Guru Purnima 2025: गुरुपौर्णिमेला दिवसभरात 'या' पाच पैकी एक मंत्र १०८ वेळा म्हणा आणि गुरुसेवेचे पुण्य मिळवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 15:14 IST2025-07-09T15:13:17+5:302025-07-09T15:14:21+5:30

Guru Purnima Mantra 2025: यंदा गुरुवारी १० जुलै रोजी गुरूपौर्णिमेचा योग जुळून आला आहे, त्याचे पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी दिलेले नामजप अवश्य करा. 

Guru Purnima 2025: On Guru Purnima, chant one of these five mantras 108 times throughout the day and earn the virtue of Guru Seva! | Guru Purnima 2025: गुरुपौर्णिमेला दिवसभरात 'या' पाच पैकी एक मंत्र १०८ वेळा म्हणा आणि गुरुसेवेचे पुण्य मिळवा!

Guru Purnima 2025: गुरुपौर्णिमेला दिवसभरात 'या' पाच पैकी एक मंत्र १०८ वेळा म्हणा आणि गुरुसेवेचे पुण्य मिळवा!

यंदा १० जुलै रोजी गुरुपौर्णिमा (Guru Purnima 2025) आहे. महाभारताचे रचेते महर्षी वेद व्यास यांची जयंती म्हणूनही हा सण साजरा केला जातो. तसेच, गुरुंप्रती ऋणनिर्देश करण्यासाठी देखील हा दिवस साजरा केला जातो. आयुष्याच्या विविध टप्प्यावर गुरु आपल्याला मार्गदर्शन करतात आणि आपल्या आयुष्याला सुयोग्य आकार देतात. मात्र तुमच्या बाबतीत गुरुप्राप्तीचा प्रवास पूर्ण झाला नसेल तर गुरु पौर्णिमेला दिलेल्या मंत्रांचा जप करा. जेणेकरून गुरुप्राप्ती होईल आणि जीवनात सुख, शांती आणि समृद्धी कायम राहील. यासाठी गुरूंचे गुरु परात्पर गुरु अर्थात दत्त गुरूंचे काही मंत्र पुढीलप्रमाणे -

गुरु पौर्णिमेचे मंत्र (Guru Purnima Mantra in Marathi):

- गुरुर्ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः
गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः

- ओम गुरुभ्यो नमः।

- ओम परमतत्वाय नारायणाय गुरुभ्यो नमः ।

- ओम वेदाहि गुरु देवाय विद्यहे परम गुरुवे धीमहि तन्नोः प्रचोदयात्।

- ओम गुं गुरुभ्यो नमः।

Guru Purnima 2025 : गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर गुरु उदय; 'या' राशींवर पडणार जबरदस्त प्रभाव, होणार भाग्योदय!

गुरु पौर्णिमा तिथी(Guru Purnima Muhurat 2025):  

यावर्षी पौर्णिमा तिथी गुरुवारी १० जुलै रोजी आहे. ही पौर्णिमा व्यास पौर्णिमा तसेच गुरु पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. अनेक साधक या दिवशी दत्त गुरुंची उपासना म्हणून उपासदेखील करतात. 

Guru Purnima 2025: गुरु पौर्णिमेपासून चातुर्मासात दर गुरुवारी करा 'हे' उपाय; धनसंपत्ती मिळेल अपार!

गुरु पौर्णिमेचे महत्त्व(Importance of Guru Purnima 2025): 

हिंदू धर्मात गुरूचे स्थान देवापेक्षा जास्त आहे. गुरूंच्या आशीर्वादाशिवाय देवतांचा आशीर्वादही निष्फळ होतो, असे म्हणतात. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंची आराधना केल्याने समस्त देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात. यासाठी गुरु पौर्णिमेला आपल्या गुरूंना देणगी, मिठाई, पुष्पगुच्छ भेट द्यावा आणि त्यांना वंदन करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा.

Web Title: Guru Purnima 2025: On Guru Purnima, chant one of these five mantras 108 times throughout the day and earn the virtue of Guru Seva!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.