>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक
आपल्या पत्रिकेतील अत्यंत शुभ सात्विक ग्रह म्हणजे “ गुरु'' त्याची उच्चीची वस्त्रे परिधान करून कर्क राशीतून भ्रमण करणार आहे. कर्क राशीतून गुरूचे स्थलांतर(Guru Gochar 2025) सकारात्मक असणार आहे. गुरुची नवम दृष्टी मीन राशीतील शनी महाराजांच्या वर असल्यामुळे आणि शनीसुद्धा पुढे २८ नोव्हेंबर पर्यंत वक्री असला तरी गुरूच्या शुभ दृष्टीमुळे त्याची नकारात्मकता, विलंब हे पडसाद कमी होतील.
Diwali Astro 2025: दिवाळीच्या प्रकाशपर्वात भाग्य उजळणार! राशीनुसार पहा आनंद आणि ऐश्वर्य योग!
गुरु हा पत्रिकेत नवम आणि व्यय भाव दर्शवतो तसेच आयुष्यातील स्थिरता, शिक्षण, व्यासंग, ज्ञान, अध्यात्म, सत्संग, संतती विवाह आणि एकंदरीत आचार विचारावर गुरुचे वर्चस्व असल्यामुळे उच्च राशीत जेव्हा गुरु महाराज येतात तेव्हा आपल्या भक्तांसाठी तर ही एक सुवर्णसंधी समजायला हरकत नाही. गेले काही दिवस लहान सहान आजारपणे, मुलांच्या विवाहाचे प्रश्न, कुठलेही काम धड मार्गी लागत नाही, अडथळ्यांची शर्यत, मनासारख्या गोष्टी घडत नाहीत, आर्थिक समस्या ह्यामुळे बेचैन झालेले मन आता थोडे स्थिर होण्यास मदत हा गुरु करणार आहे.
गुरु म्हणजे आशेचा किरण आणि हाच किरण आपल्याला जगायला बळ उमेद देत असतो. उन पाऊसाचा खेळ जीवनात किती चालू राहिला तरी गुरु पुन्हा आपल्याला उभे करतो आणि जगायला शिकवतो.
कर्क राशीतील गुरु अनेकांचे विवाह मार्गी लावेल. दिवाळी सुद्धा येत आहे त्यामुळे गोड घोड, आरास, रांगोळ्या ह्यांनी आपली घरे सजतील तसेच आकाशकंदील लावून आपण दणक्यात गुरुचे स्वागत करण्यास आता सज्ज झाले पाहिजे. त्यांच्या आगमनात काहीही कुठेही कमतरता नको. सगळी मरगळ झटकून पदर खोचून कामाला लागुया आणि दिवाळीही मनासारखी साजरी करुया. गुरु कर्क राशीत उच्च अवस्थेत आहे त्यामुळे भक्तीला उधाण येणार, चांगले संकल्प सोडून पारमार्थिक जीवन जगण्याची संधी आपण अजिबात सोडायची नाही. मनापासून केलेली सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचणार हे निश्चित.
गुरूचा भ्रमण काळ आणि नोव्हेंबर पर्यन्त लाभ :
१३ ऑक्टोबर रोजी दुपार नंतर पुनर्वसू हे गुरुचे आत्यंतिक शुभ नक्षत्र सुरु होणार आहे. यश, आनंद द्विगुणीत करणारे हे नक्षत्र आहे .संकल्प सोडून सेवेत दखल व्हा. नामस्मरण ग्रंथ वाचन श्री गजानन विजय ग्रंथ जे काही मनात येईल ते करायला सुरवात करा. दिवाळीचा फराळ करताना उठता बसता नाम घ्या आणि जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध करा.
विवाह ही समस्या आज अनेकांना भेडसावत आहे, पण विश्वास ठेवा हे आणि पुढील वर्ष गुरु सगळ्या आपल्या लेकरांच्या डोक्यावर अक्षता टाकल्याशिवाय पुढे प्रस्थान करणार नाही. विश्वास श्रद्धा आणि समर्पण ह्याचे बळ जबरदस्त असते आणि त्याचा अनुभव आपण आयुष्यात अनेकदा घेत असतो. अहो, महाराज आपले कधीतरी वाईट करतील का? सगळ्या गोष्टींचे योग असतात. विवाहाचे सुद्धा अनेक योग असतात, उशीर झाला तरी तोही आपल्या भल्यासाठी असतो, एखादी जमीन घर नाही मिळाले तरी ते आपल्या भल्यासाठीच असेत. जे जे होईल आणि होत आहे ते त्यांच्या इच्छेने, इतका प्रचंड विश्वास त्यांच्यावर भक्तांचा असला पाहिजे. ते देणार म्हणजे देणार!
