Kartik Amavasya 2025: गुरुवारी कार्तिक अमावास्येला दुपारी १२ च्या आत 'हे' उपाय करा, लाभ मिळवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 07:05 IST2025-11-20T07:00:01+5:302025-11-20T07:05:02+5:30

Kartik Amavasya 2025: 20 नोव्हेंबर रोजी दुपारी १२ पर्यन्त कार्तिक अमावास्या आहे, या कालावधीत कोणते उपाय करावे आणि त्यामुळे काय लाभ होतात ते पाहू.

Kartik Amavasya 2025: Do 'this' remedy on Thursday, Kartik Amavasya, by 12 noon, get benefits! | Kartik Amavasya 2025: गुरुवारी कार्तिक अमावास्येला दुपारी १२ च्या आत 'हे' उपाय करा, लाभ मिळवा!

Kartik Amavasya 2025: गुरुवारी कार्तिक अमावास्येला दुपारी १२ च्या आत 'हे' उपाय करा, लाभ मिळवा!

यंदा कार्तिक अमावास्या(Kartik Amavasya 2025) दोन दिवसात विभागून आली, तरीदेखील २० नोव्हेंबरचा सूर्योदय पाहिल्याने कार्तिक अमावास्या तिथीशी संबंधित उपाय गुरुवारी पालन करावे असे शास्त्र सांगते. या दिवशी दुपारी १२.१६ मिंनिटांपर्यंत ही तिथी असल्यामुळे पुढील उपाय वेळेत करा आणि ते का करावेत हे ही जाणून घ्या. 

कार्तिक अमावस्या २०२५: गुरुवार, २० नोव्हेंबर कार्तिक अमावस्या; 'या' ७ राशींना छोटी चूकही पडू शकते महाग

ज्यांनी आपल्याला जन्म दिला, ज्यांच्या कुळात आपण वाढलो, ज्यांची परंपरा आणि नाव आपण पुढे नेत आहोत अशा आपल्या कुळातील दिवंगत व्यक्तींचा अर्थात पितरांचा सदैव आदर करावा. शक्य तेवढी सेवा करावी आणि दर अमावस्येला त्यांच्या नावे पूजन करावे, स्मरण करावे आणि मनोमन त्यांना वंदन करावे. त्यांच्यानावे दानधर्म केल्यास पुण्य लाभते आणि त्यांचा आशीर्वाद पुढच्या पिढ्यांनाही लाभतो. यासाठी तसेच पितृ दोषातून मुक्त होण्यासाठी धर्मशास्त्राने काही उपाय दिले आहेत, त्याचे यथाशक्ती पालन करावे. यंदा गुरुवार २० नोव्हेंबर रोजी कार्तिक अमावास्या आहे, त्यानिमित्त (Kartik Amavasya 2025) सविस्तर माहिती जाणून घेऊ. 

माता-पिता, गुरुजन, आप्तस्वकीय यांना मान द्यावा हा संस्कार तर आपल्या संस्कृतीने घातला आहेच, परंतु त्यांच्या मृत्यूपश्चात आत्म्याला सद्गती मिळावी आणि त्यांचे ऋणात कायम कृतज्ञ राहावे, या भावनेने पितरांची सेवा सांगितली आहे. तसेच पितरांची सेवा करण्यामागे अनेक कारणेही दिली आहेत.

Vastu Tips: घड्याळ दोन-तीन मिनिटं पुढे लावणे शुभ? पाहा वास्तू शास्त्र काय सांगते... 

