Holika Dahan 2026: कर्जाच्या विळख्यातून सुटका हवीय? होळीच्या रात्री करा 'हा' पिठाच्या दिव्याचा प्रभावी उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 07:05 IST2026-03-02T07:00:01+5:302026-03-02T07:05:01+5:30
Holika Dahan 2026: आज 2 मार्च रोजी होळी आहे आणि रात्री होलिका दहन केले जाईल. या मुहूर्तावर केलेला ज्योतिष शास्त्रीय उपाय कर्जमुक्ती होण्यास मदत करतो.

Holika Dahan 2026: कर्जाच्या विळख्यातून सुटका हवीय? होळीच्या रात्री करा 'हा' पिठाच्या दिव्याचा प्रभावी उपाय!
आज होळी(Holi 2026) हा सण आणि होलिका दहनाचा मुहूर्त हा आध्यात्मिक साधना आणि तोडग्यांसाठी अत्यंत फलदायी मानला जातो. जर तुम्ही आर्थिक अडचणीत असाल किंवा कर्जाच्या ओझ्याखाली दबले असाल, तर पिठाच्या दिव्याचा हा विशेष उपाय तुमच्यासाठी प्रभावी ठरू शकतो. या उपायाचा सविस्तर विधी आणि त्यामागील श्रद्धा जाणून घ्या.
होळी हा सण केवळ वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक नाही, तर आपल्या आयुष्यातील संकटांची होळी करून सुखाचा प्रकाश आणण्याची एक संधी आहे. अनेक वर्षांपासून चालत आलेल्या परंपरेनुसार, होलिका दहनाच्या रात्री काही विशेष उपाय केल्यास लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि आर्थिक अडथळे दूर होतात.
पिठाचा पंचमुखी दिवा: उपाय आणि विधी
हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काही सोप्या गोष्टींची आवश्यकता आहे. हा विधी पूर्ण श्रद्धेने केल्यास त्याचे फळ लवकर मिळते असे मानले जाते.
https://www.lokmat.com/photos/bhakti/holika-dahan-2026-offer-these-8-items-on-holi-this-year-you-will-get-freedom-from-poverty-disease-and-domestic-troubles-a-a679/Holika Dahan 2026: यंदा होळीत द्या 'या' ८ वस्तूंची आहुती; दारिद्र्य, रोगराई, गृहक्लेशातून मिळेल मुक्ती
साहित्य:
कणकेचा (पिठाचा) एक मोठा दिवा.
राईचे तेल (मोहरीचे तेल).
काळे तीळ.
कुंकू आणि अक्षता.
विधी कसा करावा?
१. दिवा तयार करणे: पिठाचा एक दिवा तयार करा, ज्याला पाच मुखे (पंचमुखी) असतील.
२. साहित्य भरणे: या दिव्यामध्ये राईचे तेल भरा. त्यात थोडे काळे तीळ, चिमूटभर कुंकू आणि थोडे अक्षता (तांदूळ) टाका.
३. अग्नीत अर्पण: होलिका दहनाच्या वेळी हा दिवा प्रज्वलित करून तो होलिका मातेच्या पवित्र अग्नीत अर्पण करा.
४. प्रार्थना: दिवा अर्पण करताना हात जोडून मनापासून प्रार्थना करा: "हे होलिका माता, माझ्या आयुष्यातील आर्थिक अडचणी दूर कर, कर्जाचे ओझे संपू दे आणि मला लक्ष्मी प्राप्तीचे नवीन मार्ग सापडू दे."
५. नियम: प्रार्थना झाल्यावर तिथून निघताना मागे वळून पाहू नका. थेट घरी या.
६. स्वच्छता: घरी आल्यावर हात-पाय स्वच्छ धुवा आणि शांत मनाने विश्रांती घ्या (निजावे).
सातत्य का महत्त्वाचे?
अनेकांचा असा अनुभव आहे की, होळीला सुरू केलेला हा उपाय केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता पुढेही सुरू ठेवावा. दर अमावस्येला कणकेचा दिवा (साधा किंवा पंचमुखी) लावून तो एखाद्या आडरस्त्याला किंवा निर्जन ठिकाणी ठेवल्यास आर्थिक समस्यांतून कायमची सुटका होते.
या उपायाचे फायदे:
कर्जमुक्ती: डोक्यावर असलेले कर्जाचे ओझे कमी होण्यास मदत होते.
नवीन संधी: व्यवसायात किंवा नोकरीत पैशांचे नवीन स्रोत निर्माण होतात.
नकारात्मकता दूर होते: घरातील दरिद्रता आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन समृद्धी येते.