वेळ निश्चित असते प्रत्येक गोष्टीची आणि ती फक्त त्यांना माहित असते. एखादी गोष्ट झाली की आपल्याला आनंदाला पारावर उरत नाही आणि नाही झाली की मन उदास होते! इतके की, अगदी महाराजांच्या वरचा विश्वास सुद्धा उडतो. कारण आपल्यात जराही संयम नाही आणि तोच शिकवणारा शनी आहे जो आपले भलेच चिंतत असतो.
महाराजांच्या इच्छेत आपली इच्छा विलीन करणारा आणि त्यांची आज्ञा प्रमाण मानणारा भक्त हा सदैव सुखी आणि महाराजांच्या कृपा छत्राखाली नेहमी आपले जीवन व्यतीत करत असतो. गुरु हा आपल्या शब्द गुणांचा कारक आहे त्यामुळे आता सात्विक भाव वाढेल. कुणाचीही निंदा करणार नाही, मत्सर , द्वेष , अहंकार ह्या भावनांना मनातून आणि हृदयातून हाकलून देऊ, असा मनोमनी ठाम निश्चय करू आणि सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊया. जो दुसऱ्याचे भले चिंतेल तो सद्गुरू कृपेस सार्थ ठरेल.
सर्वात मोठा म्हणजे अहंकार आणि अहंकाराचा वास असतो तिथे सद्गुरू पाऊल सुद्धा टाकणार नाहीत हे लक्ष्यात ठेवा मग तुम्ही पंचपक्वाने ठेवा नाहीतर तासंतास नामस्मरण करा. त्यांनीच आपल्याला जन्माला घातले आहे त्या आपल्या बापाला आपले अंतरंग चांगले समजतात त्यांच्या खेळ खेळू नाही शकत!
या काळात कोणते सत्कर्म करावे?
गोरगरिबांची सुद्धी दिवाळी आहे, आपली रोजच असते त्यामुळे त्यांना मदत करा, दिवाळीच्या पदार्थांचे सामान एखाद्याला दिले तर त्याच्याही घरी चार पदार्थ होतील आणि महाराजांना हे आपले काम नक्कीच आवडेल. मनातील किल्मिषे, जळमटे दूर करुया . सगळे मला मी मी करून झाले आता दुसऱ्यांसाठीही जगायला शिकूया आणि खरतर हेच ज्ञान देण्यासाठी गुरुचे भ्रमण कर्क राशीतून आहे. आनंदी राहायचे आहेच पण इतरानाही आनंद द्यायचा आहे तोही भरभरून. कुणाला तरी लहान लहान कंदील, पणत्या भेट द्या, म्हणजे त्यांचीही घरे प्रकाशाने उजळून निघतील. आशीर्वाद हीच मोठी आपली पुंजी आहे आणि ती मिळवायला मन मोठे करायला लागते. देणे हीच दिवाळी आहे घेणे नाही.
Laxmi Pujan 2025 Date: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
गेले कित्येक दिवस फोन केले नसतील त्यांच्याशी संवाद साधा. सततचा द्वेष. मानहानी , मत्सर , इतरांच्या बरोबर केलेली बरोबरी , इर्षा आपल्या शरीरात असंख्य आजारांचे मूळ पेरत असते. कुणाचा अपमान करू नका कमी लेखू नका, श्रीमंतीचा पैशाचा गर्व माज ते कधी उतरवतील समजणार सुद्धा नाही म्हणूनच सर्वांना बरोबर घेऊन जा, हाच गुरूचा संदेश आहे. इतरांच्या चुका काढण्यापेक्षा माझे कुठे चुकले ह्याकडे लक्ष्य द्या हे सांगणारा हा गुरु आहे.
