शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Kabir Jayanti: संत कबीरांनी मुंगीच्या उदाहरणातून मानवाला केलेला सुंदर आत्मबोध नक्की वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2024 10:52 IST

Kabir Jayanti: कबीर जयंतीनिमित्त त्यांच्या तत्त्वज्ञानाची आणि अध्यात्माची चुणूक दाखवणारा छानसा दृष्टान्त पाहूया.

संत कबीर यांच्या जन्मतिथीबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही, तरीदेखील काही ठिकाणी दिलेल्या संदर्भावरून ज्येष्ठ पौर्णिमेला त्यांची जयंती मानली जाते. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार माहिती नसली तरी त्यांनी सांगितलेले तत्वज्ञान आणि अध्यात्म कालातीत आहे. त्यातलंच एक उदाहरण कबीर जयंतीच्या निमित्ताने जाणून घेऊया. 

माणसांत आणि प्राण्यांमध्ये मुख्य फरक काय आहे माहितीये का? माणूस अत्यंत स्वार्थी आहे आणि प्राणी परोपकारी! ते स्वतःचाच नाही तर दुसऱ्यांचाही विचार करतात. माझं ते माझं आणि तुझं तेही माझं, अशी मानवाची भूमिका असते. अशा माणसांच्या सान्निध्यात राहून कधी कधी प्राण्यांनाही वाण नाही पण गुण लागतो. मनुष्याच्या स्वार्थी स्वभावाला आळा घालण्यासाठी संत कबीरांनी एका रूपक कथेचा आधार घेत मार्मिक वर्णन केले आहे. आज कबीर जयंती, त्यानिमित्त ही मार्मिक कथा!

ही रूपक कथा आहे मुंगीची. मुंगीचा गुणधर्म असा, की ती कितीही घाईत का असेना, समोरून दुसरी मुंगी येताना दिसली, की थोडीशी का होईना हितगुज करून मगच पुढे जाते. मुंग्या शिस्तप्रिय. कधीही पहा, रांगेने जातात. पण वर म्हटल्याप्रमाणे मनुष्य स्वतःच्या सहवासाने दुसर्यालाही बिघडवण्याची क्षमता बाळगतो.

एक मुंगी, माणसाळलेली, एक दिवस काम उरकून घराच्या दिशेने जात होती. वाटेत तिला तांदुळाचा दाणा दिसला. तिला आनंद झाला. संध्याकाळच्या जेवणाची सोय झाली म्हणत, तिने तो दाणा उचलला आणि चालू लागली. तांदुळाचा दाणा तिच्या वजनाला पेलवणारा नव्हता, तरी ती धीर करून संयत पावले टाकीत तो दाणा उचलून घराच्या दिशेने जात होती. 

वाटेत तिला डाळीचा दाणा दिसला. कधी नव्हे ते तिला हाव सुटली. भाताबरोबर डाळीची सोय झाली, म्हणजे घरी गेल्या गेल्या खिचडी केली कि झालं. अशा विचाराने तिने तो डाळीचा दाणा घेतला. पण आता तिला एका वेळी दोन्ही भार पेलत नव्हते. चालता चालता ती मध्येच डाळीचा दाणा ठेवी, तर काही पावलं पुढे गेल्यावर तांदळाचा दाणा ठेवी. तिची दयनीय अवस्था पाहून संत कबीर तिला म्हणाले, 

'तू केवढी, तुझा भार केवढा? एवढं नेणं तुला झेपणार तरी आहे का? देवाने तुझ्या पोटाची व्यवस्था म्हणून एक तांदुळाचा दाणा दिला होता, पण तू मोहात पडलीस आणि स्वतःचाच भार वाढवून घेतलास. म्हणून तो भार हलका करण्यासाठी मी काय सांगतो, ते ऐक... 

चिटी चावल ले चलै, बीच मे मिल गयी दाल,कहत कबिरा दोनो ना मिलै, एक ही ले दाल।।

मोहाला बळी पडणाऱ्याचे हाल होतात. म्हणून वेळीच सावध हो. या भार वाहून नेण्यापेक्षा आपली गरज ओळख आणि तेवढंच वाहून ने. 

संत कबीरांचा हा बोध केवळ लोभाला बळी पडलेल्या मुंगीसाठी नाही, तर आपल्यासारख्या स्वार्थलोलुप झालेल्या समस्त लोकांसाठी आहे. अति सुखाच्या नादात आपण अनेक चांगल्या गोष्टी गमावून बसतो. म्हणून आपली गरज ओळखा आणि स्वार्थाचा त्याग करा, असे संत कबीर आपल्याला सांगतात. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी