Gudi Padwa 2026 Muhurat: गुढी पाडव्याला नवीन गाडी घेताय? थांबा! वाहन खरेदीचा 'हा' मुहूर्त ठरेल अधिक लाभदायी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 13:03 IST2026-03-10T13:02:07+5:302026-03-10T13:03:59+5:30
Gudi Padwa 2026 Vehicle Purchase Shubha Muhurta: नवीन वाहन खरेदीपूर्वी तपासा शुभ मुहूर्त, नक्षत्र आणि तिथी; जाणून घ्या ज्योतिषीय नियम, जेणेकरून मिळेल वाहनसौख्य!

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढी पाडव्याला नवीन गाडी घेताय? थांबा! वाहन खरेदीचा 'हा' मुहूर्त ठरेल अधिक लाभदायी!
Vehicle Purchase Shubh Muhurat March 2026: नवीन वाहन खरेदी करणे हे प्रत्येकासाठी आनंदाचे आणि स्वप्नपूर्तीचे क्षण असतात. हे वाहन आपल्याला दीर्घकाळ साथ द्यावे आणि सुरक्षित प्रवास घडावा यासाठी ज्योतिषशास्त्रात काही विशेष तिथी, वार आणि नक्षत्रांचा उल्लेख केला आहे. येत्या गुढी पाडव्याच्या(Gudi Padwa 2026) मुहूर्तावर तुम्ही गाडी खरेदीचा विचार करत असाल तर तत्पूर्वी दिलेली माहिती वाचून घ्या.
Gudi Padwa 2026 Date: गुढीपाडवा कधी? १८ की १९ मार्च? गुढी उभारण्याचा अचूक मुहूर्त एका क्लिकवर!
१. वाहन खरेदीसाठी शुभ वार
वाहन खरेदीसाठी आठवड्यातील काही दिवस अत्यंत शुभ मानले जातात:
सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार: हे चार दिवस वाहन खरेदीसाठी सर्वोत्तम मानले जातात. हे दिवस चंद्राच्या आणि गुरुच्या प्रभावाखाली असल्याने प्रवासात सुख मिळते.
रविवार: रविवारी वाहन खरेदी करणे शुभ मानले जाते, कारण सूर्य हा ऊर्जेचा कारक आहे.
टीप: शक्यतो शनिवारी वाहन खरेदी करणे टाळावे (शनि हा लोखंडाचा कारक असला तरी, वाहनाशी संबंधित अपघातांच्या भीतीने अनेकजण हा वार टाळतात). तसेच मंगळवारी देखील नवीन वाहन घरी आणणे शुभ मानले जात नाही.
भीमसेनी कापूर: अस्सल भीमसेनी कापूर का आहे श्रेष्ठ? जाणून घ्या त्याची शुद्धता ओळखण्याची सोपी पद्धत
२. शुभ नक्षत्रांचा विचार
नक्षत्र हे मुहूर्ताचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. खालील नक्षत्रांवर वाहन खरेदी करणे फलदायी ठरते:
अश्विनी, रोहिणी, पुनर्वसू, पुष्य, हस्त, चित्रा, स्वाती, श्रवण, धनिष्ठा, शततारका आणि रेवती.
यापैकी पुष्य नक्षत्र हे सर्व कार्यांसाठी 'अमृत' मानले जाते, त्यामुळे या दिवशी वाहन खरेदी करणे सर्वात उत्तम ठरते.
३. कोणत्या तिथीला प्राधान्य द्यावे?
शुभ तिथी: १, २, ५, ६, ८, १०, ११, १३ आणि १५ (पौर्णिमा). या तिथींना नवीन कामाची सुरुवात करणे किंवा नवीन वस्तू घरी आणणे लाभदायक असते.
वर्ज्य तिथी: चतुर्थी, नवमी आणि चतुर्दशी (रिक्ता तिथी) या दिवशी वाहन खरेदी करणे टाळावे. तसेच अमावास्येला चुकूनही नवीन वाहन घरी आणू नये.
समुद्रिक शास्त्र: संघर्ष की राजयोग? 'दातावर दात' असणाऱ्या लोकांच्या नशिबाचा खेळ आणि त्यामागील सत्य
४. स्थिर लग्न आणि मुहूर्त
ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा आपण एखादी कायमस्वरूपी टिकणारी वस्तू घेतो, तेव्हा 'स्थिर लग्न' (वृषभ, सिंह, वृश्चिक, कुंभ) महत्त्वाचे असते. या काळात घेतलेली वस्तू आपल्याकडे दीर्घकाळ टिकते आणि लाभ देते.
५. राशीनुसार रंग निवडणे
केवळ मुहूर्तच नाही, तर आपल्या राशीनुसार वाहनाचा रंग निवडल्यास सकारात्मकता वाढते. उदाहरणार्थ, मेष राशीसाठी लाल, वृषभसाठी पांढरा किंवा निळा रंग शुभ मानला जातो.
वाहन खरेदीनंतर करावयाचे काही सोपे उपाय:
१. वाहन पूजा: नवीन वाहन शोरूममधून बाहेर काढण्यापूर्वी किंवा घरी आणल्यावर त्याची विधिवत पूजा करा.
२. नारळ वाढवणे: वाहनाच्या समोर नारळ वाढवून विघ्नहर्त्या गणपतीचे स्मरण करा.
३. स्वस्तिक काढावे: वाहनाच्या बोनेटवर कुंकवाने किंवा शेंदुराने 'स्वस्तिक' काढावे, जे संरक्षणाचे प्रतीक आहे.
लवकरच गुढी पाडवा(Gudi Padwa 2026) येत आहे, त्या योगावर वाहन खरेदी करू शकता. गुरुवार आहे आणि साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. याशिवाय पुढच्या महिन्यात १९ एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेलाही(Akshay Tririya 2026) वाहन खरेदी लाभदायी ठरेल.