गुरु अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा, आशावाद निर्माण करून जगायला स्फूर्ती देणारा ग्रह जेव्हा उच्च होतो तेव्हा अधिकाधिक नामस्मरण, जप, ग्रंथ वाचन, महाराजांचे दर्शन ह्या गोष्टी द्विगुणीत करून महाराजांच्या जवळ जाण्याची संधी स्वतः गुरु देत आहेत, आता त्याचे सोने करायचे की नाही हे आपल्या भक्तांच्या हाती आहे. गाव उनाडक्या केल्या, हेवेदावे, नको ते राजकारण, दुनियादारी केली तर मग प्रत्यक्ष गुरु सुद्धा आपल्या संकटात आपल्याला मदत करू शकणार नाहीत म्हणूनच आता सर्व नको त्या गोष्टी मनातून काढून टाकून मोठ्या आनंदाने दिवाळी साजरी करुया.
गुरु भ्रमणाचा लाभ:
गुरुचे भ्रमण हे आपल्या जीवनाला दिशा देणारे, नवनवीन संधी आयुष्यातील संकटे दूर करणारे आणि मनाला दिलासा देणारे आहे. आपल्या कुलस्वामिनी, कुलदेवता, सद्गुरू, शनी महाराज ह्यांचे जास्तीत जास्त नामस्मरण, अभिषेक करून ह्या शुभ काळाचा उपयोग करून घेतला, तर आयुष्यातील नवीन पर्वाची सुरवात आपण स्वतःच करू ह्यात दुमत नसावे. अध्यात्म हे आपल्या सर्वांच्या जीवनातील जगायला बळ देणारे टॉनिक आहे हे नक्की!
आपल्या आयुष्यातील नवीन आनंदाचा अध्याय आपण स्वतःच लिहावा आणि त्याला प्रत्यक्ष गुरूंची साक्ष लाभावी ह्यासारखी दुसरी आनंदाची पर्वणी ती काय? कर्क राशीतील गुरुच्या साक्षीने आज आपण इतरांसाठी जगायला बळ देणारी दिवाळी साजरी करुया. समाजातील असे अनेक स्तर आहेत जिथे मदतीची गरज आहे. आपल्याकडे जे काही असेल त्यातील थोडे दुसऱ्याला द्यावे असे शास्त्र सांगते. कुणाच्या तरी औषधाला, शिक्षणाला मदत करुया, दिवाळीचे कंदील, उटणे, कपडे, मिठाई, दिवे पणत्या आणि आपला स्नेह देऊन इतरांचेही आयुष्य समृद्ध करुया. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघुया, जुनी नाती पुन्हा नव्याने जगूया आणि आनंदाची पहाट अनुभवूया. शेवटी गुरु म्हणजे आनंद, जगण्याची उमेद, प्रेम सेवाभाव आणि प्रेरणा सुद्धा!
इतरांच्या सुखासाठी धडपडणारा भक्त महाराजांच्या हृदयाच्या समीप जाईल ह्यात शंका नसावी. सकारात्मकता , आशावाद आणि सात्विक विचारातून समाधान देणारा हा गुरु सर्वांच्या इच्छा पूर्ण करणार हा विश्वास ठेवा. गुरु महाराजांच्या चरणी साष्टांग विनम्र नमस्कार. सर्वाना दिवाळीच्या लक्ष लक्ष आभाळ भरून शुभेच्छा!
श्री स्वामी समर्थ
संपर्क : 8104639230
Web Summary : Guru's transit into Cancer brings positivity, resolving delays. It boosts stability, education, marriage prospects. Expect relief from ailments, marital issues, and financial stress. Embrace spirituality and selfless service for blessings. A time for renewed hope and prosperity.
Web Summary : गुरु का कर्क राशि में गोचर सकारात्मकता लाता है, जिससे विलंब दूर होते हैं। यह स्थिरता, शिक्षा और विवाह की संभावनाओं को बढ़ाता है। बीमारियों, वैवाहिक समस्याओं और वित्तीय तनाव से राहत की उम्मीद है। आशीर्वाद के लिए आध्यात्मिकता और निस्वार्थ सेवा को अपनाएं। नवीनीकृत आशा और समृद्धि का समय।