शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
3
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
4
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
5
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
6
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
7
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
8
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
9
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
10
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
11
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
12
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
13
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
14
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
17
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
18
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
19
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
20
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
Daily Top 2Weekly Top 5

Hanuman Jayanti 2026: लक्ष्मण-भरताची मंदिरं का नसतात? वाचा हनुमानाच्या 'अतुलनीय' देवत्त्वाचे रहस्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 12:50 IST

Hanuman Jayanti 2026: रामायणातील सगळ्याच व्यक्तिरेखा अनुकरणीय आहेत, असे असूनही प्रभू श्रीराम आणि माता जानकी वगळता केवळ हनुमानाचेच मंदिर का? वाचा उत्तर!

येत्या २ एप्रिल २०२६ रोजी प्रभू श्रीरामांचे परमभक्त पवनपुत्र हनुमानाची जयंती(Hanuman Jayanti 2026) साजरी केली जाणार आहे. रामायणात श्रीरामाच्या खालोखाल जर कोणाचे व्यक्तिमत्त्व आपल्याला सर्वात जास्त प्रभावित करत असेल, तर ते नक्कीच हनुमंताचे आहे. पण एक प्रश्न नेहमी मनात येतो— श्रीरामाच्या परिवारात लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न असे भाऊ होते, सुग्रीव-बिभीषणासारखे मित्र होते, मग फक्त हनुमानाचीच स्वतंत्र मंदिरं  का आढळतात?

कामदा एकादशी २०२६: तुमची इच्छा पूर्ण होणार, कामदा एकादशी 'या' राशींसाठी भाग्योदय घेऊन येणार!

महर्षी वाल्मिकींच्या रामायणात हनुमानाचे चरित्र एका उत्तुंग शिखराप्रमाणे भासते. जन्मतःच सूर्याला फळ समजून झेप घेणारा हा बाल हनुमान 'न भूतो न भविष्यति' अशा पराक्रमाचा धनी आहे. परंतु, एवढा पराक्रम असूनही त्याला 'देवत्व' कसे प्राप्त झाले, याची गोष्ट रंजक आहे.

१. देवांचे वरदान आणि ऋषींचा शाप

अंजनीपुत्र हनुमान हा वायूच्या कृपेने जन्माला आला, त्यामुळे त्याच्या अंगी अफाट शक्ती होती. त्याच्या बाललीलांनी प्रसन्न होऊन अनेक देवदेवतांनी त्याला विविध वर दिले, ज्यामुळे तो अजिंक्य झाला. मात्र, या शक्तीचा वापर तो ऋषींच्या आश्रमात खोड्या करण्यासाठी करू लागला. शेवटी, ऋषींनी त्याला शाप दिला की— "जोपर्यंत कोणी तुला तुझ्या शक्तीची आठवण करून देणार नाही, तोपर्यंत तुला तुझ्या बलाचे ज्ञान होणार नाही."

२. जांबुवंताने करून दिलेली 'शक्तीची आठवण'

सीतेच्या शोधात जेव्हा समुद्र ओलांडण्याचा कठीण प्रसंग आला, तेव्हा सर्व वानरसेना चिंतेत होती. अशा वेळी 'किष्किंधाकांडात' उल्लेख आहे की, जांबुवंताने हनुमानाला त्याच्या विसरलेल्या शक्तीची आठवण करून दिली. तिथूनच खऱ्या अर्थाने हनुमानाचे बलदंड व्यक्तिमत्त्व फुलू लागले आणि त्याच्यातील गुणांचा फुलोरा हिमालयासारखा भव्य बनला.

कामदा एकादशी २०२६: रखडलेली कामे मार्गी लागतील, एकादशीला करा 'हा' विधी; मिळवा सुख-समृद्धी!

३. रामाच्या परिवारात हनुमानच 'देव' का ठरला?

श्रीरामाच्या जीवनात अनेक महान व्यक्ती होत्या:

लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न: हे रामाचे भाऊ होते, त्यांनी त्याग आणि निष्ठेचे आदर्श ठेवले.

सुग्रीव, बिभीषण, जांबुवान: हे अत्यंत पराक्रमी आणि गुणी सहकारी होते.

Tarot Card: मार्च अखेर आणि एप्रिलची सुरुवात, तुमच्यासाठी कशी असेल? वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य

परंतु, हनुमानाने आपली सेवा, भक्ती आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. रामायणाच्या अखेरीस हनुमानाने जे 'देवत्व' प्राप्त झाले झाले, ते इतरांना मिळाले नाही. त्यामुळेच आज आपल्याला जागोजागी श्रीरामाची मंदिरे दिसतात, तशीच हनुमानाचीही स्वतंत्र मंदिरे आढळतात. लक्ष्मण किंवा भरताची स्वतंत्र मंदिरे सहसा पाहायला मिळत नाहीत, कारण हनुमानाने भक्तीच्या माध्यमातून भक्तांच्या हृदयात 'देव' म्हणून स्थान मिळवले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Hanuman Jayanti 2026: The secret of Hanuman's divinity explained.

Web Summary : Hanuman's devotion, strength, and intelligence set him apart in Ramayana. Blessed by gods, he overcame a curse and served Rama selflessly. Unlike Lakshman and Bharat, Hanuman attained divinity through bhakti, hence his widespread independent temples.
टॅग्स :Hanuman Jayantiहनुमान जयंतीramayanरामायणIndian Festivalsभारतीय उत्सव-सणLord Hanumanहनुमान