Gudi Padwa 2026: अयोध्या राम मंदिरात ऐतिहासिक सोहळा! १९ मार्चला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 'श्री राम यंत्रा'ची स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 12:00 IST2026-03-17T11:58:46+5:302026-03-17T12:00:14+5:30

Gudi Padwa 2026 Shri Ram Yantra Stapana: १९ मार्च २०२६ रोजी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अयोध्या राम मंदिरात 'श्री राम यंत्रा'ची स्थापना होणार आहे. जाणून घ्या या यंत्राचे महत्त्व आणि सोहळ्याचे तपशील.

Gudi Padwa 2026: Historic ceremony at Ayodhya Ram Temple! 'Shri Ram Yantra' to be installed on the auspicious occasion of Gudi Padwa on March 19 | Gudi Padwa 2026: अयोध्या राम मंदिरात ऐतिहासिक सोहळा! १९ मार्चला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 'श्री राम यंत्रा'ची स्थापना

Gudi Padwa 2026: अयोध्या राम मंदिरात ऐतिहासिक सोहळा! १९ मार्चला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 'श्री राम यंत्रा'ची स्थापना

प्रभू श्रीरामांची नगरी अयोध्या पुन्हा एकदा एका सुवर्ण क्षणाची साक्षीदार होण्यासाठी सज्ज झाली आहे. हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १९ मार्च २०२६ गुढीपाडव्याला(Gudi Padwa 2026) राम मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर अत्यंत पवित्र अशा 'श्री राम यंत्रा'ची विधिवत स्थापना केली जाणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

फाल्गुन अमावास्या २०२६: गुढीपाडव्यापूर्वी अमावास्येला राशीनुसार करा 'हे' बदल; नव्या वर्षात होईल सगळं मंगल!

काय आहे 'श्री राम यंत्र' आणि त्याचे महत्त्व?

अध्यात्म आणि शास्त्रानुसार, 'यंत्र' हे देवतेचे निवासस्थान मानले जाते. अयोध्याराम मंदिरात बसवले जाणारे हे यंत्र विशेष वैदिक गणित आणि भूमितीय रचनांच्या आधारे तयार करण्यात आले आहे.

सकारात्मक ऊर्जेचा स्त्रोत: असे मानले जाते की, श्री राम यंत्रामध्ये दैवी लहरी आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते, ज्यामुळे संपूर्ण मंदिर परिसरात सकारात्मक आणि आध्यात्मिक ऊर्जा टिकून राहते.

विजय आणि समृद्धी: हे यंत्र विजयाचे प्रतीक मानले जाते. राम लल्लाच्या मूर्तीसोबतच या यंत्राची उपस्थिती भक्तांसाठी अत्यंत मंगलदायी ठरणार आहे.

सोहळ्याचे खास आकर्षण आणि वेळ

१. शुभ मुहूर्त: यंत्राची मुख्य प्रतिष्ठापना सकाळी ११:५५ वाजता 'अभिजित मुहूर्तावर' वैदिक मंत्रोच्चारांच्या जयघोषात केली जाईल.

२. श्रमिकांचा सन्मान: या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, राम मंदिर उभारणीत योगदान देणाऱ्या सुमारे ४०० ते १८०० कारागिरांचा आणि श्रमिकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष सन्मान केला जाणार आहे.

३. साधू-संतांची उपस्थिती: या कार्यक्रमासाठी देशभरातील सुमारे ३०० हून अधिक प्रतिष्ठित साधू-संत आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सोम प्रदोष २०२६: प्रदोष काळात शिव मंदिरात जाणे शुभ; पण नंदीसमोर तीनदा टाळ्या वाजवण्याचे काय कारण?

गुढीपाडव्याचा दुग्धशर्करा योग

१९ मार्चला चैत्र नवरात्रीची सुरुवात आणि हिंदू नववर्ष (गुढीपाडवा) आहे. प्रभू श्रीराम १४ वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परतले, तेव्हा अयोध्येतील जनतेने गुढ्या उभारून त्यांचे स्वागत केले होते. त्याच तिथीला आता राम मंदिरात श्री राम यंत्राची स्थापना होणे, हा एक अद्भुत योगायोग मानला जात आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा काळ चैत्र नवरात्र तसेच श्रीराम नवरात्र म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे हा सोहळा रामभक्तांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे!

Astrology: 'अच्छे दिन' येण्यापूर्वी मिळतात 'हे' शुभ संकेत; ओळखा तुमच्या आयुष्यातील ६ दैवी बदल!

Web Title : गुड़ी पड़वा २०२६: अयोध्या मंदिर में श्री राम यंत्र की स्थापना

Web Summary : गुड़ी पड़वा २०२६ को अयोध्या के राम मंदिर में 'श्री राम यंत्र' स्थापित किया जाएगा। राष्ट्रपति मुर्मू समारोह में भाग लेंगी, जहाँ योगदान करने वाले कारीगरों को सम्मानित किया जाएगा। माना जाता है कि यंत्र सकारात्मक ऊर्जा विकीर्ण करता है, जिसे शुभ अभिजीत मुहूर्त में स्थापित किया जाएगा।

Web Title : Gudi Padwa 2026: Shri Ram Yantra Installation at Ayodhya Temple

Web Summary : On Gudi Padwa 2026, a 'Shri Ram Yantra' will be installed at Ayodhya's Ram Temple. President Murmu will attend the ceremony where contributing artisans will be honored. The Yantra, believed to radiate positive energy, will be installed during the auspicious Abhijit Muhurta.