हा कर्मकारक ग्रह आहे. जसे ज्याचे कर्म, तसे फल शनि देतो, असे मानले जाते. संकष्ट चतुर्थीला सकाळी गणपतीचे पूजन करावे. उपवास करावा. बाप्पाला जास्वंदाचे फुल आणि दुर्वांची जुडी अवश्य अर्पण करावी. रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप, दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा. यासह साडेसाती आणि ढिय्या प्रभाव असलेल्यांनी काही सोपे उपाय करावेत.
नोव्हेंबर २०२५ मध्ये कोणत्या राशींची साडेसाती सुरू आहे?
आताच्या घडीला नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनि मीन राशीत आहे. मीन राशीचा स्वामी गुरू ग्रह आहे. जून २०२७ पर्यंत शनि मीन राशीत विराजमान असणार आहे. त्यामुळे कुंभ राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. मीन राशीचा साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे आणि मेष राशीचा साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. प्रत्यक्षात साडेसाती येणे ही एक प्रक्रिया आहे.
३ राशींना साडेसाती, ‘हे’ ५ उपाय नक्की करा
- शनिवारी सकाळी तसेच प्रदोष काळी, तिन्ही सांजेला दिवे लागणीला शनी देवाचे स्मरण, पूजन, उपासना करावी.
- शनिवारी शनीदेवाच्या मंदिरात जाऊन काळे तीळ अर्पण करावे. तेलाचा दिवा लावावा.
- शनी बीज मंत्राचा जप दररोज करावा. विशेषत: शनिवारी अवश्य करावा.
- शनीची उपासना, शनी स्तोत्राचे २१ वेळा पठण, शनी चालीसा पठण, शनीदर्शन असे उपाय सांगितले जातात.
- साडेसाती सुरू असताना आपल्या इष्टदेवतेचा जप रोज करणे लाभप्रद ठरते.
- शनीची साडेसाती सुरू असताना प्रतिकूल प्रभाव कमी करण्याची मारुती, विष्णू, महादेव या देवांची उपासना, नामस्मरण उपयुक्त ठरते, असे सांगितले जाते.
- हनुमंताचे दर्शन घेणे, समर्थ रामदासकृत मारुतीस्तोत्र म्हणावे, हनुमान चालीसा, बजरंगबाण किंवा सुंदरकांड ही हनुमंताच्या पराक्रमाचे गुणवर्णन करणारी स्तोत्रे म्हणावीत.
- पिंपळाच्या झाडाशी दूध आणि पाणी मिसळून दर शनिवारी नियमितपणे अर्पण करावे.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
॥ गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ॥