Janmashtami 2021 : राधा कृष्णाच्या नात्यातल्या गोडवा तुमच्या नात्यात उतरावा वाटत असेल, तर 'हे' उपाय अवश्य करून पहा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 16:50 IST2021-08-31T16:49:08+5:302021-08-31T16:50:24+5:30
Janmashtami 2021 : प्रेम हा दुवा प्रत्येक नात्याला जोडणारा आहे. कधी कधी नाते अकारण दुभंगते अशा वेळी उपासनेची जोड मिळाली की नाते पूर्ववत मिळते.

Janmashtami 2021 : राधा कृष्णाच्या नात्यातल्या गोडवा तुमच्या नात्यात उतरावा वाटत असेल, तर 'हे' उपाय अवश्य करून पहा!
नवरा बायकोचे नाते अतिशय नाजूक. दोन कुटुंबातून आलेल्या दोन व्यक्तींचे परस्परांशी पटणे, पटवून घेणे आणि एकमेकांना समजून घेणे यात बराच कालावधी लागतो. तोवर श्रद्धा आणि सबुरी बाळगावी लागते. तसे न केल्यास नाते विकोपाला जाते. परंतु दोघांमध्ये प्रेम हा जोडणारा धागा मजबूत असेल, तर कितीही भांडणे होवोत पण 'तुझं माझं पटेना, तुझ्यावाचून करमेना' अशी स्थिती होते. हे प्रेम अधिक वृद्धिंन्गत व्हावे, यासाठी शास्त्रात दिलेले उपाय अवश्य करून पहा.
>> पितृदोषाने जर घरामध्ये कलह होत असेल तर सर्वप्रथम पितृदोषाचे निरसन करावे. कुलदेवतेच्या दोषाने कलह होत असेल तर कुलदेवतेच्या दोषाचे निरसन करावे. वास्तुदोषाने कलह होत असेल तर वास्तुदोषाचे निरसन करावे.
>> अनिष्ट ग्रहांमुळे पती पत्नींमध्ये भांडणे होत असल्यास त्या ग्रहाचे जप, होमहवन, दानधर्म करावे. श्रीगुरुचरित्र, स्वामीचरित्र, कलियुगाचे इच्छितदाता, साईचरित्र, श्री गुरुलिलामृत किंवा सतपुरुषाचे चरित्र वाचन करावे.
>> भांडणे घटस्फोटापर्यंत पोहोचलेल्या जोडप्याने किंवा दोघांपैकी एकाला घटस्फोट घेण्याची इच्छा असल्यास खालील संकल्प करून एकनाथ महाराजलिखित रुक्मिणी स्वयंवराचे पारायण करावे. संकल्प अशा पद्धतीने करावा-
मम वैवाहिक जीवन कर्माणि उत्पन्नांना विविध प्रत्यवायांना
समूल परिहारपूर्वक पुन: मिलन सिद्धी द्वारा अद्यारंभ करिष्ये।।
हा श्लोक म्हणून श्रद्धापूर्व रुक्मिणी स्वयंवर वाचावे. पूर्ण पोथी शक्य नसेल, तर रोज किमान एक अध्याय तरी जरूर वाचावा.
>> दोघांनी किंवा दोघांपैकी एकाने सोळा सोमवारचे व्रत करावे. सोमवारी संधीकाळात, सोमप्रदोषकाळात आणि शिवरात्रीला शिवमंदिरात जाऊन एक नारळ अर्पण करून कणकेचा साजुकतुपाचा दिवा लावून एक मूठ नागकेशर शिवपिंडीवर अर्पण करावे.
>> काही वेळा स्त्रीचा काहीही दोष नसताना तिचा पती दुसऱ्याच्या नादी लागून त्यांच्या प्रपंचात काडीमोड घेत असेल, सतत भांडणे होऊन दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला असेल तर स्वामी समर्थांची उपासना करा. तसेच अशा बाबतीत श्रीकृष्णाची उपासनाही फलदायी ठरते. ओम नमो भगवते वासुदेवाय, हा मंत्र जप किंवा विष्णुसहस्त्रनाम पठण करावे. त्याचा निश्चित परिणाम होतो. ही उपासना शीघ्रफलदायी असल्याचे अनेकांनी अनुभवले आहे. कारण श्रीकृष्ण हा स्त्रीभोक्ता नसून स्त्रीरक्षणकर्ता आहे.