Holi 2024: होळीची चिमूटभर रक्षा घरात आणेल सुख-समृद्धी; आवर्जून करा ज्योतिष शास्त्रीय उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 07:00 AM2024-03-22T07:00:00+5:302024-03-22T07:00:00+5:30

Holi 2024: २४ मार्च रोजी होलिका दहन होईल, त्यातील राख आपण कपाळाला लावतोच, पण ती घरी आणून संग्रही केल्याने होणारे लाभ जाणून घ्या!

Holi 2024: A pinch of Holi ash will bring happiness and prosperity to the house; Must do astrology scientific solution! | Holi 2024: होळीची चिमूटभर रक्षा घरात आणेल सुख-समृद्धी; आवर्जून करा ज्योतिष शास्त्रीय उपाय!

Holi 2024: होळीची चिमूटभर रक्षा घरात आणेल सुख-समृद्धी; आवर्जून करा ज्योतिष शास्त्रीय उपाय!

होलिका दहन फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला केले जाते. मराठी वर्षाच्या सांगतेला येणारा मोठा सण म्हणजे होळी. मार्च महिन्यात होळी आहे. संपूर्ण भारतात हा होळीचा सण विविध तऱ्हेने साजरा केला जातो. होळीचा दुसरा दिवस धूलिवंदनाचा. होळीच्या दुसऱ्या दिवसापासून चार दिवसांना धुळवडीचे दिवस असेही म्हणतात आणि फाल्गुन कृष्ण पंचमीच्या दिवसाला रंगपंचमी म्हणून ओळखले जाते. यंदा २४ मार्च २०२४ रोजी होळी म्हणजेच होलिका प्रदीपन असून, २५ मार्च रोजी धुलिवंदन आहे.

यंदाची होळी खूप खास आहे : 

होळी हा मराठी वर्षातील शेवटचा सण. सन २०२४ रोजी होळीला चंद्रग्रहण लागणार आहे. मात्र, हे ग्रहण भारतातून दिसणार नाही. त्यामुळे वेधादि नियम पाळू नयेत, असे सांगितले जाते. काही मान्यतांनुसार, होळीच्या दिवशी चंद्रग्रहण हा योग १०० वर्षांनी जुळून येत असल्याचे म्हटले जात आहे.

यंदा होळीच्या दिवशी अतिशय आश्चर्यकारक योगायोग घडत आहे. होळीच्या दिवशी चंद्रग्रहणासोबतच सर्वार्थ सिद्धी योग आणि रवि योग जुळून येणार आहे. कुंभ राशीत शुक्र, मंगळ आणि शनि यांचा त्रिग्रही योग, तसेच मीन राशीत सूर्य आणि राहुचा युती योग आणि कन्या राशीत चंद्र-केतुचा युती योग जुळून येत आहे.

या मुहूर्तावर होळीच्या रक्षेचा असा करा उपयोग :  

रंग, आनंद आणि आनंदासोबतच वाईट वृत्तीवर विजयाचा सण आहे. होलिका दहन केल्याने आजूबाजूच्या नकारात्मक शक्तींचा नाश होऊन जीवनात आनंद निर्माण होतो. जीवनात सकारात्मकता आणि सुख-समृद्धी येण्याच्या दृष्टीनेही होळीचा सण खूप खास आहे. ही सकारात्मकता आयुष्यात उतरावी म्हणून होळीची रक्षा/ राख आपण श्रद्धेने कपाळाला लावतो. ही रक्षा लावण्याचे ज्योतिष शास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत, जे खूप प्रभावी आहेत. ते जाणून घेऊ. 

होलिका भस्म कसे धारण कराल?

आर्थिक संकट दूर करण्याचा उपाय - आर्थिक संकट दूर करण्यासाठी होलिकेची भस्म लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा. तसेच त्या राखेची छोटीशी पुडी बनवू शकता आणि आपल्या पर्समध्ये ठेवू शकता. त्यामुळे आर्थिक स्थिती चांगली होऊ लागेल.

कामात यश मिळवण्यासाठी - कोणतेही नवीन कार्य सुरू करण्यापूर्वी होलिकेच्या भस्म करा, असे केल्याने कार्यात यश मिळते.

घरामध्ये सुख-शांती आणण्यासाठी उपाय - होलिकेचे भस्म एका डबीत ठेवा आणि शुभ मुहूर्तावर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात चिमूटभर टाका, यामुळे घरातील भांडणे संपतील आणि सुख-शांती नांदेल.

घराचे वाईट शक्तीपासून रक्षणासाठी - घरातील एखादा सदस्य सतत आजारी असेल किंवा एखादे लहान मूल वारंवार आजारी पडत असेल तर होलिकेचे भस्म एका कपड्यात बांधून संबंधित व्यक्तीच्या उशाशी ठेवावे किंवा त्या व्यक्तीच्या कपाळाला लावावी, लवकरच फरक दिसून येईल

Web Title: Holi 2024: A pinch of Holi ash will bring happiness and prosperity to the house; Must do astrology scientific solution!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.