  • पितरांची सेवा केल्याने त्यांचे पितृलोकात गमन होते आणि सेवा करणाऱ्या मनुष्याचे जीवन सुखी आणि समृद्ध होऊन ज्यांना संतान नाही त्यांना संतान प्राप्ती होते. 
  • घरात नेहमी वातावरण तंग राहत असल्यास, घरात सतत भांडण, तंटा, कटकटी होत असल्यास यापैकी कोणत्याही कारणाने  घरातील सदस्याचे मन अस्वस्थ, बेचैन होत असल्यास पितरांची सेवा केल्याने घरातील वातावरण सुधारून प्रसन्न वाटते.
  • मुलांचे आईवडिलांशी वारंवार खटके उडत असल्यास, पती पत्नीमध्ये विकोपाची भांडणे होत असल्यास पितरांची सेवा केल्याने भांडणे वादविवाद कमी होतो व कुटुंबात सौख्य नांदते. 
  • घरात सतत आजारपण येत असेल किंवा कोणत्या ना कोणत्या कारणाने आर्थिक अडचणी निर्माण होत असल्या पितरांच्या सेवेने आरोग्य उत्तम लाभून आयुष्य वृद्धी वाढते.
  • पितरांच्या सेवेने समाजातील सर्व लोकांशी संबंध सुधारतात. कोणाकडून फसवणूक होत नाही. शेती, व्यवसाय, नोकरी संबंधित व्यक्तींशी संबंध सुधारून प्रगतीतील अडथळे दूर होतात. 
  • पितरांच्या सेवेने स्थावर मालमत्ता, संपत्ती यांचा लाभ होऊन कुटुंबास मनस्वास्थ्य लाभते व आत्मविश्वास वाढतो. 
  • बाहेरील बाधांचा, हितशत्रूंचा उपद्रव होत नाही. अकाली मृत्यू टळतो. 

कशी करावी पितृसेवा?

>>आपले पूर्वज केवळ त्यांचे स्मरण केल्यानेही तुष्ट होतात. यासाठी दर अमावस्येला त्यांचे मनापासून स्मरण करा. 

>>आपण जो स्वयंपाक करतो त्यातलाच थोडा भाग पितरांच्या नावे काढून कावळ्याला, गायीला नाहीतर कुत्र्याला खाऊ घाला. त्यांच्या रूपे पितर तृप्त होऊन समाधान पावतात. 

Numerology 2026: अंकशास्त्रानुसार २०२६ हे इच्छापूर्तीचे वर्ष? कोणते बदल केले पाहिजेत?

>>पितरांच्या आवडीचा पदार्थ केल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला तो पितरांच्या नावे दान करा. एखाद्याचा आत्मा तृप्त झाला की पितरही तृप्त होतात. 

>>यथाशक्ती दान करा. सेवा करा. त्यातून जे आत्मिक समाधान मिळते ते शब्दातीत असते. 

थोडक्यात काय, तर आत्मा संतुष्ट तर परमात्मा आणि अंतरात्माही समाधान पावतो. यासाठी पितृसेवा करावी लागते. त्यासाठी दर महिन्यातील अमावस्या ही पर्वणी! वरील मुद्दे लक्षात घेता आपल्या पितरांच्या सेवेची संधी दवडू नका तसेच केवळ दिवंगत पितरांचीच नाही, तर जिवंत माता पित्यांच्या सेवेत कोणत्याही प्रकारची उणीव ठेवू नका. 

Web Title : कार्तिक अमावस्या 2025: आशीर्वाद पाने के लिए दोपहर से पहले ये उपाय करें!

Web Summary : कार्तिक अमावस्या पर, 20 नवंबर को दोपहर से पहले विशिष्ट अनुष्ठान करके पूर्वजों का सम्मान करें। स्मरण, भोजन अर्पण और दान जैसे ये कार्य आशीर्वाद लाते हैं, पारिवारिक समस्याओं का समाधान करते हैं, स्वास्थ्य में सुधार करते हैं और वित्तीय स्थिरता को बढ़ावा देते हैं। मृत और जीवित दोनों माता-पिता की सेवा करें।

Web Title : Kartik Amavasya 2025: Perform these rituals before noon for blessings!

Web Summary : On Kartik Amavasya, honor ancestors by performing specific rituals before noon on Thursday, November 20th. These acts, including remembrance, offering food, and charity, bring blessings, resolve family issues, improve health and foster financial stability. Serve both deceased and living parents.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.