शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Holi 2026 Date: २ की ३ मार्च, यावर्षी होळी कधी आहे? पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी केला शास्त्रोक्त माहितीसह खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 11:41 IST

Holi Dhulivandan 2026 Date: फाल्गुन पौर्णिमेला आपण होळी साजरी करतो, पण यंदा चंद्र ग्रहण त्याच काळात असल्यामुळे होळी २ मार्चला साजरी करावी की ३ ला, याबाबत जाणून घ्या. 

होळी (Holi 2026) हा रंगांचा आणि उत्साहाचा सण जवळ येत आहे. मात्र, यावर्षी तिथी आणि चंद्र ग्रहणाच्या स्थितीमुळे होलिका दहनाच्या तारखेबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे.पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी यावर्षीच्या होळीचे शास्त्रशुद्ध नियोजन स्पष्ट केले आहे. यावर्षी सोमवार, २ मार्च रोजी होलिका दहन (Holika Dahan 2026) केले जाणार असून मंगळवार, ३ मार्च रोजी धूलिवंदन (Dhulivandan 2026) साजरे होईल.

Holika Dahan 2026: यंदा होळीत द्या 'या' ८ वस्तूंची आहुती; दारिद्र्य, रोगराई, गृहक्लेशातून मिळेल मुक्ती

२ मार्चलाच होलिका दहन का?

दा. कृ. सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार, २ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजून ५५ मिनिटांनी फाल्गुन पौर्णिमेला सुरुवात होत आहे. शास्त्रानुसार, ज्या दिवशी प्रदोष काळात (सूर्यास्तानंतरची वेळ) पौर्णिमा असते, त्याच दिवशी होलिका दहन करणे उचित मानले जाते. यावर्षी हा योग २ मार्च रोजी जुळून येत असल्याने याच दिवशी होळी पेटवली जाईल.

३ मार्चचे 'चंद्रग्रहण (Lunar Eclipse 2026) आणि शास्त्राधार

मंगळवार, ३ मार्च रोजी 'ग्रस्तोदित चंद्रग्रहण' आहे. धर्मसिंधू या ग्रंथातील नियमांनुसार, जर दुसऱ्या दिवशी ग्रहण असेल, तर त्यापूर्वीच्या दिवशीच होलिका दहन करणे श्रेयस्कर असते. म्हणूनच, ग्रहणाचे नियम आणि पौर्णिमेची व्याप्ती लक्षात घेता, सोमवारीच होळी साजरी करण्याचा निर्णय पंचांगकर्त्यांनी दिला आहे.

Holi 2026 Special Train: शिमग्यासाठी गावी जायाचा प्लान आहे? होळी २०२६ला रेल्वेच्या १५०० विशेष ट्रेन; प्रवाशांची मोठी सोय

भद्रा काळातही होलिका दहन (Holi 2026 Date) शक्य?

अनेकांना असा प्रश्न पडतो की भद्रा काळात शुभ कार्ये टाळावीत, मग होळीचे काय? यावर स्पष्टीकरण देताना सोमण म्हणाले की, "सोमवारी २ मार्च रोजी सूर्यास्तानंतर प्रदोष काळात भद्रा असली तरीही, त्या काळात होलिका दहन करता येते." त्यामुळे भद्रा असली तरी शास्त्राप्रमाणे प्रदोष काळातील पौर्णिमेला महत्त्व देऊन होळी पेटवता येईल.

होलाष्टक २०२६: होलाष्टकाचा दुष्परिणाम टाळण्यासाठी होळीपूर्वी ८ दिवस राशीनुसार काय करावे आणि काय टाळावे?

धूलिवंदन आणि रंगपंचमी (Dhulivandan And Rang Panchami Date 2026)

होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवार, ३ मार्च रोजी 'धूलिवंदन' असेल. मात्र, या दिवशी चंद्रग्रहण असल्यामुळे ग्रहणाचे वेध आणि पाळण्याचे नियम लक्षात घेऊन नागरिकांनी सण साजरा करावा, असेही सूचित करण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Holi 2026: Holika Dahan on March 2nd, clarifies astrologer D.K. Soman.

Web Summary : Astrologer D.K. Soman clarifies Holika Dahan will be on March 2nd due to the Falgun Purnima and lunar eclipse on March 3rd. Celebrations should consider the lunar eclipse.
टॅग्स :Holiहोळी 2026Astrologyफलज्योतिषLunar Eclipseचंद्रग्रहणTraditional Ritualsपारंपारिक विधीIndian Festivalsभारतीय उत्सव-सणHolika Dahanहोलिका दहन