Jaya Ekadashi 2026: पिशाच योनीतून मुक्ती आणि जीवनात विजय! जया एकादशीला विष्णूंना कसे प्रसन्न करावे? ते पाहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 16:08 IST2026-01-28T16:06:19+5:302026-01-28T16:08:25+5:30
Jaya Ekadashi 2026:यंदा २९ जानेवारी रोजी जया एकादशी आली आहे, ही तिथी पूर्व दुष्कर्मातून सुटका आणि भविष्यात सुख, यश, संपत्ती देणारी आहे, त्यासाठी हे व्रताचरण

Jaya Ekadashi 2026: पिशाच योनीतून मुक्ती आणि जीवनात विजय! जया एकादशीला विष्णूंना कसे प्रसन्न करावे? ते पाहा
माघ शुद्ध एकादशी म्हणजेच 'जया एकादशी(Jaya Ekadashi 2026) ही एकादशी भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय असून, या दिवशी केलेली पूजा भक्ताला सर्व संकटांतून मुक्त करते. गुरुवारी, २९ जानेवारी २०२६ रोजी ही एकादशी येत असल्याने या दिवसाचे महत्त्व द्विगुणित झाले आहे.
उत्तरायण आणि मृत्यूचा गूढ संबंध: भीष्माचार्यांनी का थांबवून ठेवला होता काळ?
जया एकादशीचे व्रत केल्याने मनाला शांतता मिळते आणि जीवनात विजय प्राप्त होतो. या दिवशी खालीलप्रमाणे शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करावी:
१. ब्रह्म मुहूर्त आणि स्नान
एकादशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे. शक्य असल्यास स्नानाच्या पाण्यात थोडे गंगाजल टाकावे. स्नान करताना 'ओम नमो भगवते वासुदेवाय' या मंत्राचा जप करावा. स्वच्छ आणि शक्यतो पिवळे वस्त्र परिधान करावे.
२. संकल्प
स्नान आटोपल्यानंतर देवापुढे हात जोडून उपवासाचा संकल्प करावा. "हे भगवान विष्णू, मी आज जया एकादशीचे व्रत मनोभावे करत आहे, माझी पूजा स्वीकार करा," अशी प्रार्थना करावी.
Jaya Ekadashi 2026: जया एकादशी ठरणार 'या' राशींसाठी टर्निंग पॉईंट! जाणून घ्या तुमचं भविष्य!
३. पूजा मांडणी
एका पाटावर किंवा चौरंगावर पिवळे वस्त्र अंथरावे. गुरुवार आणि एकादशी या संयोगावर भगवान विष्णूंना प्रिय असलेल्या पिवळ्या रंगाच्या वस्त्राचा वापर लाभदायी ठरतो. त्यावर भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटोची स्थापना करावी. सोबत माता लक्ष्मीचा फोटो असल्यास अधिक उत्तम.
देवासमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आणि धूप लावावा.
मृत्यू कधी, कुठे, कसा घेरेल सांगता येत नाही, यावर भाष्य करताना प्रेमानंद महाराज म्हणतात...
४. अभिषेक आणि अर्चन
विष्णूंच्या मूर्तीला पंचामृताने (दूध, दही, तूप, मध, साखर) अभिषेक करावा आणि नंतर स्वच्छ पाण्याने स्नान घालावे. देवाला पिवळी फुले, तुळशीची पाने आणि गंध अर्पण करावा. (लक्षात ठेवा: एकादशीला तुळशीची पाने तोडू नयेत, ती आदल्या दिवशीच तोडून ठेवावीत.)
५. नैवेद्य
भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाचे पदार्थ प्रिय आहेत. केळी, पिवळी मिठाई किंवा केशरी भाताचा नैवेद्य दाखवावा. महत्त्वाचे म्हणजे, नैवेद्यात तुळशीचे पान अवश्य ठेवावे, त्याशिवाय विष्णू नैवेद्य स्वीकारत नाहीत.
६. कथा वाचन आणि आरती
पूजा झाल्यावर 'जया एकादशी'ची कथा वाचावी किंवा ऐकावी. त्यानंतर 'विष्णू सहस्त्रनाम' किंवा 'मधुराष्टकम'चे पठण करावे. शेवटी श्री विष्णूंची आणि माता लक्ष्मीची आरती करावी.
होलाष्टक २०२६: होळीपूर्वीचे ८ दिवस का मानले जातात अशुभ? जाणून घ्या नियम आणि महत्त्व
जया एकादशीचे काही महत्त्वाचे नियम:
तामसिक आहार टाळा: या दिवशी कांदा, लसूण किंवा मांसाहार पूर्णपणे वर्जित आहे.
अन्नदान: उपवासाच्या दिवशी गरजूंना फळे किंवा अन्नदान करणे शुभ मानले जाते.
पारण (उपवास सोडणे): एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी म्हणजेच 'द्वादशी'ला सूर्योदयानंतर सोडावा. ३० जानेवारी रोजी सकाळी पारण करावे.