शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
5
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
6
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
7
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
8
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
9
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
10
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
11
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
12
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
13
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
14
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
15
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
16
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

International Yoga Day 2023: भारतीय प्राचीन योग साधनेला जागतिक प्रतिष्ठा देणारे द्वयी!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 7:00 AM

International Yoga Day 2023: योगसाधना ही भारताने जगाला दिलेली आरोग्य संजीवनी आहे; या द्वयींपूर्वी या योग साधनेचा जगभर प्रचार प्रसार कोणी केला ते पाहू.

वर्ष होते २००३. आस्था चॅनेल नुकतेच सुरू झाले होते. त्यावर योगगुरु रामदेव बाबा यांनी योगाभ्यास टीव्हीवर आणला. त्यांच्यासमोर पटांगणात बसलेले हजारो आणि घरोघरी त्यांना पाहणारे लाखो प्रेक्षक रामदेव बाबांचे अनुकरण करू लागले. तेव्हापासून देशभरातच नाही तर जगभरात योग चळवळ नव्याने सुरू झाली.  ही पार्श्वभूमी तयार असताना २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ जून 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून घोषित केला योगसाधनेची प्रतिष्ठा अधिकच वाढली व पारंपरिक योगसाधनेला ग्लॅमरही मिळाले! (International Yog Day 2023)

योगसाधना ही भारतीय ऋषीमुनींनी जगाला आरोग्य संजीवनी आहे. रामदेव बाबांच्या आधी योगसाधनेचा जगभरात प्रसार झाला नव्हता असे नाही. परंतु आस्था चॅनेलने आणि रामदेव बाबांनी ज्या पद्धतीने योगसाधनेचे महत्त्व लोकांच्या मनात बिंबवले ते परदेशातील लोक योगाभ्यासाचे प्रशिक्षण घेऊ लागले आणि त्यांच्यामुळे आपल्या देशातही योगसाधनेचे महत्त्व सर्वसामान्य लोकांना पटू लागले. 

रामदेव बाबांच्या आधी योग शिक्षक धीरेंद्र ब्रह्मचारी यांनी दूरदर्शन वाहिनीवरून योगाभ्यासाचा प्रसार केला होता. शाळा महाविद्यालयातून योगाभ्यासाचे धडे, हिंदी-इंग्रजीतून पुस्तकांचे लिखाण करत त्यांनी योग विषयात आपले योगदान दिले. बीकेएस अयंगर यांनी  'अयंगर योग' नावे गुरुकुल सुरु केले. २००४ मध्ये टाईम मासिकाने त्यांना जगातील पहिल्या १०० प्रभावी लोकांपैकी एक म्हणून घोषित केले होते. कृष्णा पट्टाभी जोइस यांनी अष्टांग विन्यास योग शैली विकसित केली. तिरुमलाई कृष्णामचार्य यांना 'आधुनिक योगाचे जनक' म्हटले जाते. हठयोग आणि विन्यासला पुनरुज्जीवित करण्याचे सर्व श्रेय त्यांना जाते. परमहंस योगानंद यांनी पाश्चिमात्य लोकांना योग आणि ध्यानधारणा शिकवली. ''शिवानंद योग वेदांत स्वामी शिवानंद सरस्वती यांनी आपले संपूर्ण जीवन योग साधनेला समर्पित केले. महर्षि महेश योगी यांच्या हाताखाली अनेक सेलिब्रेटींनी योगसाधनेचे प्रशिक्षण घेतले. या सर्वांमध्ये रामदेव बाबांनीही (Ramdev Baba Yoga) आपले योगदान दिले.

या योगचळवळीचा परिणाम असा झाला की गल्लोगल्ली योगवर्गाचे पेव फुटू लागले. अनेकांच्या नशिबात या जोरावर श्रीमंत होण्याचाही योग जुळून आला. विश्व विद्यालयातून योग विषयात पदवी, पदव्युत्तर प्रशिक्षण घ्यावे, सर्टिफिकेट कोर्स करावा असे अनेकांना वाटू लागले. जिमकडे जाणारी पावले योगा मॅटकडे वळली. रामदेव बाबांसारखे आपलेही पोट सपाट व्हावे असे अनेकांना वाटू लागले. मुख्य म्हणजे यात सातत्य राहिले, याचे श्रेय रामदेव बाबा आणि पंतप्रधान मोदींना द्यायला हवे, नाही का? 

टॅग्स :International Yoga Dayआंतरराष्ट्रीय योग दिनNarendra Modiनरेंद्र मोदीBaba Ramdevरामदेव बाबाHealthआरोग्य